' हल्ली नवीन फोन्सच्या मागे ३-४ कॅमेरे असतात, एवढे कशाला? त्यांचं काम काय? वाचा – InMarathi

हल्ली नवीन फोन्सच्या मागे ३-४ कॅमेरे असतात, एवढे कशाला? त्यांचं काम काय? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्मार्टफोन – आजकाल आपल्या सर्वांचा बेस्ट फ्रेंड. फक्त तो बोलत नाही इतकाच काय तो फरक आहे. आपण सध्या दिवसातला सर्वात जास्त वेळ  स्मार्ट फोनला देतो यावर कोणाचं दुमत नसावं. बँकिंग, कॅमेरा, विडिओ, ऑनलाईन मीटिंग. प्रत्येक गोष्ट ही स्मार्ट फोनच्या माध्यमातून अगदी सहजरित्या साध्य करत असतो.

काहींना स्मार्टफोन कसा चालतो हे जाणून घेण्याची इच्छा असते, तर काहींचं लक्ष फक्त स्मार्टफोन पासून आपल्याला होणाऱ्या फायद्याकडे असतं.

‘स्मार्टफोनच्या मागे इतके कॅमेरे का असतात ?’ हा जर का तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ह्या लेखात त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल.

 

redmi phone inmarathi

 

काही वर्षांपूर्वी स्मार्टफोनमध्ये दोनच कॅमेरे असायचे. तेव्हा फोटोचे प्रकार सुद्धा सीमित होते. आज मात्र फोटो मध्ये अल्ट्रावाईड मोड, वाईड मोड, Depth मोड, झूम मोड असे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले आहेत.

आज “लो लाईट” आणि “नाईट मोड” मध्ये सुद्धा आपण चांगले फोटो काढू शकतो. सध्या मिळत असलेल्या स्मार्टफोन मधील कॅमेरा मध्ये असे काही सेन्सर्स आहेत, जे की प्रकाशआणि ब्राईटनेस यांच्या मदतीने प्रत्येक क्लिकला एक फ्रेश लुक देण्यासाठी मदत करत असतात. हे सध्या शक्य होत आहे ते प्रत्येक मोबाईल मध्ये असलेल्या एकापेक्षा जास्त कॅमेरांमुळे. 

 

phone inmarathi

 

मल्टिपल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनमध्ये प्रत्येक कॅमेरा individually आणि collectively एकत्र येऊन फोटोग्राफरला त्याच्या अपेक्षेप्रमाणे फोटो घ्यायला मदत करत असतात. या दोन किंवा तीन कॅमेरांनी एकत्र येऊन केलेलं काम म्हणजे आपण सध्या रोज बघतो तो स्मार्ट फोटो.

आधी फक्त सिंगल कॅमेरा होता, मग २ म्हणजे ड्युअल, ट्रिपल आणि आता तर ४ देखील असतात. आता साहजिकच प्रश्न पडेल की यांची काय गरज, तेच आपण जाणून घेणार आहोत.

नवीन स्मार्टफोन घेत असताना बरेच जण जाहिराती मध्ये 13 + 8 + 2 MP हे चिन्ह बघत असतील. याचा अर्थ असा आहे की:

13 Megapixels – मुख्य कॅमेरा

8 MP – Super wide angle camera

2 MP – Depth mode camera

 

 

जेव्हा यापुढे अजूनही एक ‘+2 MP’ असेल तर त्याचा अर्थ हा macro लेन्सचं resolution सांगणारा असतो.

काही वर्षापर्यंत आपण बघितलं असेल, की प्रत्येक फोनच्या मागे दोन कॅमेरा असायचे, आता तीन आहेत. तिसरा कॅमेरा हा केवळ फोनचं झूमिंग वाढवण्यासाठी दिलेला असतो. त्यासोबतच, एका फ्रेम मध्ये जास्तीत जास्त गोष्टी कव्हर व्हाव्यात म्हणून या तिसऱ्या कॅमेराला वाढवण्यात आलं आहे.

वाईड अँगल किंवा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सेन्सर तुमच्या स्मार्टफोन मध्ये असेल, तर तुम्ही एका फोटो मध्ये किती भाग दिसू द्यायचा हे सुद्धा ठरवू शकता.

उदाहरण सांगायचं तर, लँडस्केप मध्ये फोटो घेत असताना तुम्ही वाईड सेन्सरने जास्त एरिया कव्हर करू शकतात.

 

 

नुकत्याच लाँच झालेल्या Oppo Reno 2 मध्ये 20x इतकी, तर Huawei च्या एका फोन मध्ये 30x इतकी झूम करण्याची सोय देण्यात आली आहे. हे सगळं शक्य आहे केवळ ट्रिपल कॅमेरा स्मार्टफोन मध्ये असल्याने.

मोनोक्रोम सेन्सर्स हे तुम्ही फोटो क्लिक करता, तिथल्या प्रकाशयोजनेला सुधरवण्याचं काम करत असतात. तुमच्या मोबाईलला जर का तुम्ही मोनोक्रोम सेन्सर मोड मध्ये शिफ्ट केलं, तर तो Auto ब्राईटनेस ऍडजस्ट करत असतो. त्यामुळे, प्रत्येक फोटोमधील बारीक बारीक गोष्टी या clearly टिपल्या जात असतात. मोनोक्रोम सेन्सर्समुळे फोटो ला एक stability सुद्धा मिळत असते.

एवढे कॅमेराज असले, की तुम्ही कोणत्याही अँगलने फोटो काढू शकता.

ट्रिपल कॅमेरा असण्याचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला तुमचे फोटो कमीत कमी वेळात क्रॉप करता येतात. जे की आधी खूप अवघड काम वाटायचं. आता क्रॉप करताना बरेच ऑप्शन आपल्याला दिलेले दिसतात.

Depth मोड मध्ये कॅमेराचं काम व्यवस्थित होण्यासाठी ट्रिपल कॅमेरा महत्वपूर्ण काम करत असतो.

स्मार्टफोन मध्ये नुकत्याच आलेल्या “bokeh” हा इफेक्ट सुद्धा ट्रिपल कॅमेरा मुळेच साध्य करणं शक्य होत असतं. या इफेक्ट मध्ये तुमचा क्लिक blur होत नाही. iphone7 पासून पुढच्या मॉडेल मध्ये हा इफेक्ट देण्यात आलेला आहे.

 

 

HTC ने नुकताच एक अल्ट्रा pixel सेटअप मोड चा फोन लाँच केला आहे. ज्यामध्ये 3D कॅमेरा फोन आहे. ज्यामुळे 3D इफेक्ट असलेले सिनेमेदेखील तुमच्या स्मार्टफोन वर बघणं शक्य होणार आहे.

स्मार्टफोनच्या या दुनियेत रोज नवनवीन बदल होत आहेत आणि ते जगाला अजून जवळ येण्यास मदत करत आहेत. आपल्याला स्वतःकडे आणि जगाकडे सुंदर नजरेने बघण्यास मदत करत आहेत, त्यासाठी आपण त्यांचे आभार मानले पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?