' पडद्यामागे राहून घडलेला यशस्वी उद्योजक, वाचा ‘बिग बीं’च्या खऱ्या “बिग”ब्रदरचा प्रवास – InMarathi

पडद्यामागे राहून घडलेला यशस्वी उद्योजक, वाचा ‘बिग बीं’च्या खऱ्या “बिग”ब्रदरचा प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

अमिताभ बच्चन.. मॅन ऑफ द मिलेनियम, अँग्री यंग मॅन, उत्तम निवेदक, उत्तम कविता वाचक असं किती काय काय अमिताभ बच्चन यांच्याबाबत म्हटलं जातं. हे ऐकून वाचून त्यांच्याबद्दलचा आदर अजूनच वाढतो. सहसा कसल्याही वादात न पडणारे अमितजी खरोखरच जेष्ठ आहेत. वागण्यात बोलण्यातही..

अभिषेक बच्चन त्यांचा मुलगा, ऐश्वर्या राय बच्चन सून. जया बच्चन त्यांची पत्नी. या पण एकेकाळी नावाजलेल्या अभिनेत्री होत्या, पण त्यांची मुलगी श्वेता बच्चन ही ना सिनेमात आली…ना कधी लाईमलाईटमध्ये.

अमिताभ बच्चन यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बहुतेक फिल्मी दुनियेपासून आपलं कुटुंब आणि कौटुंबिक जीवन दूरच ठेवलं आहे. ते कितीही मोठे सेलिब्रिटी असले, तरी त्यांची पेज थ्री प्रतिमा फार कमी प्रमाणात दिसते.

ते सगळ्या प्रकारच्या जाहिराती करतात, केबीसीचा शो होस्ट करतात..अतिशय बिझी शेड्युल असलेला हा बहुगुणी अभिनेता आहे. मात्र त्यांचं कुटुंब, त्यांची विशेष माहिती ते उपलब्ध होऊ देत नाहीत. फेसबुकवर..ट्विटरवर त्यांना पाहू शकता, पण त्यांनी आपलं खाजगी आयुष्य थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे.

 

amitabh bachchan kbc inmarathi1

 

श्वेता बच्चन प्रमाणेच अशी अजून एक व्यक्ती आहे, जी अमिताभ बच्चन यांच्या अतिशय जवळची आहे, पण त्यांनीही स्वतःला या सिनेमाच्या चकचकाटापासून लांब ठेवलं आहे. कोण आहे ती व्यक्ती? अजिताभ बच्चन.. अमिताभ बच्चन यांचा भाऊ.

सुरुवातीला जेव्हा अमिताभ बच्चन यांनी कारकीर्द सुरू केली तेव्हा त्यांचे आर्थिक व्यवहार अजिताभच बघायचे. मितभाषी असलेले अमिताभ बच्चन पार्ट्यांना जायला टाळाटाळ करत किंवा जरी गेले तरी एका कोपऱ्यात बसून रहात. सिनेमात चमकायचं तर असं लोकांपासून दूर राहीलं तर काम कसं मिळणार?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बोलणाऱ्या माणसाची मातीही खपते तर अबोल माणसाचे गहूही खपत नाहीत हा जगाच नियम आहे. अजिताभनी हे काम आपल्याकडं घेतलं. सिनेमाचे आर्थिक व्यवहार पाहणं, इतर गोष्टी पाहणं वगैरे.. अजिताभच या कामात लक्ष घालत होते. म्हणूनच अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीत पायाभरणीचं मोलाचं काम अजिताभ यांनी केलं आहे.

 

ajitabh bachchan inmarathi

 

सध्या अजिताभ बच्चन हे उत्तम बिझनेसमन आहेत आणि ते भारतात नाही रहात, पण या दोन्ही भावंडांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचे भावबंध खूप चांगले आहेत.

अजिताभ बच्चन हे अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहेत. या दोन्ही भावांनी नैनीताल येथील शेरवुड काॅलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं. सिनेमात येण्यापूर्वी अमिताभ बच्चन छोट्या मोठ्या नोकऱ्या करत होते, तर अजिताभना व्यवसाय करण्यातच धन्यता वाटत होती. पुढं अमितजींनी सिनेमात काम करायला सुरुवात केली आणि अजिताभ लंडनला गेले.

अजिताभ यांचं कुटुंब –

 

तिथं जाऊन त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. रमोलांनी पण त्यांना खूप मदत केली. १५ वर्षं ते आपल्या कुटुंबाला घेऊन लंडनमध्ये रहात होते. तीन मुली आणि एक मुलगा असं भरगच्च कुटुंब असलेले अजिताभ लंडनमध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात होते.

त्यांची पत्नी रमोला काॅश्च्यूम डिझायनर म्हणून काम करत होत्या. त्यांचे काॅश्च्यूम सिनेमात पण वापरले गेले. २००७ पर्यंत अजिताभ लंडनमध्ये होते. मात्र त्यांची आई तेजी बच्चन यांच्या निधनानंतर आपला कुटुंबकबिला घेऊन अजिताभ भारतात परतले.

या दोघा भावांना इतकं अतिशय काम असतं, की ते लवकर एकमेकांना भेटूही शकत नाहीत, पण जिथं हृदयं जुळलेली असतात तिथं भेट होणं न होणं हे गौणच असतं.

 

रमोला याही यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जात. नम्रता, निलिमा आणि नैना या तीन मुली, तर भीम हा एक मुलगा अशा चार मुलांची आई असलेल्या रमोला अतिशय हुशार आणि कर्तृत्ववान महिला आहेत. २०१४ साली त्यांना एशियन आॅफ द ईयर हा किताब देऊन गौरविण्यात आले आहे.

यांची मुलंही उत्तम करिअर घडवत आहेत. भीम बँकर आहे, तर नम्रता पेंटिंग्ज उत्तम बनवते. हे सगळे बच्चन कुटुंबीय एकत्र येतात तेव्हा खूप धमाल उडवून देतात. स्वतः अजिताभ आणि रमोला अमिताभ बच्चन यांचे जबरदस्त फॅन आहेत. दोघेही त्यांचा येणारा सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघतात. दीवार आणि शोले हे त्यांचे आवडते सिनेमे आहेत.

हे सगळं वाचून एकच गोष्ट लक्षात येते.. भाऊ गरीब असोत, श्रीमंत असोत त्यांना एकत्र बांधून ठेवणारा असतो तो प्रेमाचा धागा. तो जितका मजबूत तितकं नातं घट्ट.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?