' २०२० तर गेलं, पण २०२१ मध्ये यशशिखर गाठायचं असेल, तर हा कानमंत्र चुकवू नका – InMarathi

२०२० तर गेलं, पण २०२१ मध्ये यशशिखर गाठायचं असेल, तर हा कानमंत्र चुकवू नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आयुष्यात यशापयशाचा खेळ सतत चालू असतो. पण कधीकधी अपयश इतकं पिच्छा पुरवतं, की मन खचून जातं आणि सततची अनिश्चितता झाल्यासारखं होतं. प्लॅन चुकतात. असं काहीतरी होतं राहतं आणि अपयशाची कारणं सापडतंच नाहीत.

त्यासाठी काय करावं हे पण समजेनासं होतं. तरीही काही गोष्टी अशा आहेत, की त्यांचा अंगिकार केला तर आपलं मन स्थिर होईलच पण यशाच्या वाटेवर आपण चालत सहजासहजी यशस्वी होऊ.

काही जुन्या वाईट सवयी सोडा…काही चांगल्या सवयी लावून घ्या आणि यशाचं शिखर चढण्यासाठी सज्ज व्हा..काय आहेत हे यशाचे शिखर गाठायला मदत करणारे अक्सीर पत्ते?

 

१. आपली दिनचर्या ठरवा-

 

 

आपली तब्येत जपायची आहे हे लक्षात घेऊन व्यायाम करायचं ठरवलं असेल, तर आजच सुरू करा. “कल करे सो आज, आज करे सो अब” हा मूलमंत्र लक्षात ठेवा आणि त्यानुसारच वेळापत्रक आखा. व्यायाम करा.. नियंत्रित पण पौष्टिक आहार घ्या.

सकाळी उठताना सकारात्मक विचार ठेवूनच जागे व्हा. त्याच विचाराने प्रेरित होऊन कामं करा. मन एकाग्र करण्यासाठी मेडिटेशन करुनच दिवसाची सुरुवात करा.

 

२. ८०-२० फाॅर्म्युला तयार करा-

 

planning inmarathi

 

कोणतंही काम करताना त्याची रुपरेषा म्हणजे प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. कामाचा प्रारुप आराखडा तयार करा. तुमचा प्लॅन ८०% तयार करा. २०% काम करा.

या ८०% नियोजनात एक प्लॅन फसला तर दुसरा, तिसरा चौथा असे आराखडे असू द्या म्हणजे ऐनवेळी काय करु असं होणार नाही. मजबूत नियोजन केलं की कामही उत्तमच होतं.

 

३. भरपूर वाचन करा-

 

reading inmarathi

 

“ग्रंथ हेच गुरु” हे नेहमी लक्षात ठेवा. भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं खूप शहाणपण देऊन जातात. जितकं जास्त वाचाल तितकी जास्त माणसंही वाचायला शिकाल.

आत्मचरित्रांचं वाचन हे प्रेरणादायी असतंच, पण त्या लोकांना आलेलं अपयश “पुढच्यास ठेच मागचा शहाणा” या उक्तीनुसार आपल्याला मार्गदर्शन करतं. यश मिळवण्यासाठी त्यांनी वापरलेल्या रस्त्यांचाही आपल्याला फायदा होतो.

मेडीटेशन इतकंच पुस्तकांचं वाचन हे शांत झोपेसाठी मदत करतं. ज्ञानाचं मोठं‌ सोपान पुस्तक असतं. जगाकडे विशाल नजरेनं पहायला लावणारी ही खिडकी आहे. तुमचं वाचन जितकं जास्त, तितका तुमचा दृष्टीकोन मोठा हे कायम लक्षात ठेवा.

 

४. एका वेळी एकच काम करा-

 

office 1 inmarathi

 

खूपदा आपण मल्टीटास्कींगच्या मोहात “एक ना धड भाराभर चिंध्या” अशी गत करुन घेतो. कामात काम करुन टाकू म्हणत एका वेळी जमेल तितकी कामं करायला नव्हे ओढायला बघतो आणि कुठलंही काम व्यवस्थित होत नाहीत.

एका वेळेस एकच काम करा… नीटनेटकं करा. सुपरमॅन किंवा सुपरवुमन हा काटेरी मुकुट आहे. तो धारण करायचा मोह सोडून आपलं काम चोख करा. तुमचं काम व्यवस्थित करण्याकडं कल ठेवा.

 

५. प्रशंसा करा-

 

office inmarathi

 

बहुतेक वेळा आपण कौतुकाची अपेक्षा ठेवतो, पण आपल्या सहकाऱ्यांना कौतुकाची थाप कधीच देत नाही. लोकांच्या चांगल्या कामाची प्रशंसा करा. ते शब्द त्यांना अजून उत्तम काम करायला प्रेरित करतील.

जशी आपल्याला कौतुकाची अपेक्षा असते तशीच इतरांनाही असते. केलेलं कौतुक अजून उत्तमातलं उत्तम काम करायला प्रेरणा देतं. कृतज्ञता हा सर्वात मोठा गुण आहे. आपल्या आजुबाजूला असलेल्या सर्व लोकांशी कृतज्ञ रहा.

 

६. सकारात्मक लोकांच्या सानिध्यात रहा-

 

आयुष्यात मिळणाऱ्या बहुतेक गोष्टी तुमच्या विचारांचा परिपाक असतो. तुमच्या भोवतीचे लोक सकारात्मक दृष्टिकोन बाळगणारे असतील, तर आपोआपच तुमचाही स्वभाव सकारात्मक बनतो.

नकारात्मक विचार आपलं भविष्य पण नकारात्मक करु शकतात. म्हणूनच जे लोक राजहंसाच्या नीरक्षीर वृत्तीचे असतात अशांचा सहवास मिळवा. जे कोणतीही अडचण संधी समजून तिचा वापर करून यशस्वी होतात.

 

७. नेमाने व्यायाम करा-

 

Exercise Inmarathi

 

उत्तम आरोग्य ही सुदृढ आयुष्याची गुरुकिल्ली आहे हे लक्षात ठेवा. आरोग्य चांगलं असेल तरच कोणतंही संकट सहज पार होतं. निरोगी शरीरात सुदृढ मन वास करतं आणि ते कोणत्याही संकटाला तोंड देत नेटाने उभं राहतं.

योग, सूर्यनमस्कार, सायकलिंग, चालायला जाणे यापैकी कोणताही व्यायाम नित्यनेमाने करा. यामुळे तुमचं मन आणि शरीर उत्साही सुदृढ राहील.

 

८. उत्तम श्रोते व्हा-

Couple-Talking Inmarathi

 

जगात महाकठीण असणारी गोष्ट आहे ती श्रोता नसणं. प्रत्येकाला फक्त लोकांनी आपली रामकहाणी ऐकावी असं वाटत असतं, पण ऐकायची तयारी कुणाची नसते. उत्तम श्रोता हा खूप महत्त्वाचा असतो. लोक बोलतात ते वरवर ऐकू नका. मनापासून ऐका. आपले व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध या गुणांमुळेच चांगले होऊ शकतात.

संभाषण कौशल्य वाढवा. भाषण कौशल्य नाही. संभाषणात दोन माणसं बोलत असतात तर भाषणात एकच.. तुम्ही वक्ते नाही मित्र व्हा. खोटं खोटं ऐकायचा आव आणू नका. मनापासून ऐका.. मनापासून बोला.

 

९. सोशल मीडियापासून काही काळ लांब रहा-

 

social media inmarathi

 

सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, व्हाॅटस्अप,व इतर समाजमाध्यमांनी कित्येक चांगल्या गोष्टी खाऊन टाकल्या आहेत. सतत लोकांसमोर आपली खोटी खोटी छबी उभी करण्याच्या नादात, लाईक कमेंट्सच्या हव्यासापायी माणसं सतत आॅनलाईन रहायचा हट्ट धरुन असतात.

हे व्यसन तुमचं काम बिघडवू शकतं. म्हणून जाणूनबुजून सोशल मीडिया पासून काही काळ लांब रहा. आपले नातेसंबंध घट्ट करायचा प्रयत्न करा.

 

१०. स्वतःची काळजी घ्या-

 

alia bhat be happy inmarathi

 

आपण नेहमी सर्वांची काळजी करतो, ‌पण स्वतःकडं दुर्लक्ष करतो. शारीरिक -मानसिक आरोग्य जपा. आपली तब्येत ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे हे कायम लक्षात ठेवा. बारीकसारीक दुखणी दुर्लक्षित करु नका.

या गोष्टी पाळल्या तर यश हातभर अंतरावर आहे हे लक्षात ठेवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?