' या १५ गोष्टी कटाक्षाने टाळल्यात तर यश हमखास तुमचंच आहे! – InMarathi

या १५ गोष्टी कटाक्षाने टाळल्यात तर यश हमखास तुमचंच आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

यशस्वी होण्यासाठी आपण प्रत्येक जण रोज मेहनत करत असतो. यशाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. साधारणपणे तुम्ही जे काम करतात त्यामध्ये प्राविण्य मिळवणे आणि आपला एक ठसा उमटवणे याला आपण यशस्वी होणं असं ढोबळ मानाने म्हणू शकतो.

प्रत्येकाच्या क्षेत्रानुसार, यशस्वी होण्यासाठी असणारे मापदंड वेगवेगळे असू शकतात. पण, “यशस्वी मनुष्य म्हणजे कोण?” हे बघण्याचा दृष्टिकोन हा सर्वांचा, सर्वांसाठी सारखाच असतो.

‘तुमच्या मताला किंमत असणे’ हे सुद्धा एका यशस्वी पुरुषाचं लक्षण म्हणता येईल. तो मान मिळवण्यासाठी एक मोठा आणि प्रसंगी खडतर प्रवास यशस्वी पुरुषाला करावा लागत असतो.

 

successful guy inmarathi

 

शिस्त, सातत्य, प्रामाणिकपणा आणि फोकस हे यश मिळवण्यासाठी अत्यावश्यक चार स्तंभ म्हणता येतील. स्कॉलरशीप ची परीक्षा पास होणे म्हणजे या सर्व गुणांचा संगम असणे असं म्हणता येईल.

यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी करणं टाळावं सुद्धा लागतं. जसं आपण, एखाद्या हॉस्पिटल मध्ये एखाद्या आजाराबद्दलच्या बोर्ड वर लिहिलेल्या ‘DO’s आणि Dont’s” वाचतो.

तसंच यश मिळण्यासाठी सुद्धा काही डोंट्स असतात. ते कोणते ते जाणून घेऊयात :

 

१. आत्मविश्वास नसणे :

 

कोणतीही स्पर्धापरीक्षा देतांना तुमचा “मी ही परीक्षा क्लिअर करेल” हा आत्मविश्वास परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आवश्यक असतो. आज तुम्हाला जी गोष्ट येत नसेल ती उपलब्ध करून देण्यासाठी इंटरनेट उपलब्ध आहे.

जगातील कोणताच विषय असा नसेल ज्याबद्दल इंटरनेट वर माहिती, नमुना उपलब्ध नाहीये.

स्पर्धा परीक्षा कोणतीही असो – GRE, TOFEL, GMAT त्या परीक्षांसाठी लागणारी सगळी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे हे स्वतःला सांगत रहा. आत्मविश्वास नक्कीच वाढेल.

२. वेळेचा अपव्यवय :

वेळ ही एक अनमोल वस्तू आहे जी की प्रत्येकाकडे सारखीच आहे. तुम्ही त्याचा विनियोग कसा करतात यावर तुमच्या यशाचं शिखर किती उंच असेल ते ठरत असतं.

वेळेला ज्याने जितकं महत्व दिला तो तितका पुढे गेला हे साधं, सोपं समीकरण आहे.

३. चुकांवर चर्चा करत बसणे :

क्रिकेट मध्ये जसं विजय, पराजय हे सुरुच असतात आणि खेळाडू ला प्रत्येकवेळी त्याच्या त्या दिवशीच्या खेळाकडे लक्ष द्यावं लागतं. त्याचप्रमाणे आपणही भूतकाळात घडून गेलेल्या चुकांना कमी महत्व देणं अत्यंत आवश्यक आहे.

तसं नाही झालं तर आपण त्याच मोड मध्ये जाऊ शकतो आणि त्याच चुका परत करू शकतो.

चुका होतील हे मान्य करूनच कामाला सुरुवात करा आणि झालेल्या चुकातून योग्य तो धडा शिका आणि ती चूक परत होणार नाही हे बघा.

४. धीर सोडू नका :

 

stay strong inmarathi

 

दुसऱ्या देशात जाऊन शिकणे, चांगल्या पगाराची नोकरी असणे हे तुमच्यासाठी का आवश्यक आहे?

हे स्वतःला क्लिअर करा. “माझे मित्र तिकडे गेले आहेत, म्हणून मी ही जाणार.” या विचाराने तुम्ही अधीर होऊ शकता. धीर सोडू नका. तुमची सुद्धा संधी नक्की येईल हे स्वतःला सांगत रहा.

५. कौतुकाची अपेक्षा करणे :

तुम्ही खूप अभ्यास करत आहात याचं कौतुक व्हावं अश्या कधी आपल्या अपेक्षा नकळत होत असतात. परीक्षा क्लिअर केल्यावर सुद्धा कोणीही लगेच ऑफर लेटर घेऊन येणार नाहीये.

तुमच्या टॅलेंट ला तुम्हाला कोणत्या न कोणत्या वेळी विकावंच लागतं. काहींना सुरुवातीला तर काहींना काही वर्षांनी इतकाच काय तो फरक असतो.

६. वेळच नाहीये :

“मला खूप काही करायचं आहे.” पण, वेळच नाहीये. ही काही जणांसमोर समस्या असते. नोकरी, कुटुंब सांभाळून त्यांना प्रगती करण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यायची असते.

त्यांनी सतत वेळ कुठून काढता येईल हे बघायला पाहिजे. सकाळी ९ वाजता ऑफिस असेल तर सकाळी ४ वाजता उठून आपण अभ्यास करू शकतो.

सकाळी ७ वाजता निघायचा असेल तर झोपायच्या आधी रात्री १० वाजता आपण आपल्या स्वप्नांसाठी वेळ काढणं शिकायला पाहिजे.

७. अडचणींना कंटाळणे :

तुम्ही अभ्यास सुरू केल्यावर कधी लाईट जाईल, कधी नोट्स सापडणार नाहीत तर कधी इंटरनेट बंद पडेल. अडचणी या तुम्हाला अजून स्ट्रॉंग करायला तुमच्या समोर येत असतात.

आपल्या पेक्षा इतर लोकांना जास्त अडचणी आहेत हे लक्षात असू द्या.

८. आरामाची आवड :

 

relaxing inmarathi

 

काही तरी वेगळं करायचं असेल तर ८ तास झोप, वेळच्या वेळी खाणं, मनासारखं सगळं होणं या गोष्टी विसराव्या लागतात. निदान यशाच्या एका विशिष्ठ उंचीवर पोहोचेपर्यंत तुम्हाला आराम हा विसरावा लागतो.

इतकी स्पर्धा असणाऱ्या भारतासारख्या देशात तर कधी आपण कासव होऊ आणि ससा मागून येऊन पुढे निघून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही.

९. माझ्यात काहीतरी कमी आहे :

बऱ्याच जणांच्या मनात हा एक न्यूनगंड असतो की, मी गरीब घरात जन्मलो आहे किंवा माझ्याकडे काही वस्तू नाहीयेत किंवा शाळेत मी तितका हुशार नव्हतो.

हे सगळं जितक्या लवकर आपण विसरू तितकं आज मध्ये जगू आणि कोणत्याही परीक्षेत अपेक्षित यश नक्कीच मिळवू.

१०. नापास होण्याची भीती :

“मी पास झालो नाही तर?” असे प्रश्न स्वतःला विचारून परेशान करू नका. पूर्ण प्रयत्न करण्याकडे आणि आपलं बेस्ट देण्याकडे लक्ष द्या. सकारत्मक लोकांसोबत रहा. यश तुमचंच आहे.

११. स्वतःचा सामर्थ्य ओळखा :

 

strenghth inmarathi

 

शाळेत असतांना तुम्हाला शिक्षकांकडून किंवा वर्गमित्रांकडून मिळालेली वागणूक ही तुमच्या मार्क्स मुळे होती. तुमचे मार्क्स हे तुमचं सामर्थ्य ठरवू शकत नाही.

तुम्ही स्वतःला सर्वात चांगलं ओळखू शकता. सामर्थ्य ओळखा आणि त्यावर विश्वास ठेवा.

१२. ध्येय नसणे किंवा खूप जास्त ध्येय असणे :

“मी हे पण करू शकतो”, “मी ते पण करू शकतो” यापेक्षा मी सर्वात चांगलं काय करू शकतो हे स्वतःला माहीत असणं फार आवश्यक आहे. सर्वात चांगल्या जमणाऱ्या गोष्टीला सर्वात जास्त वेळ देणे हा यश मिळवण्याचा राजमार्ग आपण म्हणू शकतो.

१३. भविष्याचा अति विचार :

भविष्याबद्दल सतत विचार करू नका आणि विचार केला तर चांगलाच करा. जसं की, काही वर्षांनी मी एखादा व्यवसाय करत असेल, माझी टीम माझ्यासोबत काम करून खूप आनंदी असेल.

टिपिकल जॉब, छान बॉस, वेळच्या वेळी पगार यापेक्षा स्वतःचा ब्रँड कसा तयार करता येईल त्याकडे लक्ष द्या. ती काळाची गरज आहे.

१४. कामाला नाव ठेवणं टाळा :

काम वाढलं की काहींना त्याबद्दल तक्रार करायची सवय असते. ही सवय नकळत आपल्याला कामापासून दूर करत असते.

एक तर आवडीचं काम निवडा किंवा तुमच्या वाटेला आलेल्या कामावर मनापासून प्रेम करा. यशस्वी व्हायचं असेल तर या व्यतिरिक्त तिसरा पर्याय नाहीये.

१५. झटपट फळाची अपेक्षा करू नका :

“मी इतकी मेहनत केली, आता मला त्याचं इतकं फळ मिळालंच पाहिजे.” ही अपेक्षा कमी वेळात करणं अत्यंत चुकीचं आहे. काही वेळेस तुमची मेहनत ही योग्य दिशेने असते.

पण, काही नैसर्गिक संकट किंवा मार्केट मध्ये उतारचढाव येतात जे की तुमच्या नियंत्रणात नसतात. २०२० या वर्षी कोरोना मुळे कित्येक लोकांना अपेक्षित मिळालं नाही.

 

2020 inmarathi

 

पण, त्यांना हे वर्ष विसरून जाणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे.

आपल्याला आजूबाजूला कित्येक चांगल्या गोष्टी सुद्धा घडत असतात. पण, आपल्याला त्या दिसत नाहीत. कारण, आपण शांतपणे त्यांच्याकडे कधी बघतच नाहीत.

आपल्याला मिळालेल्या निरोगी आरोग्याबद्दल कृतज्ञ असणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. असा स्वभाव असल्यास चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील आणि यश नक्कीच तुमच्या हातात असेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?