' भारतीय सैन्य काय चीज आहे याची पुसटशी कल्पना – लडाखमध्ये जे काही सैन्य करतंय त्यावरून! – InMarathi

भारतीय सैन्य काय चीज आहे याची पुसटशी कल्पना – लडाखमध्ये जे काही सैन्य करतंय त्यावरून!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय सीमेवर तैनात असलेले आपले जवान हे आपल्यासाठी किती गोष्टींचा त्याग करतात हे आपण सगळेच जाणतो.

सैनिकांचं हे योगदान लक्षात घेऊन भारताचे माननीय पंतप्रधान काही वर्षांपासून त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करत आहेत ही एक समाधानाची आणि सैन्याचं मनोबल वाढवण्याची बाब म्हणता येईल.

देशसेवेचं व्रत घेतलेला आपला जवान हा कायम आपल्यासाठी सीमेवर तैनात असतो. ऋतू कोणताही असो. कितीही ऊन, वारा किंवा पाऊस असू द्या… सैनिक हा कधीच सुट्टीवर नसतो.

 

indian-soldier-maratthipizza00

 

कॅलेंडर चा महिना बदलताना आपण या महिन्यात किती जास्तीच्या सुट्ट्या आहेत? आणि कोणता सण रविवारी आला म्हणून आपली सुट्टी वाया गेली हे आवर्जून बघत असतो.

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण इतके गुरफटलेलो आहोत की आपल्याला सैन्याची आठवण ही फक्त १५ ऑगस्ट, २६ जानेवारी किंवा युद्धजन्य परिस्थितीच्या वेळेसच येते.

पूर्व लडाख मध्ये तैनात असलेल्या आपल्या सैनिकांच्या राहण्याची पद्धत या लेखात सांगत आहोत. आज कोणताही विशेष दिवस नाहीये. आपल्या जवानांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.

एकीकडे ‘चीन सोबत सुरू असलेला संघर्ष आणि दुसरीकडे कडाक्याची थंडी’ अश्या परिस्थितीतून आपलं सैन्य सध्या जात आहे.

सप्टेंबर पासूनच हे भौगोलिक आव्हान पेलण्यासाठी सैन्याने तयारी सुरू केली आहे. समुद्रसपाटी पासून २००० किमी उंचीवर असलेल्या पूर्व लडाख मध्ये तापमान हे -२० डिग्री पर्यंत खाली जातं.

एका सैनिकाला लडाख मध्ये वर्षभर राहण्यासाठी कमीत कमी खर्च येतो तो १० लाख रुपये इतका असतो.

 

ladakh army inmarathi

 

एका रिपोर्ट नुसार यावर्षीच्या हिवाळी वातावरणात सर्व संरक्षक वस्तू लक्षात घेता हा खर्च मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट असणार आहे.

इंडियन आर्मी च्या जवानांना कोणत्याही वातावरणात योग्य असेल अशी घरं लडाख मध्ये बांधली आहेत. या घरांना बाहेरून वॉटर प्रूफ करण्यात आलं आहे, तर आतून या घरांना हिटर बसवून देण्यात आले आहेत.

सूर्य ऊर्जेच्या मदतीने वीज निर्मिती केली जाते आणि सैनिकांच्या घरातील विद्युत उपकरणं चालवली जातात. -५० डिग्री पर्यंत सुद्धा तापमान कमी झालं तरी ही घरं आतून गरम रहावीत अशी सोय करण्यात आली आहे.

त्याशिवाय, जाड कपडे हे आपल्या सैनिकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. सध्या आपल्या जवानांचा गणवेश हा पॅन्ट, हिरव्या रंगाचं शर्ट आणि वरून पांढऱ्या रंगाचे जॅकेट आणि संरक्षक शुज असा आहे.

इतकं सगळं अंगावर घालून बर्फातून पळायचं हे सुद्धा सोपं नाहीये. सियाचीन सारख्या ठिकाणी असलेलं वातावरण हे सध्या पूर्व लडाख मध्ये बघायला मिळत आहे.

रस्त्यांची समस्या, पिण्याच्या पाण्याची कमतरता, हिवाळ्यात होणारे आजार हे आव्हानात्मक असणार आहे.

१९६२ नंतर यावर्षी पहिल्यांदाच पूर्व लडाख मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करायची गरज भारत सरकारला पडली आहे.

लाईन ऑफ एकच्युल कंट्रोल वर सध्या सुरू असलेला चीन सोबतचा संघर्ष हा तरी सध्याचा प्रश्न आहे. भौगीलिक परिस्थितीची झळ मात्र आपल्या सैनिकांना नेहमीच भोगावी लागणारी आहे.

 

LAC inmarathi

 

लेहचे जनरल कमांडींग ऑफिसर मेजर जनरल यश मोर हे याबद्दल बोलतांना सांगतात की,

“सैनिकांची तब्येत सांभाळणे हे सध्या एक मोठं आव्हान आहे. यावर्षी पूर्व लडाख च्या या सीमेला जम्मू-काश्मीर मध्ये असलेल्या पाकिस्तान च्या सीमेसारखं स्वरूप आलं आहे. आम्ही आवश्यक ती तयारी करून कोणत्याही परिस्थिती चा सामना करण्यास सज्ज आहोत.”

https://scroll.in/article/979590/experts-view-how-the-indian-army-is-fighting-ladakhs-harsh-weather-amid-the-standoff-with-china

कडाक्याच्या थंडीमुळे चीन सोबत चकमक होण्याची शक्यता कमी आहे हे सुद्धा बोललं जात आहे. चुशूल भागात वातावरणाचा सर्वात जास्त त्रास सैन्याला होत आहे.

परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आर्मी हॉस्पिटल मधील बेडची संख्या २०० वरून वाढवून ३०० करण्यात आली आहे. प्रत्येक युनिट साठी एक मेडिकल ऑफिसर सध्या नेमण्यात आला आहे.

१५००० नवीन युनिफॉर्म हे विशेष करून सैन्यासाठी लडाख मध्ये मागवण्यात आले आहेत.

थंडीचा कडाका यावर्षी इतका वाढला आहे की, सूर्य ऊर्जेवर सर्व उपकरणं काम करत नाहीयेत आणि डिझेल वर चालणारी जनरेटर्स ही सतत वापरावी लागत आहेत.

गोठलेल्या नद्या, बर्फाळ रस्ते यामुळे सैनिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा खूप वाट पहावी लागत आहे.

चुशूल-पंगोंग त्सो ला जोडणारा एकच रस्ता आहे जो की बर्फ पडल्याने ट्रक चालवण्यास खूप कठीण आहे आणि एकदा की गाडी कोणत्या कारणाने खराब झाली तर पूर्ण रोड किती तरी वेळ जाम असतो.

 

ladakh pangong inmarathi

 

कारण, हा सिंगल लेन रोड आहे. कोरोना मुळे आपल्या सैन्याच्या अडचणीत अजूनच भर पडली आहे.

मे महिन्यापासून सुरू झालेल्या या परिस्थितीने कित्येक जवानांना दिल्ली आणि चंदिगढ सारख्या ठिकाणीच “पुढची सूचना मिळेपर्यंत” थांबावं लागलं होतं.

लडाख पर्यंत पोहोचलेल्या सैन्याला सुद्धा २१ दिवस क्वारंटाईन व्हावं लागत होतं आणि त्यामुळे इतर सैनिकांना जास्त मोठ्या भागात गस्त घालावी लागत होती.

हिवाळ्याच्या महिन्यात सैन्या समोर येणाऱ्या या अडचणी इथेच संपत नाहीत. या दिवसात दर वर्षी आग लागण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेलं असतं.

इंधनाचा वाढलेला वापर, विद्युत उपकरणावर आलेला लोड हे त्याची कारणं सांगता येतील. एकही अपघात न होऊ देणं हे सुद्धा इंडियन आर्मी च्या जवानांसाठी एक आव्हान असतं.

एक जवान आणि त्याच्याकडून किती त्या अपेक्षा?

त्याने शत्रूंशी सुद्धा लढावं, हवामानाशी सुद्धा आणि ट्रान्सपोर्ट सिस्टीम सोबत सुद्धा. बेसिक गोष्टींनाच इतका संघर्ष सहन करावा लागणारे आपले सैनिक हे जगातील सर्वात शूर सैनिक म्हणून त्यामुळेच गणले जातात.

 

ladakh lake inmarathi

 

“कधीच हार मानायची नाही” हा त्यांचा स्वभाव आहे म्हणूनच ते या परिस्थितीत सुद्धा काम करू शकतात.

सैनिकांना सहन कराव्या लागणाऱ्या या समस्यांसमोर आपल्याला या थंडीमुळे होणारे आजार अगदीच क्षुल्लक वाटतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?