' यासाठी सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट करियर मध्ये केलं होतं एकदा ‘स्लेजिंग’! – InMarathi

यासाठी सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट करियर मध्ये केलं होतं एकदा ‘स्लेजिंग’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

क्रिकेट हा “जंटलमन”चा खेळ. असं इंग्लंड मध्ये म्हंटल जातं, क्रिकेट हा खेळ अत्यंत ग्रेसफुली खेळला जातो शिवाय यात खिलाडू वृत्तीच प्रदर्शन होत म्हणूनच त्याला जेंटलमन चा खेळ असं संबोधतात!

पण या खेळात खेळात अशी एक गोष्ट आहे जी या खेळाची शान कमी करते, तो गोष्ट म्हणजे स्लेजिंग!

स्लेजिंग ही अशी गोष्ट आहे जी क्रिकेट मध्ये आपण बऱ्याचदा पाहिली आहे! तर हे स्लेजिंग म्हणजे काय ते जाणून घेऊया!

 

cricket-ball-inmarathi02
hindustantimes.com

 

स्लेजिंग म्हणजे क्रिकेट चा सामना चालू असताना एका टीमच्या प्लेयर ने दुसऱ्या टीमच्या प्लेयर ला एखाद्या गोष्टीवरून खिजवणे, किंवा चिडवणे! ते एकतर शाब्दिक असतं किंवा चेहऱ्यावरच्या हावभावावरुन करता येतं!

पूर्वीच्या क्रिकेट मध्ये हा प्रकार व्हायचा की नाही ठाऊक नाही पण सध्याच्या क्रिकेट मध्ये हा प्रकार बऱ्याच जणांनी अनुभवला असेलच! कित्येक लोकं ते एंजॉय सुद्धा करतात!

क्रिकेट मधलं स्लेजिंग हे आपल्या पिढीसाठी तरी काही नवीन नाही! ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सोबतच्या मॅच मध्ये आपण बऱ्याचदा हा प्रकार बघितला आहे!

या अशा प्रकारामुळे समोरच्या खेळाडूच मनोधैर्य खच्ची होतं! आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर होतं!

आपल्या सगळ्यांना माहीत आहे ऑस्ट्रेलिया आणि त्यांच्या टीमचे प्लेयर या प्रकारामुळे बरेच चर्चेत राहिले आहेत! या स्लेजिंग मुळे ऑस्ट्रेलियन प्लेयर्स वर कारवाई सुद्धा झालेली आहे!

 

sledging in india
sportskeeda

 

पण भारतीय क्रिकेट टीम मध्ये हा प्रकार फार क्वचित किंबहुना नाहीच बघायला मिळत, सध्याच्या टीमचा कर्णधार विराट कोहली हा गरम डोक्याचा असला तरी तो असा प्रकार करत नाही!

अगदी हातावर मोजण्या इतके स्लेजिंग चे प्रसंग आपल्या इथे बघायला मिळते! पण तुम्हाला माहीत आहे का या प्रकारात कधीच्या काळी क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर सुद्धा अडकला होता!

क्रिकेटचा “God” सचिन तेंडुलकर हा आपल्या सर्वांसाठीच सर्वोच्च जंटलमन.

 

sachin tendulkar inmarathi
cricketcountry.com

 

त्यामुळे सचिन स्वतः कधी स्लेजिंग करत असेल असं वाटत नाही. आणि ते खरंसुद्धा आहे. फक्त एक अपवाद वगळून!

{स्लेजिंग – Sledging : स्लेजिंगचा शब्दशः अर्थ आहे अपशब्दांचा वापर. क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूचं लक्ष विचलित करण्यासाठी त्याला वेगवेगळे टोमणे मारले जातात – ह्याला स्लेजिंग म्हणतात.}

सचिन तेंडुलकरने मैदानावरील रणनीतीचा भाग म्हणून एकदा स्लेजिंग केली आहे. ती सुद्धा स्लेजिंगमधे नाव कमावलेल्या ऑस्ट्रेलियन टीमच्या विरुद्ध.

 

sachin-tendulkar-sledging01-marathipizza

 

गोष्ट आहे सन २००० च्या केनियामधल्या Champions Trophy ची.

भारतीय टीम ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळत होती. अगदी सुरुवातीच्याच ओवर्समधे सचिनने Glen McGrath ला target केलं. त्याला सचिन म्हणाला – “Today, I will hit you out of the ground”…!

 

अर्थात, हा भारतीय टीमने आधीच ठरवलेल्या रणनीतीचा भाग होता. त्यांना McGrath ला विचलित करायचं होतं. आणि – ही युक्ती यशस्वी ठरली.

 

macgrath sledging inmarathi
quora

 

McGrath ने ९ ओव्हर्स फेकल्या ज्यात भारतीय टीमने ६१ रन्स काढले. भारताने ती match २० रन्सने जिंकली.

आता तुम्हाला समजलं असेल की सचिन सुद्धा एकेकाळी या प्रकारात सामील होता, पण यामागचा त्याचा किंवा टीमचा उद्देश चांगलाच होता!

शिवाय ऑस्ट्रेलियन प्लेयर्स सारखं स्लेजिंग कधीच आपल्या प्लेयर ने केलं नाही, ती गोष्ट खेळाचा एक भाग किंवा कूटनीती म्हणूनच वापरली! यानंतर सचिन ने स्लेजिंग केल्याचा एकही किस्सा नाही!

कारण सचिनसारखा सच्चा इमानदार क्रिकेट प्लेयर या भूतलावर शोधून सापडणार नाही! क्रिकेट ही गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या आयुषयापेक्षा मोठी आहे!

 

sachin great inmarathi
the national

 

आज सचिन रिटायर जरी झाला असला तरी त्याच्या मनात या खेळाबद्दल तितकाच आदर आहे, त्याने त्याच्या फेअरवेल ला दीलेल भाषण ऐकून संपूर्ण देश अश्रु ढाळत होता!

कारण त्यांच्यासाठी क्रिकेट म्हणजे सचिन आणि सचिन म्हणजे क्रिकेट हेच समीकरण होतं!  

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?