' डिफेन्स मिनिस्टरपासून आयफोनच्या सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देणारा चलाख चोर! – InMarathi

डिफेन्स मिनिस्टरपासून आयफोनच्या सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देणारा चलाख चोर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माहिती आणि तंत्रज्ञान हे क्षेत्र मागच्या काही वर्षांपासून फार झपाट्याने प्रगती करत आहे. आता कोणत्याही कार्यालयात आधी सारखे कागदाचे ढीग टेबलवर बघायला मिळत नाहीत.

एक लॅपटॉप किंवा सरकारी कार्यालयात डेस्कटॉप हा कामासाठी दिलेला असतो. एखाद्या व्यक्ती चा फोन नंबर लक्षात ठेवणे किंवा ५ व्यक्तींपेक्षा जास्त लोकांचे वाढदिवस लक्षात असणे ही गोष्ट कालबाह्य होत चालली आहे.

आधी कम्प्युटर आणि आता मोबाईल हे आपल्या समरणशक्तीचं काम करू लागलं. एकदा तो डेटा फीड केला की आपण नवीन कामांकडे लक्ष देऊ शकतो हे एक आपलं गणित झालं आहे.

आज ज्या कंपनी कडे ‘लोकांचे ईमेल, फोन नंबर हा डेटा’ जास्त ती कंपनी जास्त श्रीमंत हे मानलं जातं. प्रगती होतांना त्यासोबत विकृती सुद्धा वाढत असते.

काही वर्षांपूर्वी चोरी ही घरात केली जायची. आता चोरांना माहीत आहे की, जर आपण बँकेच्या लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकलो तर जास्त मोठी चोरी होऊ शकते.

 

hacking inmarathi

 

ते साध्य करू शकणे म्हणजेच हॅकिंग करणे असं साध्या भाषेत म्हणता येईल.

काही वर्षांपासून ‘हॅकर’ हे एक प्रोफेशन म्हणून अस्तिवात आलं आहे. त्यामध्ये एथिकल आणि अन-एथिकल हे दोन प्रकार असतात.

एथिकल हॅकर हे ते लोक असतात जे की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारला मदत करत असतात. अन-एथिकल हे ते लोक जे सर्व फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करत असतात.

जेव्हा पासवर्ड किंवा CVV हे चोरीला जाऊ लागले तेव्हा पासून थंब इम्प्रेशन म्हणजेच आपल्या भाषेत ‘अंगठा’ हे त्या व्यक्तीने दिलेली सहमती मान्य केली जाऊ लागली.

मध्यंतरी, जर्मनी मध्ये एक हॅकर लोकांचं संमेलन झालं. ज्यामध्ये हे सत्य समोर आलं आहे की, “तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या क्लिअर फोटो वरून त्या व्यक्तीच्या बोटाचे ठसे कॉपी करू शकता.” हे घडलं आहे.

जर्मनी च्या सरंक्षण मंत्री उर्सुला वोन डेर लियेन यांच्या सोबत हे घडलं आहे. जॅन क्रिसलर – हॅकर लोकांचा ‘सम्राट’ त्याने हे काम VeriFinger या ऍप च्या सहाय्याने हे काम केलं आहे.

 

jan krissler inmarathi

 

जॅन क्रिसलरने जर्मनी च्या सरंक्षण मंत्र्याचे काही फोटोचा संग्रह केला आणि त्यातून बोटाचे ठसे त्याने तयार केले.

हे फोटो संरक्षण मंत्रीच्या प्रेस रिलीज मध्ये मीडिया सोबत बोलतांना प्रकाशित केले होते आणि एक फोटो त्याने स्वतः त्या एका कार्यक्रमासाठी आलेल्या असतांना ३ मीटर च्या अंतरावरून क्लिक केला आणि त्यावरून त्यांच्या बोटाचे ठसे त्याने तयार केले.

फोटो काढण्याची आणि ते अपलोड करण्याची प्रचंड घाई असलेल्या व्यक्तींनी या गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे.

जॅन क्रिसलर हा जर्मनीचा एथिकल हॅकर आहे. त्याने हे शक्य आहे हे स्वतःच जाहीर केलं. “इथून पुढे सगळे राजकीय नेते हे लोकांसोबत बोलताना ग्लोव्हज घालून बोलतील” असा विनोद सुद्धा केला.

हॅकर लोक हे आपल्या मोबाईल कॅमेरा ला सुद्धा हॅक करू शकतात हे सुद्धा सिद्ध झालं आहे. हॅकर्सचं जर्मनी मध्ये झालेलं हे संमेलन हे एखाद्या रोबोटिक्स च्या सिनेमासारखं होतं.

मोबाईल कॅमेराच्या एक्सेस वरून एखाद्या व्यक्तीच्या पासवर्ड पर्यंत कसं पोहोचलं जाऊ शकतं? हे या संमेलनात स्टेजवरून दाखवण्यात आलं.

जॅन क्रिसलरने या आधी सुद्धा बायोमेट्रिक सिक्युरिटी याबद्दल भाष्य केलेलं आहे. २०१३ मध्ये त्याने apple च्या iphone5S च्या टच आय डी फोन लाँच होण्याच्या २४ तासाच्या आत क्रॅक केला होता.

 

scan finger inmarathi

 

आयफोनच्या स्क्रीन ला डावीकडे प्रेस करून त्याने ग्राफिन आणि लाकडी ग्लु च्या सहाय्याने बोटाचा ठसा स्क्रीनवर उमटवला होता आणि फोन अनलॉक केला होता. यासाठी फक्त फोन सोबत असणं आवश्यक आहे.

बायोमेट्रीक एक्सेस वर होणाऱ्या या यशस्वी हॅकिंग नंतर सायबर क्राईम आणि मोबाईल कंपन्यांना अधिकच सतर्क होण्याची गरज आहे.

सायबर क्राईम ने एका पत्रकात हे सांगितलं आहे की –

“आपल्या बोटाचा ठसा, फोटो आयडी स्कॅन यापेक्षा त्यांनी पासवर्ड हे जास्त क्लिष्ट ठेवावेत ज्यांना क्रॅक केलं जाऊ शकणार नाही. सेकंड लेवल ऑथंटीकेशन म्हणजेच दोनदा होणारी चेकिंग ही पद्धत आमलात आणावी. जेणेकरून हॅकिंग टाळता येईल.”

एका तज्ञाने आपलं मत देतांना हे सांगितलं की, “तुमच्या बोटांच्या एक्सेस पेक्षा तुमच्या डोक्यातील पासवर्ड हा जास्त सुरक्षित असतो. जर का आपण तो लक्षात ठेवला आणि लक्षपूर्वक टाईप केला तर कोणी तो तुमच्या डोक्यातून काढू शकत नाही.”

जॅन क्रिसलरला हॅकिंग च्या दुनियेत ‘स्टारबग’ या नावाने ओळखलं जातं. Choas कम्प्युटर क्लब (CCC) हा ग्रुप ते चालवतात. स्मार्टफोन स्क्रीन किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणावरून त्या व्यक्तीच्या बोटाचे ठसे घेतले जाऊ शकतात हे या ग्रुपने सिद्ध केलं आहे.

 

CCC inmarathi

 

इथून पुढे त्याची सुद्धा गरज पडणार नाही असं या ग्रुपचं म्हणणं आहे याचं कारण म्हणजे आपल्या मोबाईलचे हाय रेझोल्युशनचे फ्रंट आणि बॅक कॅमेरा. स्पष्ट फोटो, स्पष्ट ठसा सुद्धा देऊ शकतो.

सप्टेंबर २०१३ मध्ये CCC च्या हॅकर्स ने ग्लास वरून फिंगरप्रिंटचे फोटो काढले होते, त्याला स्कॅन केलं होतं आणि लेझर प्रिंटर च्या सहाय्याने त्याची प्रतिकृती तयार केली होती.

त्यामुळे ‘फिंगर अनलॉक’ या फिचर ने सोय जरी करून दिलेली असली तरी त्याचा वापर कमीत कमी करावा असं सायबर तज्ञ सांगतात. तुमच्या मोबाईल मध्ये किती माहिती आहे त्यानुसार सुरक्षा प्राधान्य दिलं जावं.

हॅकर्स जश्या नवीन पद्धती काढत आहेत तश्या आपण सुद्धा आपल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठी नवीन पद्धती शोधून काढणं गरजेचं आहे. मोबाईलची स्क्रीन ठराविक वेळेनंतर पुसण्यापासून आपण ही सुरुवात करू शकतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?