घरी सहजपणे वाढवता येईल अशा कोरफडीचे आहेत एवढे सारे आरोग्यदायी फायदे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
एलोवेरा जिला मराठीत कोरफड, हिंदीमध्ये घ्रितकुमारी आणि वैज्ञानिक भाषेत एलो बारबाडेनिस म्हटले जाते. या वनस्पती विषयी तुम्ही ऐकून असालच.
आयुर्वेदामध्ये, चायनीज हरबल मेडिसिन अभ्यासात, तसेच ब्रिटिश हर्बल मेडिसिन अभ्यासात कोरफडीचे कितीतरी महत्त्व सांगितले आहे. या वनस्पतीचा वापर करून कितीतरी सौंदर्यप्रसाधन विक्रेते तसेच हर्बल मेडिसिन विक्रेते लाखोंची कमाई करतात.
जगभरात या वनस्पतीला प्रचंड मागणी आहे. असे क्वचितच कोणीतरी सापडेल ज्याने या वनस्पतीबद्दल कधी ऐकले नसेल. पण तुम्हाला हे माहित आहे का की ह्या वनस्पतीला जगभरात एवढी मागणी का आहे?
आणि जगभरातील बऱ्याच हर्बल मेडिसिन्स मध्ये या वनस्पतीचा वापर का केला जातो?… आज आम्ही त्याच्या बद्दल सांगणार आहोत.
कोरफड ही वनस्पती एक ते दोन फूट उंचीची असते. तिची पाने काटेरी आणि आणि कडू असतात आणि पानांमध्ये अर्क असतो. कोरफडीची पाने प्राणी आणि कीटकांपासून तिची सुरक्षा करण्यास मदत करतात.
या पानांमध्ये जो अर्क दडलेला असतो हाच अर्क गुणकारी असतो. कोरफडीच्या अर्कात ९० टक्के पाणी, काही ऑरगॅनिक आणि इन ऑरगॅनिक कंपाऊंड, काही प्रोटिन्स असतात.
ज्यामध्ये १८ ते २० टक्के अमिनो ऍसिड आणि विटामिन ए, बी, सी आणि इ उपलब्ध असतात. कोरफडीमध्ये सापडणारा अजून एक महत्त्वाचा घटक म्हणजे एकमेनन नावाचा जटील पिष्ट होय.
हा एकमेनन पेशींपर्यंत न्यूट्रिएंट्स पोहोचवायला तसेच शरीराला घातक असणारे टॉक्सिंस काढण्यात मदत करतो.
कोरफडीचा वापर त्वचेवर लावण्यासाठी केला जातो. तसेच तिचा लाभ मिळवण्यासाठी तोंडावाटे ही त्याचे सेवन केले जाते.
अशा या गुणकारी वनस्पतीचे बरेच फायदे आहेत आणि ते मिळवणयासाठी त्या वनस्पतीचा कशा पद्धतीने वापर केला पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
त्वचेसाठी कोरफडीचा वापर कसा करावा?
त्वचेसाठी कोरफडीचे बरेच फायदे आहेत. काही विशिष्ट पद्धतीत कोरफडीचा वापर केला तर त्वचेसाठी उपयुक्त असलेले न्यूट्रिशन आपण पुरवू शकतो.
जर तुम्ही याचा वापर करू लागलात तर तुम्हालाही त्याच्या गुणांचा अनुभव येऊ लागेल आणि म्हणूनच आयुर्वेदाने कोरफडीला चमत्कार म्हटले आहे.
ज्याचा वापर जखम भरून काढण्यासाठी, त्वचा कापल्यानंतर, त्वचेचा रुक्षपणा कमी करण्यासाठी तसेच त्वचा जळल्यानंतर केला जातो.
डर्मेटोलॉजिस्ट असे म्हणतात की कोरफडीमध्ये विटामिन सी, इ, बेटा कॅरोटीन उपलब्ध असतात. ज्यामुळे त्वचेचे संगोपन होते आणि त्वचा तरुण दिसू लागते.
बरेच डर्मेटोलॉजिस्ट सुचवतात की त्वचेला एक उत्तम मॉइश्चरायझर लावले पाहिजे. यामुळे त्वचेला ओलावा प्राप्त होईल. जर तुम्ही अशाच कोणत्या मॉइस्चराइजर च्या शोधात असाल तर कोरफड एक उत्तम मॉइश्चरायझर आहे.
ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी कोरफड मॉइश्चरायझर म्हणून उत्तम पर्याय आहे. कारण, त्वचेला तेलकट न करता ही तुम्हाला संतुलित ओलावा प्राप्त करून देते.
ज्या लोकांची त्वचा रुक्ष आहे त्यांच्यासाठीही कोरफड फायदेशीर आहे. रुक्ष त्वचा असलेल्यांनी चिमुटभर हळद, एक चमचा मध, गुलाब जलाचे काही थेंब आणि थोड्या प्रमाणात कोरफडीचा अर्क याचे मिश्रण करून घ्यावे.
हे चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवावे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
पहिल्याच वापरात तुम्हाला फरक जाणवेल आणि याचा आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापर केल्यास तुम्हाला मुलायम त्वचा मिळेल.
स्क्रब म्हणून कोरफडीचा वापर
एका वाटीत थोड्या प्रमाणात कोरफड घ्यावी त्यात एक चमचा साखर आणि दोन चमचे लिंबाचा रस पिळावा. साखरेचा उपयोग त्वचेवरील मृत त्वचा काढण्यासाठी होतो. तर कोरफड त्वचेतील टॉक्सिक पदार्थ खोलपर्यंत साफ करते.
लिंबाचा रस तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र कमी करण्यासाठी मदत करतात आणि आणि तसेच लिंबाच्या रसामुळे उन्हामुळे होणारा काळपटपणा कमी होतो.
संवेदनशील त्वचेसाठी कोरफडीचा वापर
जर कोणतेही सौंदर्यप्रसाधन वस्तू लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर दुष्परिणाम दिसतात तर अशा त्वचेसाठी विशिष्ट पद्धतीने कोरफडीचा वापर केला तर फायदेशीर ठरू शकतो.
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर त्यासाठी थोड्या प्रमाणात कोरफडीचा अर्क, काकडीचा रस, दही, गुलाबाचे तेल यांचे मिश्रण करून चेहर्यावर लावावे.
जवळजवळ वीस मिनिटासाठी हे मिश्रण तसेच राहू द्यावे आणि मग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. यामुळे तुमच्या त्वचेतील पेशींना उपयुक्त न्यूट्रिएंट्स मिळतील तसेच ओलावा प्राप्त होईल आणि तुमची त्वचा मुलायम होईल.
त्वचेवरील तारुण्यपीटिका दूर करण्यासाठी
वय वर्षे १४ ते ३० या काळात शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे बऱ्याच जणांना तारुण्यपिटिका म्हणजेच अकनेची समस्या उद्भवते. जर तुम्हालाही हाच त्रास असेल तर कोरफड तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.
यासाठी तुम्हाला एका वाटीत थोड्याप्रमाणात कोरफडीचा अर्क, वाटून घेतलेले अक्रोड आणि मध घ्यावे लागेल.
कोरफडी मध्ये असलेले गुणकारी तत्त्व तसेच मधातील अँटिऑक्सिडंट तुम्हाला एक स्वच्छ आणि मुलायम त्वचा प्राप्त करून देतील.
केसांसाठी कोरफडीचा उपयोग
कोरफडीचा अर्क एक उत्तम कंडीशनर आहे. केसांसाठी उपयुक्त असणारे महत्त्वाचे असलेले प्रोटीन म्हणजे कॅरेटिन ज्यामध्ये अमिनो ऍसिड, ऑक्सिजन, कार्बन आणि काही प्रमाणात हायड्रोजन, नायट्रोजन आणि सल्फर उपलब्ध असतात.
कोरफडी मध्ये हे याच कॅरेटीनशी समरूप असे काही केमिकल्स असतात. ज्यामुळे केसांना उपयुक्त न्यूट्रिएंट्स मिळतात आणि ज्यामुळे केसांची मुळे घट्ट होऊन ते तुटत नाहीत.
जर तुम्हाला घनदाट केस हवे असतील तर एक्स्ट्रा वर्जिन खोबरेल तेलाबरोबर थोड्या प्रमाणात कोरफडीचा रस केसांना लावावा. हे केल्याने तुमच्या मनासारखे केस तुम्हाला मिळतील.
कोरफडीच्या सहाय्याने तुम्हाला नैसर्गिक रित्या सुंदर आणि निरोगी केस मिळवता येतील.
वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा वापर
सौंदर्यप्रसाधनांच्या वस्तुंच्या निर्मितीमध्ये नव्हे तर आरोग्यासाठीसुद्धा कोरफडीचा वापर केला जातो. कोरफडीचे सेवन केल्यामुळे तुमचे पचन सुरळीत होते.
तसेच कोरफडीमध्ये उपलब्ध असणाऱ्या काही घटकांमुळे वजनही कमी होते. कोरफडीत मुबलक प्रमाणात विटामिन्स, मिनरल्स उपलब्ध असतात. त्यामुळे वजन कमी होते.
तसेच कोरफडी मधील अमिनो ऍसिड आणि आहारात उपलब्ध असणारे न्यूट्रिएंट्स शरीरापर्यंत पोहोचवण्यात मदतही करतात. कोरफडीमुळे पचन प्रक्रियेत सुद्धा सुधारणा होते. ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते.
कोरफडीच्या रसाचे सेवन केले जाते. कोरफडीमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ दूर होण्यास मदत होते. तसेच शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
कोरफडीमध्ये प्रोटिन्स असतात. ज्यामुळे स्नायूंच्या वाढीस मदत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
असे बरेच अभ्यास झाले आहेत ज्यामध्ये हे सिद्ध झाले आहे की कोरफड ही वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे तसेच तिचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला बरेच फायदे होतात.
कोरफडीचा रस हा कडू असून तो नुसता घेणे शक्य नसतो. कोरफडीचा रस बनवण्यासाठी कोरफडीचा अर्क लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या आणि तो मिक्सरला लावा.
मग हा रस काही अन्य फळांच्या रसाबरोबर घ्या जे चवीला गोड आहेत. तुम्ही कोरफडीची पाने थेट मिक्सरला लावूनही ही रस मिळू शकता.
जर कडू चवीमुळे तुम्हाला पिणे अवघड जात असेल तर त्यामध्ये थोडे मध घाला. याचे दररोज सेवन केल्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईलच पण शरीरास अन्य फायदेही मिळतील.
जर तुम्हाला कोरफडीचे अधिकाधिक फायदे मिळवायचे असतील तर बाजारातील एलोवेरा जेल विकत घेण्यापेक्षा घरच्या घरीच तुम्ही एखादे कोरफडीचे झाड बाळगले तर अधिक फायदेशीर ठरेल.
फक्त याचा अतिरिक्त वापर सुद्धा टाळला पाहिजे कारण कोणत्याही गोष्टी चा अति प्रमाणात केलेला वापर नेहमीच हानीकारक ठरू शकतो.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.