Naked- नक्की पहायला हवा असा लघुपट!
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
===
दीर्घ सिनेमांपेक्षा बऱ्याच जणांना लघुपटाची अर्थात शॉर्ट फिल्म्स पाहण्याची आवड असते आणि ते चांगलही आहे म्हणा, कारण एकतर त्यात नेहमीच्या सिनेमासारखा तोच तोच पणा नसतो, दुसरं म्हणजे एखाद्या विषयाची आपल्याला माहित नसलेली दुसरी बाजू वेगळ्या दृष्टीकोणाने पाहायला मिळते आणि पुढे कित्येक दिवस त्या पाहिलेल्या शॉर्ट फिल्मचं मनावर गारुड राहतं ते ही वेगळंच!
गेल्या ५-६ वर्षांमध्ये हे शॉर्ट फिल्म्सचं फॅड खूप वाढलंय, त्यातून कित्येक नव नवीन विषय हातळले गेलेत, जे कमर्शियल फिल्म निर्माते सहसा टाळतात. यामध्ये फिल्ममेकिंगची आवड असणारे तरुण आघाडीवर आहेत. १०-१५ मिनिटांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी किंवा त्यातून वेगळा संदेश देणारी कथा शोधून काढणं आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून ती जिवंत करणं, हे वाटतं तेवढ सोप्प काम नाही. याचं शॉर्ट फिल्म्सच्या जगताने कितीतरी उत्तमोत्तम फिल्म दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ आपल्या फिल्म इंडस्ट्रीला दिले. आज २-३ तासांच्या फिल्मला जेवढा मान दिला जातो, तेवढाच मान शॉर्ट फिल्म्सना देखील मिळतो, त्यामुळे प्रस्थापित दिग्दर्शकांना देखील शॉर्ट फिल्म्स बनवण्याची चटक लागली नाही तर नवलच! अश्याच प्रस्थापित दिग्दर्शकांपैकी एक राकेश कुमार यांनी देखील मध्यंतरी एक शॉर्टफिल्म बनवली होती. शॉर्ट फिल्मचे नाव- Naked अर्थात नग्न! फिल्मला टायटल इतक जबरदस्त दिलंय की कोणाचीही उत्सुकता चाळावी, अश्याच उत्सुकतेतून हा लघुपट पाहण्यात आला आणि काहीसा वेगळ्या धाटणीचा चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले.
कल्की कोचलीन आणि रीताभरी यांचा अभिनय शॉर्ट फिल्म संपल्यानंतरही लक्षात राहतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे पुढील दोन दिवस तरी चित्रपटाची नशा काही केल्या उतरत नाही, हेच या शॉर्ट फिल्मचे यश मानावे लागेल. हाताळलेला विषय हा काही नवा नाही पण फक्त नाविन्याचीच कास धरायची गरज काय आहे… ?? कालिदासाच्या शाकुन्तलापासून जुही चावला आणि ऋषी कपूर च्या “बोल राधा बोल” पर्यंत आपण दिल चुराके भागणेवाला परदेसी बाबू आणि गाव कि भोली भाली गोरी (भारतातल्या गावच्या पोरी आणि गोरी?…..) च्या कथा ऐकत वाचत पाहत आलो आहोतच कि …तेव्हा तेच तेच पुन्हा पून्हा पाहण्याचे आपल्याला काही इतके वावडे नाही …. म्हणून नक्की बघा…!
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi