या तलावांजवळ गेलात तर तुमचं काही खरं नाही! ‘मृत्यूचं घर’ मानले जाणारे तलाव
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
तलाव आणि त्यातलं शांत पाणी, आजूबाजूची दाट झाडी हे मनाला एकप्रकारचा थंडावा देणारं असतं. पक्षांचे आवाज, पाण्याच्या प्रवाहाचा हलका आवाज आणि आसमंतात भरून राहिलेली शांतता हे मेडिटेशनहून कमी नाही.
मात्र मनाची शांतता मिळणं दूरच राहिलं उलट मनाला भयभीत करणारेही काही तलाव या जगात अस्तित्वात आहेत असं सागितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. नाही नाही, आम्ही कोणत्याही हॉररपटाबाबत बोलत नाही तर, वास्तवात असणार्या तलावांविषयी बोलत आहोत.
तलावातलं नितळ पाणी आणि आजूबाजूची हिरवाई खरंतर मनाला शांतता देणारी असते. मात्र जगात असे काही तलाव अस्तित्वात आहेत, जे भीतीदायक आहेत. याचं कारण, हे तलाव म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण आहेत. काहींबाबतीत हे गूढ अद्याप अज्ञात आहे, तर काही तलावांमधील विषारी वायुमुळे या तलावांना मृत्यूचं घर मानलं जातं.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
काही वर्षांपूर्वी भारतातील फरिदाबाद येथील एका तलावात एका तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातम्या होत्या. हा तलाव ज्या परिसरात आहे त्याचं नावच मुळात डेथ व्हॅली असं आहे.
आजूबाजूच्या परिसरातील लोकांना माहित असतं, मात्र या भागात पर्यटक म्हणून येणार्यांना काही कल्पना नसल्यान ते मौज मजेसाठी तलावाकाठी जातात आणि ते मृत्युला साक्षात आमंत्रण ठरतं.
विस्फोटक तलाव, कीवू-
पाण्यात खरंतर ऑक्सिजन असतो आणि म्हणूनच पाण्याला जीवन म्हटलं जातं हे आपल्याला विज्ञानाने शिकवलं आहे. मात्र कीवू तलावाच्या पाण्यात अतिरिक्त प्रमाणात कार्बनडायऑक्साईड आहे. याशिवाय खतरनाक असा मिथेन वायूही मोठ्या प्रमाणात आहे.
या तलावाच्या आजूबाजूला अगदी सौम्य स्वरूपाचा भूकंप झाला, तरीही या तलावात भयानक स्फोट होऊ लागतात. आजवर या तलावात वीस लाखांहून जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत.
रूपकुंड तलाव, हिमालय-
हिमालय त्याच्या शांततेसाठी लोकप्रिय आहे. बर्फ़ाच्छादित डोंगर आणि त्याच्या कुशीत असणारे असंख्य नैसर्गिक तलाव हे हिमालयाचं सौंदर्य आहे. मात्र इथे एक तलाव मृत्युचा तलाव म्हणूनही ओळखला जातो.
१९४२ साली ब्रिटिश सैन्याला शोध लागला, की या तलावाच्या तळाशी दहा पाच नव्हे, तर तब्बल दोनशे प्रेतं आहेत. ही सगळी माणसं अत्यंत रहस्यमय पध्दतीनं मरण पावली होती.
११ व्या शतकापर्यंत या तलावाविषयी लोकांना काहीच माहिती नव्हती. यामुळेच तलावाच्या तळाशी असलेले दोनशे सांगाडे तिथे कसे आले? याचा काहीच पत्ता कधीच लागला नाही. आजही या तलावात उतरण्यास सक्त मनाई आहे.
–
- भारतातील या १० रस्त्यांवर रात्री प्रवास करण्याची डेरिंग चुकूनही करू नका!
- सावधान! हे गूढ जंगल तुम्हाला तुमचं आयुष्य संपवायला भाग पाडेल
–
मिशिगन तलाव, अमेरिका-
हा तलाव खरंतर अगदी भुरळ पडावा असा सुंदर आहे. तो इतका सुंदर आहे, की लोकांना आपल्याकडे आकृष्ट करतोच करतो. मात्र असं सांगतात, की या तलावाच्या डोक्यावर एकदा जीवघेण्या वायुचा ढग निर्माण झाला आणि बरसला.
या ढगानं आणि त्याच्यातल्या वायूनं १७४६ लोकांचा जीव घेतला. इतकंच नाही, तर या तलावाच्या आजूबाजूला असणारे प्राणी, किटकही मेले.
अभ्यासकांच्या मते, तलावाच्या तळाशी पोटात असणार्या ज्वालामुखीमुळे हे घडले असावे. पाण्यात कार्बन मिसळला गेला आणि त्यापासून हवेत गेलेल्या वायूचा ढग बनला.
उकळत्या पाण्याचा तलाव, डोमिनिका-
सहसा तलावातलं पाणी म्हटलं, की आपल्याला पाण्याचा थंडावा जाणवतो. मात्र डोमिनिका इथला एक तलाव चक्क उकळतं पाणी असणारा आहे.
या तलावातलं पाणी तब्बल ९२ अंश सेल्सिअस इतकं उकळतं आहे. कल्पना करा, या तलावाच्या आजूबाजूला किती उष्णता असेल?
याशिवाय या तलावाच्या अगदी नजीक ज्वालामुखीचं तोंड असल्यानं आणि हा ज्वालामुखी जिवंत असल्यानं तलावातलं पाणी सतत उकळतं असतं.
बॉस्नो तलाव, रशिया-
ब्रास्नो ड्रॅगन नावानं ओळखल्या जाणार्या एका प्राचीन पालीचं या तलावात अस्तित्व असल्याची परिसरातील रहिवाशांची धारणा आहे. या तलावाचं पाणीही उकळतं आहे. त्याचे बुडबुडे इतके मोठे असतात, की एखादी नावही या बुडबुड्यामुळे उलटू शकते.
कावाह इजेन आम्लिय तलाव, इंडोनेशिया-
जगातला सर्वात जास्त आम्लयुक्त पाणी असणारा हा तलाव आहे. या तलावाचं तापमान २०० अंश सेल्सिअस इतकं असतं. रात्री या तलावाचं पाणी चमकदार नीळं दिसतं. ते कमालीचं सुंदर दिसत असलं, तरी यामागचं कारण आहे या पाण्यातला मिथेन वायू.
नेट्रॉन तलाव, तंजानिया-
या तलावात चुकून कोणी जीव बुडून मेलाच तर त्याचा दगड होतो. हे असं का होत असावं याचं कारण सांगताना अभ्यासक सांगतात, की हायड्रोजन आणि ऐल्केलीन सॉल्ट लाईमस्टोन बनवतात. यामुळे हा प्रकार घडत असावा.
हॉर्स शू लेक, मॅम्मोथ-
जिवंत ज्वालामुखीच्या डोक्यावर असलेला हा तलाव. सुरवातीला हा तलाव अगदीच निरूपद्रवी समजला जात असे, मात्र साधारण २० वर्षांपूर्वी या तलावाच्या आजूबाजूची झाडं अचानक कोसळून मरू लागली.
संशोधकांनी याचा अभ्यास सुरु केला असता असं आढळलं, की या तलावातल्या पाण्यातल्या कार्बनडायऑक्साईडचं प्रमाण अचानक खूप जास्त वाढल्यानं त्याचा परिणाम म्हणून झाडं मरू लागली आहेत.
२००६ साली तीन ट्रेकर्सनी या तलावाच्या जवळपास असणार्या एका गुहेत आसरा घेतला असता हवेत पसरलेल्या अतिरिक्त कार्बडायऑक्साईडमुळे त्यांचं मरण ओढावलं.
–
- हे आहेत जगातले सर्वात भयानक आणि धोकादायक ‘जागृत’ ज्वालामुखी
- ह्या ‘तलावात’ दडलाय करोडोंचा खजिना – जो दिवसेंदिवस वाढतोच आहे!
–
मोनो लेक, कॅलिफ़िर्निया-
एकेकाळी हा तलाव जैवविविधितेमुळे परिचित होता. जगातली दूर्मिळ अशी जैवविविधता या तलावात आढळत होती. हा एक प्राचीन तलाव आहे. विशेष म्हणजे या तलावात मासे नव्हते, मात्र भरपूर प्रकारचे शिंपले आणि इतर जलचर आढळत.
१९४१ पर्यंत हा तलाव निसर्गरम्य आणि आरोग्यदायी म्हणूनच परिचित होता. त्यानंतर लॉस एंजेलिसचा पसारा वाढू लागला आणि त्याचा विपरीत परिणाम या तलावातील पाण्यावर झाला.
१९९० पर्यंत या तलावाचं पन्नास टक्के पाणी आटलं होतं. इतकंचा नाही तर हे पाणी आता विषारी बनलं आहे. या पाण्यात अतीभयंकर प्रमाणात कार्बनडायऑक्साईड आणि सल्फ़ेट आहे.
या तलावाच्या रक्षणासाठी आणि त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली. मात्र झालेलं नुकसान इतकं जास्त आहे, की हा तलाव पूर्ववत होण्यासाठी अजून दशकं जायला हवीत.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.