' थंडीच्या दिवसांत सर्वात नाजूक अशा ओठांची काळजी घेण्यासाठी हे घ्या रामबाण उपाय! – InMarathi

थंडीच्या दिवसांत सर्वात नाजूक अशा ओठांची काळजी घेण्यासाठी हे घ्या रामबाण उपाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हिवाळा आला की ‘त्वचेची काळजी घेणे’ हे एक काम आपल्या मागे लागतं. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण वर्षभर कपाटात ठेवलेले स्वेटर, मफलर, कान टोपी हे बाहेर काढून थंडीचा सामना करण्यास सज्ज झालेलो असतो.

सध्या कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने तर सर्दी होणे, शिंक येणे या गोष्टींबद्दल एक भीती प्रत्येकाच्या मनात बसली आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या परीने काळजी घेत आहे.

बाहेर फिरताना किंवा फिरून आल्यावर जंतूंचा प्रसार होऊ नये म्हणून तुमच्या चेहऱ्याला हात लावू नका हे सुद्धा सगळे तज्ञ वारंवार सांगत आहेत.

शरीराला निरोगी आणि त्वचेला सुंदर ठेवणं हे आपल्या सर्वांसाठी यावर्षी एक आव्हान असणार आहे.

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेत असतांना सर्वात नाजूक कोणता भाग असेल तर तुमचे ‘ओठ’. ओठांची काळजी घेताना त्यांना कोरडं होऊ न देणं हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.

 

lip care inmarathi

 

शरीरातील इतर अवयवांना थंडीचा त्रास होणे आणि ओठांना थंडीचा त्रास होणे यात फरक यासाठी आहे की, आपल्याला ओठांसाठी कोणतंही औषध वापरताना त्याच्या साईड इफेक्टस ची जास्त काळजी घ्यावी लागते.

साध्या दुखण्यासाठी जसं आपल्यापैकी बरेच लोक मेडिकल चालवणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून सुद्धा गोळी घेत असतो, तसं ओठांच्या बाबतीत करू नये असं डॉक्टर नेहमीच सांगतात.

हिवाळ्यात जर का ओठ कोरडे होऊन ते कट झाल्यास आपल्याला कोणताही तिखट पदार्थ खातांना खूप त्रास होत असतो आणि हा त्रास लवकर बरा न झाल्यास कमी तिखट पदार्थ सुद्धा फार तिखट लागायला लागतात आणि हळूहळू आपल्या खाण्यावर, पचनावर सुद्धा परिणाम व्हायला लागतो.

या त्रासापासून वाचण्यासाठी हिवाळ्यात ओठांची काळजी कशी घ्यावी? हे आपण जाणून घेऊयात :

१. खोबरेल तेलात व्हिटॅमिन E हे मोठ्या प्रमाणात असतं. हिवाळ्यात खोबरेल तेल ओठांवर लावल्यास ओठांची त्वचा कोरडी राहत नाहीत आणि व्हिटॅमिन E मुळे ओठांवर पडलेली छिद्र ही लवकर भरून निघतात.

२. मध आणि वॅसलिन यांना एकत्रितपणे ओठांवर लावल्यास ओठ हे हिवाळ्यात सुद्धा सॉफ्ट राहतात आणि त्यांना आवश्यक ते पाचक द्रव्य मिळत राहतं.

 

honey & vaseline inmarathi

 

३. कोरफडीचं (aloe vera) जेल  हे कट झालेल्या ओठांवर लावल्यास ओठांची आग होणे थांबते आणि ओठांची त्वचा ही पूर्ववत होते.

४. काकडी चा तुकडा ओठांवरून घासल्यास ओठांचा कोरडेपणा निघून जाईल आणि त्यांची आग होणे सुद्धा थांबेल.

५. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आपल्याला कमी तहान लागते. आपल्या शरीरात कमी पाणी गेल्याने सुद्धा ओठ कोरडे होत असतात. तहान लागो अथवा न लागो, हिवाळ्यात सुद्धा ठराविक अंतराने पाणी प्यायलं पाहिजे.

६. दूध आणि गुलाबाची पाकळी यांचं मिश्रण ओठांवर लावल्यास ते कोरडे राहत नाहीत.

७. जोजोबाचं तेल चिर पडलेल्या ओठांवर लावल्यास त्यावर लगेच त्वचा येण्यास मदत होते.

८. साखर आणि मध यांचं मिश्रण करून त्यांना तुमच्या ओठांवर लावल्यास ओठांची त्वचा मुलायम राहण्यास मदत होते.

९. चहा पावडर असलेली ओली ‘टी बॅग’ ओठांवरून चार ते पाच मिनिटं घासल्यास तुमचे ओठ कोरडे पडत नाहीत.

 

tea bag inmarathi

 

१०. कॅस्टर तेल आणि ग्लिसरीन एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावल्यास तुमचे ओठ हे मऊ राहतील आणि कोरडे पडणार नाहीत.

तुमचे ओठ कोरडे असल्यावर त्यांच्यावरून जीभ फिरवून त्यांचा कोरडेपणा जात नाही हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

दमट वातावरण आणि तुमच्या त्वचेला अनुरूप नसलेले काही कॉस्मेटिकस हे सुद्धा तुमच्या ओठांच्या त्वचेला इजा पोहोचवू शकते. ‘अवोकॅडो बटर’ हे ओठांवर लावल्यास तुमच्या ओठांची त्वचा पूर्ववत होण्यास मदत होते.

ओठ चांगले राहण्यासाठी काय करू नये हे देखील समजून घेऊयात :

१. ओठांवरून सतत जीभ फिरवणे टाळावे.

२. अल्कोहोल असलेले क्रीम, मलम ओठांवर लावू नये.

३. उन्हात जाताना ओठांसाठी उपयुक्त असलेले सनस्क्रीन क्रीम लावून मग घराबाहेर पडावे.

 

sunscreen inmarathi

 

४. नाकावाटेच श्वसन करा. तोंडावाटे श्वसन केल्याने ओठ कोरडे पडत असतात. तुमच्या श्वसन प्रक्रियेकडे लक्ष द्या. तोंडावाटे जर श्वसन होत असल्यास डॉक्टर ला संपर्क साधा आणि तुम्हाला असलेल्या एखाद्या एलर्जी बद्दल माहिती द्या आणि योग्य ते औषध घ्या.

तुमच्या ओठांना कोरडे न होऊ देणं हे अत्यंत आवश्यक आहे. थोडी काळजी घेतल्यास तुम्हाला ओठांना त्यांच्या नेहमीच्या आकारात ठेवून तुम्हाला बदलत्या वातावरणाचा आनंद घेता येऊ शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?