कुसुमाग्रजांची ‘फक्त लढ म्हणा’ ही कविता तुम्ही वाचलीत, आज ती प्रत्यक्ष ‘बघा’!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मराठी साहित्य, कविता यांची एक समृद्ध परंपरा आहे. ओव्या, भारुड, लोकगीतं, ललित काव्य, प्रेरणादायी काव्य हे आपल्या भाषेला अजून समृद्ध करतात. याच समृद्ध वारसा जपणाऱ्या मराठीला अनेक कवींनी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
कुसुमाग्रजांची “कणा” ही कविता त्यातलीच एक! शाळेत असताना सगळ्यांनी ही कविता वाचली असले, अनेकांनी यातून प्रेरणा घेतली असेल..त्यातील “फक्त लढ म्हणा” हे शब्द जास्त लोकप्रिय आहेत
—
‘ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा!
कवी – कुसुमाग्रज
===
कुसुमाग्रजांची “कणा” ही कविता म्हणजे प्रेरणेचा एक भरभक्कत स्त्रोतच! अनेकांना या कवितेने प्रेरणा दिली आहे. मराठी साहित्यात या कवितेचे स्थान अजरामर आहे आणि कायमच राहील.
आतापर्यंत आपण ही कविता नेहमी याच रूपात ऐकत आलोय, वाचत आलोय, पण फेसबुकवर राज जाधव यांनी “कुसुमाग्रजांची माफी मागून” या कवितेला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न केलाय…
त्यांच्या या प्रयत्नाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद आहे. खास करून तरुणाईला हा जुन्या कवितेचं हे नवं स्वरूप फारचं आवडलंय.. बघूया काय आहे
===
—
—
—
—
—
—
—
—
—
—
—
—
—
===
हे शेअर करण्यामागे केवळ मनोरंजन हा हेतू असून कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.