' महिलांची सौंदर्य प्रसाधने बनवणारी ही कंपनी उभारण्यात नेहरुंनी दिलं होतं प्रोत्साहन! – InMarathi

महिलांची सौंदर्य प्रसाधने बनवणारी ही कंपनी उभारण्यात नेहरुंनी दिलं होतं प्रोत्साहन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘मेक इन इंडिया’ चा प्रसार हा काही वर्षांपासून होतांना आपण बघत आहोत. भारतात आयात होणाऱ्या वस्तूंचं प्रमाण कमी व्हावं आणि प्रत्येकाने ‘आत्मनिर्भर’ व्हावं हा उद्देश खरंच खूप कौतुकास्पद आहे.

या हेतूला जर प्रत्येक भारतीयाने प्रतिसाद दिला तर भारत हा खरंच एक महासत्ता होऊ शकतो. काय नाहीये आपल्याकडे? उत्पादक, ग्राहक, खरेदी करण्याची क्षमता, जागा सगळंच तर आहे. गरज आहे ती फक्त आपल्या गोष्टींना प्रथम प्राधान्य देण्याची.

शेतीप्रधान असलेल्या आपल्या देशाला ज्याप्रकारे खाद्य पदार्थांसाठी कोणावर अवलंबून रहावं लागत नाही.

तसंच इतर गोष्टींसाठी सुद्धा अवलंबून राहू नये याची तरतूद करण्याची सुरुवात भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधीच सुरू झाली होती.

सौंदर्य प्रसाधनांसारख्या वस्तूंना भारतात आयात करण्याची गरज कमी व्हावी या साठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेतला होता.

 

makeup clean inmarathi1

 

हा तो काळ होता जेव्हा फक्त श्रीमंत घरातील महिलाच फक्त मेकअपला लागणाऱ्या वस्तू परदेशी चलनात विकत घेऊ शकत होत्या. ज्यामुळे भारतीय चलनाची किंमत सतत कमी होत होतीआणि परकीय चलनाची किंमत वाढत होती!

मध्यम वर्गातील गृहिणी महिलांपर्यंत चांगले सौंदर्य प्रसाधनं पोहोचणं अवघड होतं. त्या काळात घरी तयार केलेल्या सुरमा, मुलतानी माती वरच स्त्रियांना समाधान मानावं लागायचं.

ब्रिटिशांनी १०० वर्ष राज्य केलेल्या आपल्या देशात परदेशी वस्तूंचा पगडा तेव्हा सुद्धा बघायला मिळायचा. त्यावेळी जे आर डी टाटा यांनी भारतीयांची ही गरज ओळखली आणि सौंदर्य प्रसाधनं भारतातच तयार करायचं ठरवलं.

अशी नोंद आहे की, तत्कालीन भारतीय पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी प्रोत्साहित केले होते. टाल्कम पावडर हेच तोपर्यंत एकमेव तयार होण्याचं साधन भरतीयांना माहीत होतं.

 

jawaharlal nehru inmarathi

 

सौंदर्य प्रसाधन म्हणजे उंची वस्तू अशी मान्यता असलेल्या आपल्या देशात जे आर डी टाटा यांच्यासमोर सर्व स्तरातील लोकांना आवडेल असं कोणतं कंपनी चं नाव काय ठेवावं? हा एक प्रश्न होता.

लक्ष्मी लिप्स्टीक किंवा लक्ष्मी काजल हे नाव पूर्ण भारतात मान्य होईल असं पंडित नेहरूंनी जेआरडी टाटा यांना सुचवलं. हा सल्ला किंवा विनंती मान्य करून टाटा ग्रुप ने ‘लॅक्मे’ या नावाने कंपनी ची सुरुवात १९५२ मध्ये केली.

भारतातील वातावरण, त्वचा, रंग याबद्दलच्या अपेक्षा समोर ठेवून टाटा ग्रुप ने कंपनी ला आकार दिला होता. लॅक्मे ही १००% ‘टाटा ऑइल मिल्स’ ची कंपनी होती. हे सुद्धा कदाचित काही लोकांना माहीत नसेल.

 

lakme inmarathi

 

लॅक्मेची भरभराट होण्यास त्यावेळी सुरुवात झाली जेव्हा नवल टाटा यांच्या पत्नी सिमोन टाटा यांनी १९६१ मध्ये कंपनीचा पदभार सांभाळला होता.

१९८२ मध्ये सीमोन या कंपनीच्या चेअरमन पदी विराजमान झाल्या. आपल्या व्यवस्थित राहण्याच्या आणि मेकअप च्या नवनवीन वस्तू बाजारात आणण्याच्या कामामुळे ‘लॅक्मे’ चा व्यवसाय वाढत गेला.

सतत घेतलेल्या मार्केट फीडबॅक मुळे आणि त्यानुसार केलेल्या सुधारणांमुळे अल्पावधीतच ‘लॅक्मे’ चे प्रॉडकट्स हे घराघरात पोहोचले.

२००७ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सिमोन टाटा यांनी त्यांचे हे विचार लोकांसमोर मांडले होते, “माझी एक चुलत बहीण पॅरिसला रहायची. मी तिथे गेल्यावर आम्ही खूप फिरायचो आणि तिथल्या कॉस्मेटिक चे सँपल गोळा करायचो.

प्रोफेशनल मेकअप कसा केला जातो? त्वचेची काळजी कशी घ्यावी? हे मी स्वतः तिथून शिकून आले. कॉस्मेटिक्स या पूर्ण क्षेत्राचा खूप अभ्यास केला.”

१९८० च्या दशकात भारतीय सरकारने सौंदर्य प्रसाधनांवर एक्साईझ ड्युटी वाढवली होती. या विरोधात सिमोन टाटा या स्वतः तत्कालीन भारतीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना भेटल्या.

 

simone tata inmarathi

 

सिमोन यांनी या निर्णयाच्या विरोधात असलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया व सही असलेलं पत्र सरकारला जमा केलं. पुढच्या निवडणुकीत एक्ससाईझ ड्युटी चा हा निर्णय मागे घेण्यात आला.

मार्केटिंग कडे लक्ष देतांना सिमोन टाटा यांनी ८० च्या दशकातील सुपरमॉडेल ‘श्यामोली वर्मा’ यांना सर्वात पहिली ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं.

लोकांचं ‘लॅक्मे’ ब्रँड बद्दलचं आकर्षण यानंतर वाढत गेलं. याशिवाय, रेखा आणि नंतर ऐश्वर्या राय यांना कंपनीचं ब्रँड अँम्बेसेडर केल्याने ‘लॅक्मे’ च्या जाहिराती सुद्धा लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली.

रिटेल सेक्टर मध्येच फक्त काम करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीला लॅक्मे ही कंपनी १९९६ मध्ये २०० करोड किमतीला विकण्यात आली.

 

aishwarya lakme inmarathi

 

लॅक्मेच्या ब्रँडला हिंदुस्तान युनिलिव्हर चांगला न्याय देऊ शकेल असा विश्वास टाटा ग्रुप ला होता म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता.

२०१७-१८ च्या आकडेवारी नुसार, युनिलिव्हर कडे असलेल्या लॅक्मे ब्रँड ने आता विक्रीमध्ये १००० करोड रुपयांचा पल्ला गाठला आहे. आज कंपनीचं काम ७० वेगवेगळ्या देशात चालतं. लॅक्मे मध्ये सध्या ३०० पेक्षा जास्त प्रॉडकट्स आहेत.

लॅक्मेच्या प्रॉडक्ट रेंज मध्ये असलेली विविधता, वेगवेगळ्या प्रकारच्या स्किन टोन नुसार तयार केले जाणारे प्रॉडक्ट यामुळे ‘लॅक्मे ला लोकप्रियता सुद्धा मिळाली.

भारतीय महिलांची त्वचा, त्याला साजेसा फॉर्म्युला तयार करण्यासाठी टाटा ग्रुपने कित्येक परदेशी कंपन्यांचा सुद्धा सल्ला घेतला. इतका अभ्यास असल्यानेच कोणतीही स्पर्धक कंपनी लॅक्मेच्या जवळपास सुद्धा येऊ शकलं नाही.

 

lakme fashion week inmarathi

 

‘लॅक्मे फॅशन वीक’ सारख्या कार्यक्रमावरून लॅक्मेचं आणि भारतीय फॅशन आणि सौंदर्य प्रसाधन क्षेत्रासोबत असलेलं दृढ नातं दिसून येतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?