दुर्मिळ होत चाललेले हे फळ, आहे अत्यंत फायदेशीर…जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतामध्ये बऱ्याच वनस्पती ज्यांच्या औषधी गुणांमुळे वर्षानुवर्षे त्यांचा वापर केला जातो. उदा. हळद, कोरफड इत्यादी. आपण हल्ली पाश्चात्त्य औषधांच्या आहारी गेल्यामुळे या वनस्पतीकडे आणि त्यांच्या औषधी गुणधर्म कडे दुर्लक्ष होत चालले आहे.
या वनस्पती बाजारात सहज उपलब्ध होतात आणि खिशाला परवडण्यासारखे असतात. त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा आपण प्रथम उपचार म्हणून अशा वनस्पतींचा वापर करू शकतो.
नवीन पिढीला अशा वनस्पतींचे फायदे माहीत होणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला आज आज अशाच एका औषधी वनस्पतीविषयी माहिती देणार आहोत. या वनस्पतीचे नाव आहे कवठ.
कवठ हे फळ आकाराने लहान असते आणि या फळाला कठीण कवच किंवा आवरण असते. संस्कृतमध्ये याला दधीफल किंवा कपित्थ असे म्हणतात तर, इंग्रजीमध्ये हे ‘वूड एप्पल’ असे म्हणतात.
कवठाचे वैज्ञानिक नाव हिरोनिया लिमोनिया आहे. या फळावरील आवरण फिकट पांढ-या रंगाचे असते आणि एखाद्या कवचाप्रमाणे कडक असते.
कवचाच्या आतील गर विटकरी रंगाचा असतो. हा गर चवीला आंबट गोड लागतो. कवठाचे अजूनही बरेच फायदे आहेत, त्याविषयी जाणून घेऊया!
बीटा कॅरोटीन चा उत्तम स्त्रोत :
काही लोकांची दृष्टी कमी वयातच क्षीण होते त्यामुळे त्यांना चष्मा किंवा लेंसेस यांसारख्या गोष्टींचा वापर करावा लागतो. लेन्स हा खूप खर्चिक पर्याय आहे आणि त्या सांभाळणे कठीण होऊन जाते तर, चष्म्याच्या वापरामुळे बऱ्याचदा नाकाजवळ काळे डाग तयार होतात.
जर आपल्याला या दोन्ही संभावना टाळायच्या असतील तर डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर ती घेतली तर कमी वयातच दृष्टी क्षीण होण्याचा त्रास उद्भवणार नाही.
यासाठी कवठाचे सेवन उपयोगी ठरू शकते. कवठामध्ये खूप प्रमाणात बीट कॅरोटीन असते. बिट कॅरोटीन शरीरात विटामिन ‘ए’ मध्ये हे रूपांतरित होतं. ज्यामुळे तुमची दृष्टी क्षीण होणार नाही.
–
हे ही वाचा – फळे आरोग्यासाठी हितकारकच, पण ती खाताना हे नियम पाळलेच पाहिजेत !
–
याऐवजी बीट कॅरोटीनमुळे कांती उजळते त्यामुळे बाजारातल्या केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा बीट कॅरोटीन चे सेवन करायला हवे.
विटामिन सी :
कवठामध्ये विटामिन सी सुद्धा चांगल्या प्रमाणात उपलब्ध असते. खूप लोकांना सतत सर्दी पडसे खोकला याचा त्रास असतो याचे कारण असे की या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.
विटामिन सी मुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. कोणाच्या काळात स्वतःची रोग प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी तुम्ही कवठाचे सेवन करू शकता.
जर तुम्ही कवठाचे सेवन विटामिनच्या कमतरतेमुळे करणार असाल तर तुम्ही कच्चा कवठाचे सेवन केले पाहिजे कारण पिकलेल्या फळांपेक्षा कच्च्या फळांमध्ये विटामिन सी अधिक असते.
कवट हे पिकलेले खावे कारण कच्चे कवट खाल्ल्यामुळे सर्दी खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
प्रोटिन्स :
कवठाच्या बियांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात म्हणजेच प्रोटिन्स. प्रोटिन्स च्या सेवनामुळे स्नायू बळकट होतात आणि आपल्या दैनंदिन कामांसाठी आपणास उर्जा प्राप्त होते.
प्रोटिन्सची कमतरता भरून काढण्यासाठी बाजारात बरेच महागडे प्रोटिन्स सोर्स असतात. त्यांच्या तुलनेत कवट हा स्वस्त पर्याय ठरेल.
प्रोटिन्सचा नैसर्गिक स्त्रोत असल्यामुळे कवठ बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रोटीन सोर्सच्या वेगाने तुम्हाला फायदा देणार नाही पण; तुम्हाला नैसर्गिकरित्या संतुलित प्रोटिन्स मिळवायचे असतील तर तुम्ही कवठाचे सेवन केले पाहिजे.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर :
कवठामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात. हे फायबर शरीरातील पचनक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे ज्यांना अपचनाचा त्रास असेल त्यांनी कवठाचे सेवन करायला हवे.
बद्धकोष्ठतेवर सुद्धा कवट गुणकारी ठरते. चयापचयाला मदत मिळते. यकृत आणि मूत्रपिंड क्लींझ करण्यासाठी कवट उपयोगी पडते. त्यामुळे ज्यांना पोटाशी संबंधित त्रास असेल त्यांनी कवठाचे सेवन करायला हवे.
कवठामध्ये आम्लरस असतात. त्यामुळे पोटात मळमळ होत असेल किंवा उलटी होत असेल तर कवठाचे सेवन करावे. कवठातील आम्ल जुलाब कमी करण्यासाठीसुद्धा मदत करतात.
भूक वाढवण्यासाठी :
काही लोकांची भूक कमी लागण्याची तक्रार असते. जेवणाच्या वेळी हे लोक कमी जेवतात त्यामुळे त्यांची शरीरयष्टी कृष होते तसेच त्यांच्या आरोग्यावर भुक कमी लागण्याचा परिणाम होतो.
कवट हे मधुर आम्लरसयुक्त फळ आहे. यामुळे पचनव्यवस्था तर सुरळीत होते पण तुमची भूक सुद्धा वाढते. म्हणूनच तुमचीसुद्धा भूक कमी लागण्याची तक्रार असेल तर तुम्ही कवठाचे सेवन केले पाहिजे.
रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी :
रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे तसेच कोलेस्ट्रॉल वाढणे या समस्या काही केल्या कमी होत नाही. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कित्येक औषधे आणि गोळ्या खाव्या लागतात.
कोलेस्ट्रॉल कमी करणे हेही सहजासहजी शक्य नसते. कवट या समस्यांवर एक नैसर्गिक पर्याय आहे. त्यामुळे अशा समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही कवठाचे सेवन केले पाहिजे.
कवठाची पाने :
ज्याप्रमाणे कवठाच्या फळाचा उपयोग आहे त्याचप्रमाणे कवठाच्या पानांचा उपयोग देखील होतो. कवठाची पाने ही वातशामक आहेत. त्यामुळे वात समस्येच्या निवारणासाठी तुम्ही या पानांचा वापर करू शकता.
कवठाच्या पानांमध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात. तसेच ‘बी’ जीवनसत्वे आणि फायबर्स असतात. त्यामुळे या पानांचे सेवन शरीरासाठी फायदेशीर ठरते.
अन्य पालेभाज्यांप्रमाणे कवठाच्या पानाची भाजी बनवून तुम्ही या पानांच्या औषधी गुणांचा फायदा उपभोगू शकता.
पिकलेल्या कवठाची चटणी :
–
हे ही वाचा – सावध व्हा! रोजच्या खाण्यातले “हे” पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी करतात!
–
कवठाचे सेवन करण्यासाठी तुम्ही या फळाची चटणी तयार करू शकता. जे चवीला अत्यंत स्वादिष्ट असते.
सगळ्यात पहिल्यांदा कवट फोडले पाहिजे आणि त्यातल्या घरातले मोठे तंतू काढून हा गर हलका स्मॅश करायला हवा आणि त्यात तीन टेबलस्पून गूळ, चिमूटभर हळद, तिखट, मीठ हिंग आणि घालावं.
हे सगळे मिश्रण मिक्सरला लावून वाटून घ्यावे मग या चटणीचा आस्वाद घ्यावा!
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.