' अशा उड्या मारुन पठ्ठ्याने गिनीज बुकमध्ये मिळवले स्थान, जरूर वाचा! – InMarathi

अशा उड्या मारुन पठ्ठ्याने गिनीज बुकमध्ये मिळवले स्थान, जरूर वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लहानपणी कधीतरी आपण दोरीवरच्या उड्या मारतो आणि मग काही दिवस हा खेळ आपल्या खूप आवडीचा असतो. मित्रांबरोबर, घरांमधील लोकांबरोबर आपण मग शर्यत लावून उड्या मारतो.

कोणाच्या उड्या जास्त होतात हेदेखील पाहत असतो. इतरांपेक्षा एक जरी उडी जास्त झाली तरी आपल्याला कोण आनंद होतो!

पण मग नंतर मोठे होताना आयुष्याच्या वळणावर कधीतरी ही दोरी आपल्या हातून सुटते.

मग पुढे कधीतरी आपण वजनदार माणसे होतो. (म्हणजेच आवश्यकतेपेक्षा जास्त जाडी) मग जिम् इंस्ट्रक्टर असेल किंवा कोणी फिटनेस फ्रीक मित्र असेल, असे लोक मग आपल्याला सल्ला द्यायला लागतात, दोरीवरच्या उड्या मारा आणि वजन कमी करा.

तसंच लहानपणी आपल्याला स्केटिंग देखील खूप आवडायचं. कधीतरी कुठल्यातरी सिनेमात ते पाहिलेलं असायचं. क्वचित एखाद्याच कुणाकडे तरी रोलर स्केट्स असायचे.

एक तर असे स्केट्स महाग, त्यातून आपल्याकडे रस्ते गर्दीने भरलेले. स्केट्स खेळायलाही फारशी जागा नाही.

परदेशात रस्ते आणि फूटपाथ इतके व्यवस्थित असतात की लोक ऑफिसला जातानाही स्केटिंग करत जातात. आजकाल तर ते वेव्ह बोर्ड घेऊनही तिकडे लोक फिरत असतात.

 

roller skates inmarathi

 

त्यामध्ये काही तरी स्टंटबाजी करताना तिकडे लोक दिसतात. आताच्या मुलांना कदाचित स्केटिंगच इतकं अप्रूप वाटणार नाही, कारण त्यांना ते करायला मिळतं.

खेळायला जागा नसली तरी स्पोर्ट्स क्लब मध्ये अशा सुविधा आता उपलब्ध आहेत. बऱ्याच सोसायटीमध्ये देखील मुलं हे खेळताना दिसतात. निदान तितकी सोय तरी सध्या उपलब्ध आहे.

पण तेव्हाही काय किंवा आताही काय भारतात एका ठराविक वयानंतर माणूस इतर खेळा प्रमाणेच स्केटिंग करायचे देखील सोडतो.

पण भारतातच स्केटिंग घालून दोरीवरच्या उड्या कोणी मारतय असं सांगितलं तर! विश्वास नाही बसत ना!

दिल्लीत राहणाऱ्या २१ वर्षाच्या तरुणाने हे करून दाखवले आहे. बरं नुसतच त्याने स्केटिंग घालून दोरीवरच्या उड्या मारल्या नाहीत तर त्यामध्ये विश्वविक्रम देखील केला आहे. त्याचं नाव आता गिनिज बुक मध्येही गेलेलं आहे.

दिल्ली येथे राहणाऱ्या जोरावर सिंगने हा पराक्रम केलेला आहे. त्याने रोलर स्केट्स घालून दोरीवरच्या उड्या मारल्या.

केवळ तीस सेकंदात त्याने १४७ उड्या मारल्या आहेत. आणि हा पराक्रम त्याने २०२० च्या फेब्रुवारी महिन्यातील २१ तारखेला केलेला आहे. त्याचा हाच रेकॉर्ड आता गिनिज बुकमध्ये नोंदवला गेला आहे.

 

zorawar singh inmarathi

 

त्याचा हा रेकॉर्ड सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला. हा रेकॉर्ड होण्याआधी त्याने आठवड्यातील सलग सहा दिवस रोज चार तास प्रॅक्टिस केली. आणि ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे’ च्या दिवशीच त्याने हा विक्रम केला.

शाळेत असताना जोरावर सिंग हा थाळीफेक करण्यात प्रवीण होता. त्याला त्यात इंटरेस्ट होता. केवळ १३ वर्षांचा असताना त्याला दुखापत झाली आणि त्याच्यामागे पाठीचे दुखणे लागले.

त्यामुळे त्याला थाळीफेक सोडून द्यावी लागली. परंतु त्याला स्वतःचा फिटनेस जपून ठेवायचा होता. म्हणून मग त्याने दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली.

नंतर मग त्याला दोरीवरच्या उड्या मारण्याची आवड निर्माण झाली. पुढे मग जिकडे दोरीवरच्या उड्या मारायची शर्यत असायची त्यात तो भाग घ्यायला लागला.

या आवडी मधूनच त्याने दोरीवरच्या उड्याचं पहिलं राष्ट्रीय पदक मिळवलं. त्यानंतर २०१६ मध्ये साउथ एशियन चॅम्पियनशिपमध्ये ही त्याने भाग घेतला, आणि तिथेही पदक मिळवलं.

पुढे मग तो पोर्तुगालला तिथे होणाऱ्या दोरीवरच्या उड्यांच्या चॅम्पियनशिप साठी गेला. स्पर्धेच्या आधी त्याची तब्येत बिघडली, तरीही त्या स्पर्धेत तो चौथा आला.

त्यानंतरच त्याने ठरवले की दोरीवरच्या उड्या मध्ये आपण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करावं. त्यासाठी मग त्याने तयारी सुरू केली. दररोज तो चार तास याची प्रॅक्टिस करायचा.

 

zorawar record inmarathi

 

यासाठी स्वतःच्या डायट वर देखील त्याने लक्ष केंद्रित केले होते. कित्येक घरगुती कार्यक्रम देखील त्याने अटेंड केले नाहीत.

अशा प्रकारचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला काहीतरी सोडावं लागतं असं तो म्हणतो. कुछ पाने के लिये कुछ खोना जरुरी रहता है!

नुसत्या दोरीवरच्या उड्या न मारता त्याने या वेळेस रोलर स्केट्स घालून दोरीवरच्या उड्या मारल्या.

याआधीही जोरावर ने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत. रोलर स्केट्स घालून त्याने एक मिनिटात २६२ उड्या मारल्या आहेत. आणि आता तीस सेकंदात १४७ उड्या मारल्या आहेत.

त्याच प्रमाणे दोरी उलट बाजूने फिरवत देखील त्याने तीस सेकंदात ८२ उड्या मारल्या आहेत. हा वर्ल्ड रेकॉर्ड देखील जोरावरच्याच नावावर आहे.

जोरावरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर असाच एक पिरॅमिड व्हील जम्पिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेजण जमिनीवर उभे आहेत आणि त्यांच्या खांद्यावर दोघे बसले आहेत.

खांद्यावर जे आहेत त्यांच्याजवळ दोऱ्या आहेत. आणि या चौघांचे एका लयीमध्ये उड्या मारणे सुरु होते. या चौघांचं सिंक्रोनायझेशन खूपच छान जमून आलंय.

त्यानंतर वरचे दोघे खाली उतरतात, व आणखीन वेगळे उड्यांचे प्रकार पाहायला मिळतात.

 

pyramid wheel jump inmarathi

 

हा पिरामिड व्हील जम्पिंग करण्यासाठी जोरावर आणि त्याच्या मित्रांनी जवळजवळ सहा वर्ष प्रॅक्टिस केली आणि आता मात्र त्यात मास्टरी मिळवली.

जोरावरच्या इतर व्हिडिओ प्रमाणेच हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचा हा व्हिडिओ २५ सप्टेंबरला आला. खूप लोकांनी तो पाहून त्याला लाईक आणि शेअर केलं.

लोकांनी त्यावर amazing अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

जोरावरला अशा अनेक गोष्टी सतत करायच्या आहेत. आता त्याने त्याच्या बरोबर काही लोकांनाही त्यासाठी तयार केले आहे. आपल्या आवडीची गोष्ट त्याला करायला मिळते म्हणून तो सध्या खुश आहे.

निराळे वर्ल्ड रेकॉर्ड तो करीत आहे. त्याच्या अशा सगळ्या पुढच्या गोष्टींसाठी शुभेच्छा देऊयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?