' म्युच्युअल फंड ठरू शकतो बचतीचा उत्तम पर्याय! कसा ते जाणून घ्या… – InMarathi

म्युच्युअल फंड ठरू शकतो बचतीचा उत्तम पर्याय! कसा ते जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

‘बचत’ आणि ‘पैश्यांचं नियोजन’ हे आपल्याकडे फार कमी चर्चिले जाणारे विषय आहेत. एका सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की, भारतीय मध्यमवर्गीय घरांमध्ये प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या पद्धतीने बचत करत असते.

कोणी फक्त इन्शुरन्समध्ये पैसे जमा करतो, तर कोणी फक्त फिक्स डिपॉसिटमध्ये पैसे साठवतो. अजून काही प्रकारचे लोक आहेत जे फक्त बँकेत पैसे जमा करतात, तर काही सोने किंवा मालमत्ता वाढवण्यावर भर देतात.

ज्यांना बचतीचे मार्ग लवकर कळतात, त्यांना ते ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यात फारसा रस नसतो. किंबहुना अनेकदा चांगले मार्ग सांगूनही जुन्याच मार्गांवर ठाम राहणा-यांचे प्रमाणही पुष्कळ असते.

सर्वसाधारणपणे “माझ्या मित्राने सांगितलं… म्हणून मी अशी बचत करतो” असं एक उत्तर मध्यमवर्गीय घरातील मुलांचं तयार असतं.

‘म्युच्युअल फंड’ हा बचतीचा, आपल्या गुंतवणुकीवर फायदा मिळवण्याचा राजमार्ग असूनही त्याबद्दल एका ठराविक वर्गालाच ज्ञान आहे असं म्हणावं लागेल. ‘म्युच्युअल फंड’ मध्ये गुंतवणूक करतांना ‘मार्केट रिस्क’ असते हे आपण इतकं लक्षात ठेवलं आहे की, त्यामधून फायदा सुद्धा होतो याचा विसर पडल्यासारखा वाटतो.

 

mutual fund 2

 

मागच्या ३ वर्षात ‘म्युच्युअल फंड’मध्ये गुंतवणुकीत लाक्षणिक वाढ झाली आहे हे खरं असलं, तरीही कित्येक लोक आजही त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. ‘म्युच्युअल फंड’ म्हणजे काय ? आणि त्यामध्ये गुंतवणूक करावी असे सगळे अर्थतज्ञ का सांगत असतील ? जाणून घेऊयात.

‘म्युच्युअल फंड स्कीम’ ही एक आर्थिक योजना आहे, जी गुंतवणूकदारांच्या पैश्यावर उभी असते. भारतामध्ये जवळपास ३०० ‘असेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) ‘ आहेत. या कंपन्या ग्राहकांकडून गोळा करण्यात आलेले पैसे हे विविध कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवत असतात. ‘म्युच्युअल फंड’ कंपनी या आपले पैसे शेअर मार्केटमध्ये वापरून त्यावर होणारा व्याजाचा नफा आपल्याला मिळवून देत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

‘म्युच्युअल फंड’ ही अशी एकमेव आर्थिक गुंतवणूक आहे ज्यामध्ये आपले पैसे कमी काळात वाढतात आणि गरज असल्यास ते पैसे काढता सुद्धा येतात. हा सर्वात चांगला फायदा आहे ज्यामुळे ‘म्युच्युअल फंड’ हे लोकप्रिय होत आहे असं म्हणता येईल. कारण, विमा कंपनीचा असा अनुभव सर्वांना आहे की, एकदा पैसे आपण दिले की ते लवकर परत येतच नाहीत.

कोणता ‘म्युच्युअल फंड’ विकत घ्यावा हे नेट ऍसेट व्हॅल्यू (NAV) म्हणजेच ती रक्कम जी की मार्केटमधील फायदा आणि त्यातून कंपनीचा खर्च वजा केल्यानंतर मिळते. कोणत्याही ‘म्युच्युअल फंड’ ची NAV जास्त तितका तो फायदेशीर हे गणित आहे.

 

nav-inmarathi

 

आपले पैसे एका कंपनीमध्ये न गुंतवता बऱ्याच कंपनीमध्ये गुंतवले जातात आणि म्हणूनच ‘म्युच्युअल फंड’ ही निर्विवादपणे सर्वात जास्त फायदा देणारी गुंतवणूक ठरते.

‘म्युच्युअल फंड’ मध्ये गुंतवणूक करण्याचे इतर फायदे हे सांगता येतील:

१. विविध मार्गांनी केलेली गुंतवणूक:

‘म्युच्युअल फंड’ची गुंतवणूक ही वेगवेगळ्या सिक्युरिटी बॉण्डमध्ये केलेली असल्याने गुंतवणूकदाराची मूळ रक्कम ही नेहमीच सुरक्षित राहत असते. याचं कारण हे की, जरी एखाद्या कंपनीला नुकसान सोसावं लागलं तरीही इतर कंपनी या ‘म्युच्युअल फंड’ला फायदा मिळवून देत असतात.

 

mutual-fuind-inmarathi

 

२. तज्ञांचं मार्गदर्शन:

नवीन व्यक्तीला स्टॉक मार्केटबद्दल फार कमी माहिती असते. कोणत्या ‘म्युच्युअल फंड’मध्ये गुंतवणूक करावी यासाठी प्रत्येक कंपनीने ग्राहकांसाठी तज्ञ उपलब्ध करून दिलेले असतात.

 

stock-market-expert-inmarathi

 

ग्राहकांना फायदा मिळवून देणे हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. सतत मार्केट ट्रेंड्सचा अभ्यास करणारे हे तज्ञ तुमच्या प्रवासात नेहमीच सोबत असतात. असं फक्त ‘म्युच्युअल फंड’मध्येच होतं.

३. किमान रकमेची सोय:

शेअर्स किंवा इतर कोणतीही गुंतवणूक करतांना आपल्याकडे किमान रक्कम असणं अपेक्षित असतं. ही अट ‘म्युच्युअल फंड’मध्ये निघून जाते.

नोकरदार व्यक्तींसाठी सिस्टिमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा दर महिन्यात किंवा तीन महिन्यात ठराविक रक्कम तुमच्या बँक अकाउंटमधून घेतली जाते आणि ‘म्युच्युअल फंड’मध्ये गुंतवली जाते. विमानंतर सर्वात जास्त लोकप्रिय झालेली ही आर्थिक गुंतवणूक मानली जाते.

 

sip-inmarathi

 

४. सहज उपलब्ध:

‘म्युच्युअल फंड’ विकत घेणं हे अगदी सहज शक्य आहे. ऍसेट मॅनेजमेंट कंपनी या ‘म्युच्युअल फंड’ची विक्री खालील माध्यमातून सहजपणे करत असतात:

 

types-of-mutual-funds-inmarathi

 

– ब्रोकरेज फर्म्स
– कार्वी आणि कॅम्ससारखे नोंदणीकृत वितरक
– ऑनलाईन ‘म्युच्युअल फंड’ इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म
– एजंट्स आणि बँक

‘म्युच्युअल फंड’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंटची सुद्धा गरज नसते हा मोठा फायदा आहे.

५. सर्वांसाठी प्लॅन उपलब्ध:

कमीत कमी ५०० रुपये गुंतवणूक करावी लागणाऱ्या ‘म्युच्युअल फंड’मध्ये जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवली जाऊ शकते. प्रत्येक व्यक्तीने फक्त हे बघितलं पाहिजे की, आपण किती रक्कम किती काळासाठी गुंतवू शकतो, किती रकमेचा धोका पत्करू शकतो, आपला कमीत कमी खर्च किती आहे हा अभ्यास गुंतवणूकदाराने आधी करणं खूप आवश्यक आहे.

 

family featured inmarathi

६. टॅक्सच्या रकमेची बचत:

इ एल एस एस ‘म्युच्युअल फंड’ विकत घेतले, तर आपली वार्षिक दीड लाखांची टॅक्सची बचत होऊ शकते. ‘सेक्शन ८० सी’च्या अंतर्गत ही सूट देण्यात आली आहे.

 

section-80-c-inmarathi

 

७. लॉक-इन पिरियड:

‘म्युच्युअल फंड’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमीत कमी काळ हा फक्त ३ वर्ष आहे. इतर गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार केलात, तर कमीत कमी ५ वर्ष इतका काळ तुम्ही तिथे गुंतवणुक करावी असा नियम असतो.

 

lock-in-period-inmarathi

 

‘म्युच्युअल फंड’मध्ये अजून एक फायदा हा की, लॉक-इन पिरियड संपल्यानंतर सुद्धा आपण गुंतवणूक सुरूच ठेवू शकतो.

‘म्युच्युअल फंड’चे इतके फायदे कळल्यावर आपण सुद्धा त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी नक्की सज्ज झालेले असाल. आपल्या विमा प्रतिनिधीला आजच सांगून ‘म्युच्युअल फंड’मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा माहिती विचारा आणि योग्य त्या फंडमध्ये गुंतवणूक सुरू करा. याचा तुम्हाला नक्की फायदाच होईल!

 

mutual-fund-inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?