महिलांसाठी जीव की प्राण असलेला हा सौंदर्याचा दागिना जपण्यासाठी या टिप्स नक्की उपयोगी ठरतील!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपण कधी “पर्सनल ग्रुमिंग” बद्दल काही वाचले असेल, ऐकले असेल, पाहिले असेल तर केसांपासून पायांच्या नखांपर्यंत सगळे पर्सनल ग्रुमिंगचा भाग आहे हे आपल्याला समजलेच असेल.
कधी कधी आपले फर्स्ट इम्प्रेशन हे आपल्याला नखांवर सुद्धा अवलंबून असते. कारण, सतत दाताने नखं चावणे, व्यवस्थित स्वच्छ ना ठेवणे ही सगळी लो कॉन्फिडन्सची लक्षणे आहेत.
याशिवाय, आपली नखं आपल्या आरोग्याचे प्रतिबिंब असते हेही म्हणायला हरकत नाही.
जसे –
. नखांचा रंग अर्धा पांढरा आणि अर्धा गुलाबी असेल तर किडनी संबंधी आजार असण्याची शक्यता असते.
. नखांचा रंग पिवळा असला तर लंग डिसिज किंवा त्या संबंधी आजार असतो.
. हल्की पांढर, निस्तेज, शुष्क नखं असली आणि त्यावर उभ्या रेषा असल्या की अॅनीमिया असतो.
. काळा किंवा निळसर रंग असला की शरीराला पुरेसा ऑक्सिजन चा पुरवठा न होण्याचे ते संकेत असते.
. पांढरी नखं असल्यास लिव्हर मध्ये गडबड आहे हे समजावे.
त्याच प्रमाणे, नखांचा आजूबाजूची सालं आणि नखांवर येणारी त्वचेची पातळ परत, म्हणजेच क्यूटीकल्स निघणे, भेगा पडणे त्यांतून रक्त येणे हे सगळे दिसायला सुद्धा अत्यंत किळसवाणे वाटते.
यामुळे महिला असो वा पुरुष सगळ्यांनी ह्या सौंदर्याचा दागिना असलेल्या आणि आरोग्याचा आरसा असलेल्या नखांची काळजी घेण्याच्या काही टिप्स नक्कीच ट्राय करून बघायला हव्या.
१) मॅनिक्युअर करणे कमी करा –
महिना दोन महिन्यांतून एखाद वेळेस मॅनिक्युर करणे ठिक असते. पण सतत मॅनिक्युर करणे आपल्याला नखांसाठी हानिकारक असते. कारण मॅनिक्युर करताना जे लोशन, सोप, वापरतात त्यात हानिकारक केमिकल्स असतात.
ज्यामुळे आपल्या नखांत असलेले नैसर्गिक तेल नष्ट होते. व बॅक्टेरिया पासून बचाव करण्यासाठी, तिथली त्वचा ओली ठेवण्यासाठी आपल्याला सतत बाहेरील म्हणजेच अनैसर्गिक क्रीम वर अवलंबून राहावे लागते.
शिवाय मॅनिक्युर करताना कधी कधी ज्या पद्धतीने नखांना घासल्या जाते त्याने सुद्धा नखांना ईजा होते.
२) स्ट्रॉंग नेल इक्वेशन –
नखं, ही आपल्याला शरीराचा महत्त्वाचा पण दुर्लक्षित अवयव आहे. नखांखाली काही बिंदू असतात त्यांना सुरक्षित ठेवणारी ही नखं सुदृढ ठेवण्यासाठी सकस आहार घेण्याची अत्यंत आवश्यकता असते.
ज्यात व्हिटॅमिन बी, सी,डी, कॅल्शिअम, फॉलीक अॅसिड ह्या सगळ्यांचा समावेश असायला हवा. संतुलित आहार सुदृढ नखं हे समीकरण लक्षात ठेऊन त्या अनुषंगाने पाऊलं उचलावीत.
यानेच अर्ध्या पेक्षा जास्त समस्यांचे निरसन होईल.
३) भेगा पडणे व नखं तुटणे –
नख कापलं की दुखत नाही पण भेग पडली, जिव्हाली लागली किंवा ते तुटलं की जी वेदना होते त्याचे शब्दात वर्णन करणे अवघडच आहे. आणि यानंतर ते दिसायला ही फार काही बरं दिसत नाही.
त्यामुळे नखं वाकडी तिकडी तुटली असतील, तर काहील उपाय ट्राय करून पाहा –
१. कोमट ऑलिव्ह ऑइल ने दर आठवड्याला नखांची मालिश करा. याने नखं मजबूत होतील आणि तुटणार नाहीत.
२. लिंबू वापरून झाल्यावर, उरलेल्या सालाने रोज नखांना ३-४ मिनिटे पुसून काढा. याने नखांवरचा पिवळटपणा जाईल व नखं चमकतील.
३. तीन चमचे व्होडका घेऊन त्यात १ चमचा लिंबाचा रस घालून हे मिश्रण थंड ठिकाणी, हवा बंद बाटलीत स्टोअर करून ठेवा.
आणि रोज साल निघालेल्या ठिकाणी, आणि सगळ्याच नखांना हे मिश्रण लावा. याने नखाच्या बाजूचे साल निघणे, नखं तुटणे कमी होईल.
३. क्यूटीकल्स सॉफ्टनर –
नखांवर येणारा पातळ त्वचेचा थर आणि आजूबाजूची त्वचा निघायला नको म्हणून ती मऊ ठेवणे गरजेचे असते. ते क्यूटीकल्स सॉफ्ट ठेवण्यासाठी काही टिप्स –
अननस – थोडे ताजे अननस घ्या व त्यात १ चमचा व्हिनेगर घालून ते मॅश करून घ्या. या मिश्रणात संपूर्ण नख बुडवून ठेवा. हे करताना आजूबाजूची त्वचा नीट बुडेल याकडे लक्ष द्या.
आणि दर ३-४ दिवसांनी या मिश्रणाने मालिश करा. याने नखांची त्वचा मऊ राहील व शुष्क होऊन साल निघणार नाही.
पपई – पपई मध्ये टीशू सॉफ्ट करणारे एनझाइम्स असतात. त्यामुळे पपईची एक फोड घेऊन त्यात १ चमचा लिंबाचा रस आणि व्हिनेगर किंवा व्होडका घाला. आणि ह्या मिश्रणाने ७ दिवस रोज, २० मिनिटे मालिश करा.
याने क्यूटीकल्स सॉफ्ट होतील.
४) नाजूक नखं –
थोडे ऑलिव्ह ऑइल किंवा ऐरंडेल तेल गरम करून त्यात सेज (sage) ची पानं (ती ऑनलाईन उपलब्ध असतात) घाला आणि हे तेल गार होऊ द्या. या पानांचा अर्क त्या गरम तेलात उतरतो. ह्या तेलाने आपल्या नखांची मालिश करा.
फंगल इन्फेक्शन ने, खूप जोरात घडल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे जर नखं खराब झाली असतील तर लहान वाटीने अर्धी वाटी मध घेऊन त्यात १ एग योक, २ चमचे ऐरंडेल तेल किंवा अवोकाडो ऑइल आणि १२५ मिली समुद्री मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
आणि हवाबंद बरणीत भरून, फ्रिज मधे ठेऊन द्या. रोज हे मिश्रण नखांवर लावा आणि अर्धा तास वाळू द्या. नखं पुन्हा पूर्वीसारखी सुदृढ होतील.
५) नेल बेड ला मॉइश्चरायझ करा –
नेल बेड म्हणजे नखांचे मुळ, जिथून नखं उगवतात व वाढतात. कधी कधी नेल बेड शुष्क होऊन सुद्धा नखांची वाढ नीट होत नाही. त्यामुळे आपल्या नेल बेड ला सध्या खोबऱ्याच्या तेलाने मालिश करून मॉइश्चायझ करा.
६) बायोटीन सप्लिमेंट्स –
नखांच्या वाढीसाठी B व्हिटॅमिन गटातील बायोटिन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे शरीरात याची कमतरता असली की नखांचा समस्या उद्भवतात.
त्या टाळण्यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सायानुसर बायोतीन सप्लिमेंट्स घेणे सुरू करा.
७) अॅसीटोन बेस असलेले रीमुव्हर आणि नेल पॉलिश वापरणे टाळा –
डर्मिटॉलॉजिस्ट्स नुसार, अॅसीटोन बेस असलेले नेल रीमुव्हर आणि नेल पॉलिश सतत वापरल्याने सुदृढ नखं खराब होतात.
या अॅसीटोनचा आपल्या नखांवर अत्यंत हानिकारक परिणाम होतो व नखांची हेल्थ बिघडून अनेक इन्फेक्शन आणि नखांचा समस्या उद्भवतात. त्यामुळे अॅसीटोन असलेले कोणतेही नेल प्रॉडक्ट वापरणे पूर्णपणे टाळा.
८) शाम्पू –
आपल्याला ठाऊक नसेल पण शाम्पू फक्त केसांवर परिणाम करतो असे नाही. शाम्पू आपण हातानेच कोणतेही ग्लव्हज वगेरे न वापरता च लावतो कारण साहजिक आहे, अंघोळ करताना ग्लव्हज कोण वापरेल?
पण त्यामुळे कधी कधी काही शाम्पू आपल्या नखांना सूट होत नाही. त्या शाम्पूतील केमिकल्स मुले चांगली नखं सुद्धा खराब होतात.
त्यामुळे नेहमी शाम्पू वापरताना त्याचा आपल्या हातांवर व नखांवर काय परिणाम होतो ते पाहूनच त्याचा वापर सुरू ठेवा. यापैकी कोणत्या टिप्स आपल्याला आवडल्या व अजून नवीन कोणत्या टिप्स आपल्याकडे आहेत हे आम्हाला नक्की कळवा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.