' कालबाह्य झालेली ही कंपनी “चिनी कम” म्हणत करणार भारताला आत्मनिर्भर! – InMarathi

कालबाह्य झालेली ही कंपनी “चिनी कम” म्हणत करणार भारताला आत्मनिर्भर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२०१४ ला सॅमसंग, एमआय, एपल या जगप्रसिद्ध स्मार्टफोन कंपन्यांना मागे टाकून एका भारतीय ब्रँड ने भारतात सर्वाधिक स्मार्टफोन विकले होते.

सर्वाधिक ३२% फोन या कंपनीने तेव्हा विकले होते. आणि ती कंपनी होती राहुल शर्मा यांची ‘मायक्रोमॅक्स’.

१० हजार किंमतीमध्ये ५ इंच डिस्प्ले, ५१२ एमबी रॅम, ४ जीबी रॉम,आणि ८ मेगापिक्सेल कॅमेरा अस मोठं पॅकेट देणारा कॅनव्हास २ हा मायक्रोमॅक्सचा पहिला मास्टरस्ट्रोक.

हा कॅनव्हास फोन एवढा विकला गेला की त्यानंतर आलेला प्रत्येक नवीन कॅनव्हास फोन हा हिट होत गेला.

 

canvas inmarathi

 

कॅनव्हास वन, कॅनव्हास कलर, कॅनव्हास टर्बो, कॅनव्हास म्युझिक आणि असे बरेच मॉडेल जे एका पाठोपाठ एक हिट होत गेले.

आधी ट्विंकल खन्ना मग अक्षय कुमार आणि मग ह्यूग जॅकमॅन सारखे सिने कलाकार मायक्रोमॅक्सच्या जाहिरातींवर झळकू लागले.

यावरूनच मायक्रोमॅक्सने कमी वेळेत भारतीय स्मार्टफोन बाजारात मारलेली उडी कळून येते.

कालांतराने सायनोजेन या ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन करणाऱ्या कंपनीशी टाय अप करून मायक्रोमॅक्सने आपली नवीन सिरीज लॉन्च केली. तिचं नाव ‘यु’ (Yu).

या सिरीजचे युरेका, युरेका प्लस आणि युफोरिया यांनी तर बाजारात धुमाकूळ घातला होता. (सायनोजेनवर चालणारे तेव्हा वनप्लसचे फोन्स बाजारात उपलब्ध होते. ज्याची किंमत अव्वाच्या सव्वा होती.)

सायनोजेन ही कस्टमाईज ओएस असल्याने मोबाईल युजर्सना ती प्रचंड आवडली. न्यूटनच्या तिसरा नियम सांगतो, ‘Every action have equal and opposite reaction.’

मायक्रोमॅक्सवाले बहुतेक हे मध्यंतरी विसरून गेले आणि ज्या वेगाने ते वर गेले त्याच वेगाने ते खाली यायला सुरुवात झाली.

युट्युब वरती टेक रिव्ह्यू करणारे अनेक चॅनेल यायला लागले. सुरवातीला युट्युब इंडस्ट्री मध्ये नवीन असल्याने प्रत्येक टेक युट्युबरने इमानदारीने स्मार्टफोनचे अनबॉक्सिंग केले.

 

micromax unboxing inmarathi

 

आणि यामध्ये मायक्रोमॅक्सची उत्तरार्धात केलेली चोरी पकडली गेली.

मायक्रोमॅक्स हा चीन मध्ये नवीन लॉन्च होणारे मोबाईल रिब्रँडिंग करून मायक्रोमॅक्सच्या नावाने भारतात विकायचा ट्रेंड सुरू केला होता. हे तेव्हाच्या अनेक युट्युबर्सनी खुलेआम दाखवून दिले होते.

आणि हळूहळू ३०% मार्केट शेअर वरून मायक्रोमॅक्स १०% वर आली आणि कालांतराने नाहीसेच झाले. त्यात बाजारात सुरू असलेल्या स्पर्धेत मायक्रोमॅक्सला टिकणे अवघड झाले.

अन अचानक, लडाख सीमेवर भारत चायना वादानंतर मोदींनी आत्मनिर्भर भारताचा संदेश दिला आणि मायक्रोमॅक्सने ट्विट करत ते पुन्हा बाजारात उतरत असल्याचे हिंट यायला लागली.

आणि लवकरच मायक्रोमॅक्सचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचा एक व्हिडिओ आला. मायक्रोमॅक्स आपला ‘इन’ हा ब्रँड घेऊन पुन्हा बाजारात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले.

आत्मनिर्भर भारत आणि चिनी मालावर बहिष्कार या दोन गोष्टी लक्षात ठेवून त्यांनी आपली टॅग लाईन ठेवली, ‘चिनी कमी!’ तर बघूया या इन ब्रँड मध्ये येणाऱ्या फोन्सचे काय स्पेसिफिकेशन असणार आहे ते.

 

cheeni kum inmarathi

 

एक जीआयएफ इमेज ट्विट करून मायक्रोमॅक्सने आपल्या फोन मध्ये मीडियाटेकचे जी८५ आणि जी३५ प्रोसेसर असल्याचे रिव्हील केले.

मीडियाटेकचे इतर प्रोसेसर जरी कमजोर असले तरी जी सिरीज ही गेमिंगच्या बाबतीत पावरफुल असल्याचे जगजाहीर आहे. आपल्या मुलाखतीमध्ये राहुल बजाज यांनी आधीच सांगितलेलं की त्यांचे नवीन फोन हे गेमिंग सेन्ट्रीक असणार आहेत.

जी८५ हा याच वर्षी लॉन्च झाला. रेडमी नोट ९ आणि रियलमीच्या नार्जो २० मध्ये हाच प्रोसेसर आहे.आणि या फोन्सची किंमत ही १२००० च्या आत आहे.

तर जी ३५ हा रेडमी ९, पोको सी३,रियलमी सी११ या फोन्स मध्ये आहे.आणि हे फोन ७००० ते ९००० किमतीमध्ये उपलब्ध आहे.

त्यामुळे एकूणच मायक्रोमॅक्सचे हे इन फोन हे बजेट फ्रेंडली असणार हे नक्की.

इन सिरीजचे फोन हे गुगलच्या अँड्रॉइड वन या प्लॅटफॉर्म वर आधारित असणार आहे. ज्यामध्ये रियलमीचा कलर ओएस आणि रेडमीच्या एमआययुआय सारखा काही एक्स्ट्रा नसणार आहे.

अँड्रॉइड वन असल्या कारणाने या ओएसमध्ये काही अतिरिक्त नको असलेले अँप नसणार आहे. शिवाय मध्ये मध्ये येणाऱ्या जाहिराती सुद्धा नसणार आहेत.

या दोन्ही गोष्टींचा भरणा हा रियलमी, रेडमी, ओप्पो आणि विवो च्या फोन्स मध्ये आहे.

किमतीच्या बाबतीत राहुल शर्मा यांनी आधीच सांगितले की त्यांचे फोन ७००० च्या कमी आणि १५००० च्या वर नसणार नाही आहेत. त्यामुळे रेडमी आणि रियलमी च्या बजेट सेन्ट्रीक फोनला टक्कर देण्याच्या विचारात मायक्रोमॅक्स असल्याचे दिसून येत आहे.

तर, चायनीज फोन रिब्रॅण्ड करून भारतात विकणाऱ्या मायक्रोमॅक्सचा हा ‘चिनी कम’ चा फंडा भारतात कितपत रुजेल?

 

micromax in inmarathi

 

नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार भारतात चायनीज फोन्सचा वाटा हा सर्वाधिक आहे आणि या फोन्समध्ये चायनीज फोन्सला टक्कर देत आहे ती कोरियन कंपनी सॅमसंग.

भारतीय स्मार्टफोन मार्केटचा एक साधा नियम आहे, कमी किमतीत चांगले स्पेक्स द्या आणि मार्केटच्या लाटेवर स्वार व्हा.

सॅमसंगची एम सिरीज, रियलमीच्या सी सिरीज, रेडमीची नोट सिरीज हे बजेटमध्ये उत्तम स्पेक्स देऊन आज मार्केटमध्ये आपला दबदबा राखून ठेवला आहे.

त्यामुळे मायक्रोमॅक्सचे हे दोन इन सिरीजचे फोन मार्केट मध्ये किती जलवा दाखवते आणि मार्केट मध्ये आपलं स्थान पुन्हा मिळवते का हे पाहणे रंजक असेल.

चिनी मालाच्या बहिष्काराच्या लाटेवर स्वार होत, ‘चिनी कम’ चा नारा देत मायक्रोमॅक्स आणि त्याची नवीन इन सिरीज भारताला कितपत आत्मनिर्भर करू शकते हे येणाऱ्या काळात कळूनच येईल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?