खरं वाटणार नाही पण आपली मायानगरी मुंबई एकेकाळी हुंड्यात भेट दिली गेली होती!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मुंबई – आपल्या महाराष्ट्राची राजधानी. व्यापार, राजकारण, बॉलीवूड या सर्व क्षेत्राचं उगमस्थान. मुंबई ला स्वप्न नगरी किंवा माया नगरी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. “मुंबईला आलेल्या प्रत्येक मेहनती व्यक्तीला काम मिळतंच” असं म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
या शहराने कित्येक लोकांचं करिअर घडवलं. त्यांच्याकडे काहीच काम नसताना त्यांना भरभरून काम दिलं, यश दिलं. जुने लोक याबाबत म्हणतात की, मुंबादेवी च्या नावाने तयार झालेलं हे शहर एखाद्या आई प्रमाणेच तुमची काळजी घेतं.
तुम्ही जी काही अर्धवट स्टोरी मनात रंगवून या शहरात आलेले असतात, ती स्टोरी मुंबईत आल्यावर हमखास पूर्ण होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळी नंतर मुंबई कशी महाराष्ट्राचा अविभाज्य घटक झाली याची माहिती आपल्यापैकी बऱ्याच जणांना असेल.
या लेखात आम्ही मुंबई बद्दल ची एक घटना सांगणार आहोत जी की एखाद्या सिनेमाला साजेशी आहे. मुंबई ही सर्वांना सामावून घेणारी आणि विविधतेने नटलेली का आहे? हे सुद्धा या घटनेतून आपल्याला जाणवेल.
१५३४ ची ही गोष्ट आहे जेव्हा मुंबई वर पोर्तुगीज लोकांचं राज्य होतं. गुजरात सल्तनत चे राजा बहादुर शाह यांच्याकडून एका करारावर मुंबई ही पोर्तुगीज च्या प्रशासकांनी मिळवली होती.
पोर्तुगीज लोकांनी त्या काळात या भागात ख्रिश्चन धर्माचा प्रसार होईल याकडे सुद्धा लक्ष दिलं आणि रोमन कॅथलिक हा धर्म कित्येक लोकांनी त्या काळात स्वीकारला.
हे सांगण्याचं कारण हे की, मुंबई ही मुळात फक्त सात बेटांचा एक भाग होती. या बेटांना पोर्तुगीज लोकांनी बरीच नावं दिली होती. या नावांपैकी बॉम्बेम (Bombaim) हे नाव देण्याचं शेवटी ठरलं होतं.
या बेटा भोवती त्यांनी बरीच तटबंदी त्या काळात बांधली होती. पोर्तुगीज लोक मुंबईच्या या साम्राज्याला फार काळ अबाधित ठेवू शकले नाही.
नोव्हेंबर १५८३ मध्ये ब्रिटिश व्यापारी सर्वात पहिल्यांदा भारतात आले. त्यांना व्यापार आणि भौगोलिक दृष्ट्या मुंबई हे शहर फार महत्त्वाचं आहे हे जाणवलं.
१६१२ मध्ये ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यात सुरत मध्ये मुंबई वर ताबा मिळवण्यासाठी लढाई झाली. या लढाई मध्ये पोर्तुगीजांचं व्यापारात वर्चस्व सिद्ध झालं. कालांतराने, इंग्रज व्यापाऱ्यांनी हे वर्चस्व मोडीत काढलं आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं.
१६६१ मध्ये पोर्तुगीज ची राजकुमारी कॅथरीन ब्रिगंझा आणि प्रिन्स चार्ल्स २ ट्युडर मोनार्क यांचा विवाह झाला. या विवाहात पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना हुंडा म्हणून ‘मुंबई’ चा प्रांत दिला.
प्रिन्स चार्ल्स २ हे नक्कीच मुंबई ला हुंड्यात मिळवून आनंदी होते. त्यासोबत मोरोक्को मधील काही भाग सुद्धा हुंड्यात देण्यात आला होता.
प्रिन्स चार्ल्स २ हे त्यावेळी इतरही बऱ्याच राजकीय कामात व्यस्त होते की त्यांना ही जवाबदारी वाढवायची नव्हती. मुंबई चं राज्य सुद्धा हातात जाऊ नये आणि स्वतःवर काम वाढू नये यासाठी त्यांनी एक शक्कल लढवली.
मुंबईचा पूर्ण प्रांत हा प्रिन्स चार्ल्स २ ने त्या काळी भारतात आलेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ ला भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिला.
या बदल्यात “ईस्ट इंडिया कंपनीने प्रिन्स चार्ल्स २ ला वार्षिक १० पाउंड इतक्या किमतीचं सोनं द्यावं” असा तो करार होता. अशाप्रकारे आपली मुंबई त्या काळी ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे आली होती.
करारावर सह्या करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनी च्या इंग्लंड मध्ये बसणाऱ्या वरिष्ठ लोकांनी त्यावेळी मुंबईचा पूर्ण भाग बघितला सुद्धा नव्हता.
भाडे देण्याची ही रक्कम केवळ दक्षिण मुंबई पुरती मर्यादित होती. कुलाबा, धारावी, सायन, माहीम हे बेट पोर्तुगीज लोकांनी स्वतःकडेच ठेवले होते.
१६६८ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी ही पूर्णपणे भारतात आलेली होती. Gerald Angier हे पहिले गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. त्यांनी पहिलं वेअरहाऊस बांधलं,
१६६९ मध्ये सायनचा किल्ला बांधला आणि तिथून पुढे मुंबईचा प्रगतीचा प्रवास सुरु झाला. मुंबई चा इतर भाग १७४० पर्यंत पोर्तुगीजांकडे होता आणि त्यानंतर मराठा सैन्याने तो त्यांच्याकडून जिंकला होता.
आपल्या सर्वांची काळजी घेणाऱ्या आणि आपली कथा पूर्ण करण्यास मदत करणाऱ्या मुंबई ची ही एक कथा आहे.
एखाद्या वास्तू भोवती आज इतक्या घटना घडत आहेत आणि इतिहासात सुद्धा इतक्या घटना घडून गेल्या आहेत हे कळल्यावर त्या शहराबद्दल आपली आस्था अजूनच वाढते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.