' तंदुरुस्त शरीर ते मनाची शांतता, लवकर उठण्याचे आहेत ‘सर्वांगीण’ फायदे… – InMarathi

तंदुरुस्त शरीर ते मनाची शांतता, लवकर उठण्याचे आहेत ‘सर्वांगीण’ फायदे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लवकर निजे,लवकर उठे,
त्यास आरोग्य संपत्ती लाभे.!

लहानपणापासून ते मोठे होईपर्यंत अगणित वेळेस हे आपण ऐकलं असेल. त्यापैकी किती जणांनी हे अंगिकारलं आहे हा संशोधनाचा विषय आहे. अर्थात, झोपेचे आरोग्यासाठी असलेले फायदे हा अनेकदा चर्चेचा विषय असतो. त्याबद्दल आपल्याला ठाऊक सुद्धा असतं.

या झोपेचे सर्वांगीण फायदे आहेत. त्याबद्दल मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. लवकर उठण्याची ही सवय आपल्याला केवळ आरोग्यच नव्हे तर मानसिक, व्यवसायिक, बौद्धिक अशा विविध स्तरांवर फायदेशीर ठरते.

आजच्या धावपळीच्या जीवनात दिवसाचे २४ तास सुद्धा कमी पडत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठे वेळापत्रकामध्ये कामांना कात्री लावली जाते आणि त्यात सर्वाधिक प्रमाण आहे झोपेचे…

रात्री उशिरापर्यंत जागून काम करणे आणि दिवसा उशिरा उठणे हे आता काहींच्या जीवनात नित्याचे झाले असेल.

 

frustrated-punjabi-guy-inmarathi

 

शिवाय याच कामाचा तणाव, अपुरी झोप याचा परिणाम अलीकडे आरोग्यावर होताना दिसत आहे. रात्री तासनतास मोबाईलवर असणारे तरुण अपुऱ्या झोपेमुळे सकाळी डोळे चोळत उठत आहेत. अपुऱ्या झोपेमुळे त्यांच्या सुद्धा आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे.

असं म्हणतात की एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली की बाकीची सर्व काम ही चांगलीच होतात. याचा थेट संबंध येतो ते सकाळी लवकर उठण्याशी.

तर आज बघूया लवकर उठण्याचे असे फायदे की ज्याला तुम्ही दुर्लक्षित नाही करू शकत.

उशिरा उठण्याचे दुष्परिणाम:

  • पचनक्रिया बिघडते.
  • त्वचा निस्तेज राहते.
  • चिडचिड होते.
  • कामे अडकून राहतात.
  • केसांवर परिणाम होतो.
  • दिवसभर आळस राहतो.
  • काम करण्यासाठी उत्साह राहत नाही.

आता जाणून घेऊयात सकाळी लवकर उठण्याचे सर्वांगीण फायदे!

हे सुद्धा वाचा

झोप येत नाहीये? या आणि इतर ७ त्रासांवर आयुर्वेदातला हा “खास” उपाय करून बघा!

शारीरिक फायदे

१. लवकर उठल्याने शरीरात योग्य ते अन्नघटक वेळेत जातात.

उदाहरणच घ्यायचं झालं तर, लवकर उठल्यामुळे सकाळचा नाश्ता वेळेत होतो. त्यामुळे दुपारचे जेवण सुद्धा योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात होतं. ऑफिसला ९ ला निघायचं आहे आणि तुम्ही ८ ला उठून तयारी करता. आवरून होईपर्यंत नाश्ता करणं बाजूला राहतं. नाश्ता झालाच तर घाईघाईत होतो.

 

morning-breakfast-marathipizza

 

शिवाय नाश्ता नाही झाला मग खा समोसा किंवा वडापाव. अशी काहीशी परिस्थिती येतच असते. यामुळे होते काय, की चुकीच्या आहार पद्धती या अंगवळणी पडतात, ज्याचा थेट परिणाम हा आरोग्यावर होतो.

२. व्यायाम, योगा करण्यासाठी मुबलक वेळ मिळतो.

सकाळी लवकर व्यायाम करणे हे कधीही चांगले. तुम्ही दिवसात कधीही जिमला जाऊन वर्क आऊट करत असाल पण त्याचा परिणाम सकाळी केलेल्या व्यायामा एवढा नसतो. सकाळी पुरेसा व्यायाम आणि योगा केला की त्याचा परिणाम हा दिवसभर बघायला मिळतो.

 

jaqueline-yoga-inmarathi

 

दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. मन दिवसभर सकारात्मक आणि प्रसन्न राहते. काम करताना आळस येत नाही. सकाळी व्यायाम करण्याचे असे अनेक फायदे आहेत.

मानसिक फायदे

१. एकाग्रता

सकाळी लवकर आपले डोळे शांतपणे उघडतात. आजूबाजूला गडबड गोंधळ नसतो. वातावरण प्रसन्न असतं. बुद्धी आणि मन या दोघांच्या विकासाला आणि वाढीला असे वातावरण सोयीचं असतं. सकाळी करत असलेल्या कामात दखल घ्यायला कुणीही नसल्यामुळे बुद्धी आणि मेंदू एकाग्रतेने ते काम पूर्ण करत असतं.

सकाळी लवकर उठल्याने मेंदूची कार्य करण्याची पद्धत अशाप्रकारे विकसित होत जाते. ज्यामुळे कालांतराने कधीही कोणतेही काम करत असताना काम करण्याचा तोच पॅटर्न दिवसभर राहतो. याचा फायदा हा नेहमी आपल्यालाच होतो.

 

work from home inmarathi 9

 

२. तुमची कार्यक्षमता वाढते

जगातल्या सगळ्या यशस्वी व्यक्तींमध्ये एक गोष्ट हमखास पाहायला मिळते. वॉरेन बफेटपासून ते बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग पासून ते अक्षय कुमार पर्यंत सगळ्यांमध्ये. हे सगळे सकाळी लवकर उठतात.

सकाळी लवकर उठल्याने तुमच्याकडे तुमची महत्वाची कामं करण्यासाठी पुरेसा वेळ असतो. जेव्हा इतर लोक झोपलेले असतात.

 

sleeping inmarathi

 

सकाळी मेंदू जास्त सतर्क असतो. मेंदू जास्त कार्यक्षमपणे काम करतो. त्यामुळे कामं सुद्धा जलदरीत्या पूर्ण होतात. याच दरम्यान आपलं दिवसभराचं वेळापत्रक निश्चित करून त्यावर जास्त काम करू शकतो. अपेक्षित असलेलं यश पदरात पाडून घेऊ शकतो.

तुमची निर्णय क्षमता यामुळे प्रचंड विकसित होते.

मानसिक फायदे

१. तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढते

वेळेवर झोपून वेळेवर उठलो की शरीराला त्या पद्धतीची सवय होते. आठवड्याचे ५ दिवस तुम्ही लवकर झोपून लवकर उठता पण विकेंडला उशिरा झोपून उशिरा उठता तेव्हा तुमचा तो कामाचा हँग ओव्हर उतरलेला वाटत नाही शिवाय मरगळ सुद्धा गेलेली नसते.

त्यामुळे एकच रुटीन कायम ठेवून जर झोपलात आणि उठलात तर आपोआप झोपून सकाळी गजराशिवाय तुम्ही उठू शकता. यात तुमची झोप सुद्धा पूर्ण होते आणि तुम्ही ताजेतवाने सुद्धा होता.

 

fresh-morning-inmarathi

 

२. मनाला मिळणारी शांतता.

सकाळी लवकर उठल्यावर ना कुठला गोंगाट असतो, ना माणसांचा अडथळा! यामुळे सभोवताली असलेल्या शांततेमुळे मानसिक शांतता सुद्धा मिळते. जी तुमच्या स्वभावात थेट उतरते. यामुळे तुम्ही चिडचिडे होत नाही. शांत स्वभावामुळे निर्णय सुद्धा योग्यच घेतले जातात.

आता हे सगळे फायदे तर तुम्ही जाणून घेतलेत, पण आता सकाळी लवकर उठणं म्हणजे काही सेकंदाचे काम नव्हे. त्यासाठी सुद्धा सवय लावून घ्यावी लागणार आहे. तर त्यासाठी खालील काही उपाय तुमच्यासाठी.

हे सुद्धा वाचा

झोपेचं खोबरं झालंय? वाचा, फक्त काही सेकंदात शांत झोपी जाण्याचा उत्तम उपाय!

१. आज १० ला झोपून उद्या ६ ला उठणं हे सहज करता येत नाही.
जर तुम्ही ८ ला उठणारे असाल तर उद्या ७.४५ ला उठा, परवा ७.३० मग ७ असं हळूहळू करून ५ किंवा ५.३० ची वेळ तुम्ही नक्की गाठू शकता.

२. लवकर उठायचं म्हणजे लवकर झोपायचं

 

guy sleeping inmarathi

 

ही सवयही लावून घेतली पाहिजे. त्यासाठी शांत गाणी हा उत्तम पर्याय ठरतो. शिवाय कंटाळवाणं वाटणारं पुस्तक झोपायच्या काही वेळ आधी वाचायला घ्या. ही सवय लागेपर्यंत या पर्यायाचा वापर करा. नंतर हळूहळू त्याच वेळेला झोपायची सवय सुद्धा होऊन जाईल.

३. सकाळी लवकर उठून जी कामं करायची आहेत त्याबद्दल विचार करत रहा.

४. झोपायच्या आधी कमी आहार घ्या.

तर हे आहेत लवकर उठायचे फायदे. आता हे वाचून तुम्ही लवकर उठाल ही अपेक्षा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?