प्रत्येक पुरुषाने भविष्यातले धोके टाळण्यासाठी या आरोग्य चाचण्या केल्याच पाहिजेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तुमच्याकडे सायकल, बाईक अथवा चार चाकी वाहन यापैकी एक काही तरी नक्की असेलच. या वाहनांची आपण योगू काळजी घेत असतो, सर्व्हिसिंग करत असतो.
हे आपण का करतो? वाहनात आलेला प्रॉब्लेम हा वेळीच दूर व्हावा आणि आपलं वाहन व्यवस्थित निरंतर चालावं म्हणून! होय की नाही? तर,जशी वाहनांनी व्यवस्थित चालावं म्हणून आपण नानाविध प्रकारची काळजी घेत असतो. तसं आपल्या शरीराची घेतो का?
गाडी जरी व्यवस्थित चालत असली, तरी सर्व्हिसिंग करताना तिचा प्रत्येक भाग तपासला जातो. तसंच आपलं आरोग्य, आपली तब्येत जरी व्यवस्थित वाटत असली, तरी शरीराची वेळोवेळी तपासणी झालीच पाहिजे.
वयाच्या तिशी-पस्तिशी मध्ये येणाऱ्या शारीरिक अडचणींवर मात करणं तुलनेने सोप्पं असतं, पण वयाची चाळीशी ओलांडली की उतार वयाकडे आपली वाटचाल सुरू होते. त्यामुळे आपली शारीरिक क्षमता सुद्धा कमी कमी होत जाते.
त्यामुळे गाडीला जशी वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज लागते, तशी चाळीशी नंतर आपल्या शरीराला देखील काही टेस्ट करून घेण्याची गरज भासते.
याच वयात मधुमेह आणि उच्च रक्तदाब या सारख्या व्याधी जडतात. जर शुगरचं कमी जास्त प्रमाण वेळेवरच आपल्याला कळालं, तर त्याप्रमाणे कृती करून आपण मधुमेह आणि तत्सम व्याधींपासून वाच शकतो.
तर, बघूया अशाच काही टेस्ट ज्या चाळीशी आणि चाळीशी पार केलेल्या पुरुषांनी केल्याच पाहिजेत.
१. दातांची तपासणी
वाढत्या वयानुसार शरीरात कॅल्शियम कमी होतं, ज्याचा थेट परिणाम हाडांवर होतो. शरीरात कॅल्शियम कमी झालं आहे याचा पहिला परिणाम दातांवर दिसून येतो.
वाढत्या वयानुसार दात आणि हिरड्यांच्या समस्या सुरू होतात. आपण दातांची काळजी घेत असतो, पण नकळत वाढत्या वयामुळे दातांच्या समस्या सुरू होतात.
त्यामुळे आपल्या खात्रीसाठी दात आणि हिरड्यांची तपासणी करून घ्या.
२. त्वचेचे निरीक्षण/तपासणी
मधुमेह असेल तर त्वचेवर त्याचा थेट फरक पडतो किंवा शरीरावर एखादा तीळ असेल तर त्यात काही बदल झाला आहे का? रंगबदल किंवा तो तीळ प्रसरण पावला आहे का? यासाठी तपासणी करणे गरजेचे आहे.
तसेच, शरीरावर आलेले चट्टे, पांढरे डाग याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. पुढे असलेला धोका पाहता त्याच्या टेस्ट करणे देखील महत्त्वाचे आहे.
३. वृषणची (टेस्टीस) तपासणी
खरंतर वयात आल्यापासूनच ही तपासणी झाली पाहिजे, पण त्याबद्दल आपल्या इथे कुटुंबात तेवढी सहजता नाही.
वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर पण परिणाम व्हायला सुरुवात होते. त्यामुळे वृषणांच्या टेस्ट या महत्त्वाच्या आहेत. त्याठिकाणी जर सूज किंवा गाठ असेल, तर त्यावर तात्काळ उपचार सुरू करून त्याचं निदान होऊ शकतं.
४. कोलेस्टेरॉल लेव्हल
अनपेक्षित येणाऱ्या हार्ट अटॅकला हेच कोलेस्टेरॉल जबाबदार असतं. शरीरातल्या रक्तवाहिन्या ब्लॉक करायचं काम हे अतिरिक्त कोलेस्टेरॉल करत. त्यामुळे कोलेस्टेरॉलच्या लेव्हलची वेळोवेळी तपासणी गरजेची आहे.
हृदय विकार लांब ठेवायचे असतील, तर शरीरात कोलेस्टेरॉल पातळी कमी असणे गरजेचे आहे.
५. उच्च रक्तदाब
जसं वय वाढत जातं, तसं रक्तदाब किंवा ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होतो. उच्च रक्तदाब असेल तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो, त्यामुळे ब्लड प्रेशर योग्य आहे की नाही याची तपासणी केलीच पाहिजे.
६. Glaucoma तपासणी
glaucoma हा डोळ्याचा विकार आहे. यामध्ये डोळ्यांची ऑप्टिक नर्व ही अतिरिक्त दबावामुळे निकामी होते, ज्यामुळे अंधत्व येण्याची असते.
glaucoma ची टेस्ट वयाच्या चाळीशी नंतर दर वर्षी केली गेली पाहिजे.
अतिरिक्त ताण, खाण्यापिण्याच्या बदलेल्या सवयी यामुळे अनेक आजार जडतात. आधी वयाच्या साठीमध्ये होणारे आजार आता ३० ते ४० या वयामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे चाळीशीनंतर आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली, तर आपण तंदुरुस्त राहून दीर्घायुष्य जगू शकतो.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.