' दुपारची झोप चांगली का वाईट? वाचा, पॉवर नॅप आणि गाढ झोपेतील फरक – InMarathi

दुपारची झोप चांगली का वाईट? वाचा, पॉवर नॅप आणि गाढ झोपेतील फरक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

झोप ही आपल्या शरीराच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. काही लोकांना सलग सहा तास झोप ही पुरेशी असते तर काही ७ किंवा ८ तास.

त्यापेक्षा जास्त जर का तुम्हाला झोप येत असेल तर तुमच्या शरीरात काही तरी ‘केमिकल लोचा’ आहे असं समजायला हवं आहे आणि त्यावर उपाय करायला पाहिजे.

 

sleeping inmarathi

 

रात्री शांत झोप झाल्यावर पुन्हा दुपारी झोपण्याची सुद्धा काही जणांना सवय असते. वामकुक्षी हे सुंदर नाव त्याला देण्यात आलं आहे. पुणे शहर तर दुपारी १ ते ४ ही वेळ आराम करण्याची या समजुतीने वर्षानुवर्ष प्रसिद्ध आहे.

जसराज जोशी या गायकाने मध्यंतरी पुणे शहराबद्दल एक गाणं गायलं होतं त्याची सुरुवातच अशी होती, “१ ते ४ सारे पसार…”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

गुजरात मधील राजकोट हे शहर सुद्धा या १ ते ४ च्या निद्रा ब्रेक प्रमाणेच काम करतं. तिथे तर बँक सुद्धा या वेळेत बंद असतात कारण कोणी बँकेत येतच नाही.

‘स्क्रीन टाईम’ वाढल्यानंतर काही वेळासाठी पॉवर नॅप घेणं वेगळं आणि दुपारी एक दोन तासांसाठी झोपणं ही सवय योग्य नाही. ‘दुपारी झोपणं म्हणजे दारिद्र्याचं लक्षण’ असे आपले वरिष्ठ लोक सांगायचे.

पण, आपल्याला तर न ऐकण्यातच जास्त मजा वाटते. दुपारी का झोपू नये? यामागे काही वैज्ञानिक कारणं सुद्धा आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात:

३ लाख लोकांच्या झोपण्याच्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हे सांगितलं आहे की, दुपारी जास्त वेळ झोपल्याने तुम्हाला हृदयाचा आजार होऊ शकतो आणि अकाली निधन सुद्धा होऊ शकतं.

 

power nap inmarathi

४० मिनिटांपेक्षा जास्त जर तुम्ही दुपारी झोपत असाल तर तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीला सामोरं जावं लागेल असं डॉक्टर सांगतात.

दुपारी जास्त वेळ झोपल्याने पचनाचे आजार सुद्धा होण्याची शक्यता जास्त असते असं तज्ञ सांगतात.

त्यासोबतच, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल लेवल वाढणे, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणे हे सुद्धा आजार होऊ शकतात असं अमेरिकेतील कॉलेज ऑफ cardiology ने एका कॉन्फरन्स द्वारे सांगितलं आहे.

Dr. Tamada यांनी एका रिसर्च मध्ये सांगितलं होतं की,

” दुपारी झोप घेत असाल तर ४० मिनिटांपेक्षा जास्त घेऊ नका. त्यापेक्षा जास्त झोपणं म्हणजे आजारांना निमंत्रण आहे. ३० मिनिटांपर्यंत झोप घेऊन ताजेतवाने वाटत असेल, शरीराला उगीच जास्त झोपण्याची सवय लावू नका.”

डायबेटिस आणि स्थूलपणा याचं सुद्धा प्रमुख कारण हे रोज दुपारी ४० मिनिटांपेक्षा जास्त झोपणे हे असू शकतं असं काही रिसर्च सांगतात.

६० मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त झोपणाऱ्या व्यक्तींना डायबेटिस २ या प्रकारच्या आजाराला समोरं जावं लागण्याची शक्यता ५०% ने अधिक वाढते.

त्यासोबतच छातीचे आजार होण्याचं प्रमाण सुद्धा ८२% ने वाढतं असं रिसर्च सांगतात. अकाली निधनाचं प्रमाण हे दुपारच्या झोपण्याने २७% ने वाढतं असं एका रिसर्च ने सांगितलं आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग च्या एका अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल आणि ती झोप जर का तुम्ही दुपारी भरून काढण्याचा प्रयत्न करत असाल तर मोठी चूक करत आहात.

 

sleep or tenstion at night InMarathi

 

तसं केल्याने तुमची रात्रीची झोप अजून कमी होईल.त्यापेक्षा रात्री वेळेत झोपण्याची तुमच्या शरीराला सवय लावा.

झोप लागत असताना कोणते विचार येत असेल तर तो विचार दुसऱ्या दिवसाच्या डायरी मध्ये लिहून ठेवा, म्हणजे मन शांत होईल आणि झोप लागेल.

थोड्या वेळासाठी म्हणजे ३० मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळ झोपण्याला आरोग्यास अनुकूल समजलं जात असलं तरीही ज्यांना त्याची गरज नाहीये त्यांनी ती सवय लागण्यासाठी प्रयत्न करू नयेत.

पॉवर नॅप मुळे तुमचा थकवा दुर होऊन तुम्हाला फ्रेश वाटू शकतं आणि तुमचा मूड सुद्धा चांगला होऊ शकतो. पण, ती नॅप ३० मिनिटांपर्यंतच असावी.

अन्यथा, शरीर हे रात्रीच्या झोपण्याप्रमाणे ‘स्लीपिंग मोड’ मध्ये जातं आणि पुन्हा जागं होताना एक effort शरीराला घ्यावा लागतो.

४० मिनिटांपेक्षा जास्त दिवसा झोप घेतली तर तुम्ही सतर्कता आवश्यक असलेले काम करू शकणार नाहीत आणि तुमची समरणशक्ती सुद्धा कमकुवत होईल.

दुपारी झोपत असताना जर का ३० मिनिटांचा अलार्म लावून झोपलात आणि त्या अलार्म चा आदर करत वेळेत उठलात तर त्याला ‘पॉवर नॅप’ म्हणतात.

power nap inmarathi 2

 

झोपेची ही सायकल व्यवस्थित चालण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मेहनत घ्यावी लागते. पण, एकदा सवय लागली की तुमचं शरीर हे पहिल्या अलार्म वर झोपेतून उठायला सुरुवात करेल.

“माझी इच्छा नसते, पण झोप येतेच” हे स्टेटस असणाऱ्या लोकांनी वरील दुष्परिणाम वाचून आपल्या सवयीला बदलण्यास सुरुवात करावी.

कारण, आपल्या सवयी या आपल्यालाच बदलाव्या लागतात. इतर लोक फक्त सांगतील, आत्मसात आपल्यालाच करावं लागेल. ते म्हणतात ना,  “अच्छी आदते मुझे ही तो सिखानी है…” हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?