' तुमच्या घरात असलेली ही छोटीशी वस्तू आहे अनेक विकारांवर लाभदायक! – InMarathi

तुमच्या घरात असलेली ही छोटीशी वस्तू आहे अनेक विकारांवर लाभदायक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सगळ्यांच्या घरात कापूर असतोच. आपल्याकडे कापराच्या वापराला धार्मिक कार्यांशी जोडलेले आहे, त्यामुळे हमखास कापूर आपल्या घरात असतोच, पण कापराला इतके महत्त्व देण्यामागचे कारण वाचाल तर थक्क व्हाल.

कापूर, एक मानवनिर्मित सुवासिक वस्तू नसून, नैसर्गिक वनस्पती आहे. कापराची निर्मिती त्याच्या झाडांपासून होते, पण झाडांपासून मिळणाऱ्या शुद्ध कापराच्या फायद्यांपासून आपण अनभिज्ञ आहोत. या फायद्यांना वैज्ञानिक आधार पण आहे.

आज आपण घराघरात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या भीमसेनी कापराचे फायदे बघणार आहोत :

१) वेदना कमी करणे  –

 

feet swelling inmarathi

 

कापूर हा वेदना नाशक असतो. त्यामुळे सुजल्यावर, मुका मार लागल्यावर किंवा कोणत्याही बाह्य दुखण्यावर कापराचे तेल लावून मालिश केल्यामुळे वेदना व सूज पटकन कमी होते.

२) खाज- खरूज घालवणे –

सतत खाज येत असलेल्या अवयवावर किंवा रॅश येऊन लाल झालेल्या ठिकाणी कापराचे तेल लावल्यावर हे रॅश पटकन कमी होतात व खाज थंबते. त्वचेवरील लालसरपणा देखील त्वरित नाहीसा होतो.

३) नखांचे आजार घालवणे  –

 

camphor inmarathi

 

कधी कधी Trichophyton mentagrophytes आणि Candida parapsilosis या फंगसच्या प्रजातींशी संपर्कात आल्यावर आपल्याला “ओनिकोमायकॉसिस” या रोगाचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे, आपल्या नखांना बुरशी येते, खाज येते, जखम होते.

कापराचे तेल नखांवर लावल्याने हा आजार जाऊ शकतो.

४) एक्झिमावर जालीम उपाय –

एक्झिमा हा लहान मुलांना व म्हाताऱ्या माणसांना होणार त्वचा विकार आहे. यात त्वचेवर लाल किंवा काळे डाग पडतात आणि त्यामुळे भरपूर वेदना जाणवते.

त्यामुळे कापराचे तेल असलेले क्रीम किंवा लोशन लावल्यास या रोगापासून त्वरित मुक्ती मिळू शकते. नुसते कापराचे तेल साध्या खोबऱ्याच्या तेलात मिसळून लावले तरीही फरक जाणवतो.

५) निद्रानाश घालवणे –

 

no sleep inmarathi

 

ज्यांना निद्रानाश हा त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. कापराचे तेल वापरल्याने खोलीत जो मंद सुवास दरवळतो, त्या सुवासाने झोप येण्यास मदत होते. उशीवर कापराची एक वडी सुद्धा घासू शकता, उशीला येणाऱ्या सुवासाने आपल्याला झोप येईल.

६) सर्दी पडस्यावर उपायकारक –

 

cold inmarathi

 

सर्दी होऊन नाक बंद झाल्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर कापूर रुमालात घेऊन थोड्या थोड्या वेळाने तो हुंगा.

७) केसांची वाढ होणे –

आपल्या केसांची वाढ भरपूर कारणांमुळे खुंटते जसे – सुरळीत रक्ताभिसरण नसल्याने, केसांची स्वच्छता न राखल्याने किंवा कोंडाअसल्याने, पण या सगळ्या समस्यांवर एक उपाय आहे तो म्हणजे कापूर.

रात्री झोपताना कापराच्या तेलाने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुरळीत होते व बाकी सगळ्या समस्या संपून केसांची वाढ व्यवस्थित होते. कापराच्या तेलाने केस मऊ होतात व चमकतात सुद्धा.

८) डोक्यातील ऊवांचा नायनाट करणे –

 

oiling hair inmarathi3

 

डोक्यात ऊवा झाल्या, की त्यांना घालवण्यासाठी कापूर नेहमीच वापरला जातो. रात्री झोपताना कापराचे तेल लावून ठेवा आणि सकाळी न्हाऊन घ्या. हा उपाय दर २-३ दिवसांनी केल्यास आपला ऊवांचा त्रास कायमचा दूर होईल.

९) पचनशक्ती बळकट बनवणे –

तमिळनाडूकडे खाल्ल्या जाणाऱ्या कापराला “पाचई कारपुरं” असे म्हणतात. हा शुद्ध कपूर असतो जो झाडांपासून मिळतो. ह्या कापराचे सेवन केल्याने आपल्याला बद्धकोष्ठता, अपचन अशा पोटाच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

१०) रक्ताभिसरण सुरळीत होणे –

काहीही व्याधी नसली, तरी महिन्यातून एकदा कापराच्या तेलाने पूर्ण शरीराची मालिश करावी. याने आपल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होऊन रक्ताभिसरण सुरळीत होते. ज्यामुळे हृदयविकार, लकवा, हाताला मुंग्या येणे या आजारांपासून आपण कायम दूर राहू शकतो.

११) अस्वस्थता नाहीशी होणे –

 

camphor inmarathi1

 

जर कोणाला नैराश्य, जीव गुदमरणे या रोगांनी ग्रासले असेल, तर त्यांनी कापराचा नियमित वापर करावा. संशोधनानुसार, कापराचा सुगंध मनाला शांत करण्यास गुणकारी ठरतो.

ज्यांना मन विचलित झाल्यासारखे, अस्वस्थ वाटत असेल, अचानक कसली चिंता भासत असेल, तर त्यांनी घरात कापराचा धूर करावा किंवा कापराचे तेल वापरावे. कापराच्या सुवासाने त्वरित चित्त शांत होईल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?