Site icon InMarathi

तुरट चवीच्या आवळ्याचे हे ८ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या…

amla-featured-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजारांवर घरगुती उपाय करणं, हे आपल्यासाठी नवीन नाही. वर्षानुवर्षे अनेक आजार बरे करण्यासाठी, घरात नेहमी वापरात येणाऱ्या पदार्थांचा वापर केला जात आहे. कुणी त्याला आजीचा बटवा म्हणावं, तर कुणी आणखी काही!

 

 

पोटदुखी किंवा पोटाच्या इतर विकारांसाठी ओवा, सर्दी-खोकला वगैरे आजारांसाठी वेगवेगळे काढे करणं. छातीत कफ भरल्यास ओव्याची धुरी घेणं. हळदमधाचं चाटण, लवंग, तुळस असे पदार्थ, किंवा पुदिन्यासारखा चवदार आणि औषधी गुणधर्म असलेला पदार्थ सेवन करणं.

एवढंच नाही तर जखमेवर हळद चेचून ती जखम बरं करणं सुद्धा आपल्यासाठी नवीन नाही. थोडंसं कापलं म्हणून बँडेड वगैरे लावण्याची पद्धत जुन्या काळात नव्हती.

छोट्यामोठ्या आजारांसाठी डॉक्टरकडे जाणं तर आपल्या संस्कृतीत अजिबातच पाहायला मिळत नसे. हल्लीच्या काळात मात्र हे घरगुती उपाय कुठेतरी मागे पडत असल्याचं दिसतंय. खोकला झाल्यावर चाटण घेण्यापेक्षा डॉक्टरकडे जाऊन लाल औषध घेणं आपल्याला आवडतं.

सुंठ, ज्येष्ठमध ही घरगुती औषध घेण्याचा विचार आपण करत नाही. जिथे रोजच्या वापरातील या पदार्थांचे औषधी गुणधर्म विस्मरणात गेले आहेत, तिथे आवळा सुद्धा एक औषधी फळ आहे हे लक्षात ठेवणं अवघडच!

चवीला तुरट असलेला आवळा सी व्हिटॅमिन मिळवण्यासाठी उयुक्त आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक बाबींपैकी एक आहे. आवळा त्यासाठी तर गुणकारी ठरतोच, शिवाय त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. आज जाणून घेऊया याच आवळ्याच्या फायद्यांविषयी…

 

१. इम्युनिटी बुस्टर

आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा आठ पट अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. सी व्हिटॅमिन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यावश्यक असते. व्हायरस आणि बॅक्टरीयाशी लढण्याची क्षमता सी व्हिटॅमिनमुळे वाढते. चयापचय योग्यप्रकारे होण्यात सुद्धा याचा फायदा होतो. याशिवाय आवळ्याच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांचा सुद्धा इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयोग होतो.

२. चरबी घटवणं

लॉकडाऊनचा परिणाम म्हणून घरात बसून राहणं, बंद किंवा कमी झालेला व्यायाम ही परिस्थिती आपल्यासाठी नवीन नाही. यामुळे वाढलेले वजन आणि चरबी कमी करण्यासाठी सुद्धा आवळा फायदेशीर ठरू शकतो.

 

befitandfine.com

आवळ्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. आवळ्याच्या सेवनामुळे, शरीराची प्रोटीनची गरज कमी होते. परिणामी खाण्यावर ताबा राहतो. आणल्यामुळे चयापचय उत्तम होते. त्यामुळे वजन मर्यादित राहण्यास मदत होते.

३. हृदयविकार आणि कॅन्सरसारखे दीर्घकालीन आणि दुर्धर आजार

आवळ्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. याशिवाय इन्सुलिन सुद्धा पुरेशा प्रमाणात तयार होते. याचा फायदा डायबेटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी होतो. ब्लडप्रेशरवर नियंत्रण राखण्यासाठी सकाळी आवळ्याचे सेवन करणे फायदेशीर असते.

 

 

त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. शरीरात ऑक्सिजनचा वापर झाल्यावर रॅडिकल्सची निर्मिती होऊ शकते. यामुळे कॅन्सरसारखे दुर्धर आजार होण्याचा धोका असतो. हा धोका कमी करण्याचे काम आवळा करू शकतो.

४. सांधेदुखी आणि अल्सरवर गुणकारी

वातामुळे गुडघे, खांदे आणि कोपर इत्यादींचे सांधे दुखणे ही आजच्या काळातील सामान्य समस्या झाली आहे.

 

 

अशी दुखणी दूर करण्यासाठी आवळा अत्यंत गुणकारी आहे. यासाठी आवळ्याचे सेवन करायला हवे.तोंडातील अल्सरवर सुद्धा आवळ्याचा रस उपयोगी ठरू शकतो. ग्लासभर पाण्यात आवळ्याचा रस मिसळून त्याने गुळण्या केल्यास अल्सर बारा होण्यास मदत होते.

५. बद्धकोष्ठ

तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तर आवळ्याचे सेवन कराच! आवळा अल्कधर्मी आहे. त्यामुळे पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी उपयुक्त आहे. शिवाय आवळ्यात फायबरचे प्रमाण सुद्धा मुबलक असते. परिणामी पोट साफ होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे आवळा पित्ताचा त्रास आणि पोटातील अल्सर कमी करण्यासाठी सुद्धा खूपच गुणकारी ठरतो.

 

६. डोळ्यांचे उत्तम आरोग्य

आवळ्यामध्ये कॅरोटीन असते. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार दृष्टी उत्तम राहण्यासाठी याचा फायदा होतो. मोतीबिंदू म्हणजेच कॅटरॅक्ट, डोळे लाल होणे, डोळ्यांवर अतिरिक्त ताण, यावरही आवळा गुणकारी आहे. म्हणजेच आवळ्याचे नियमित सेवन केल्यास, डोळ्यांचे आरोग्य कायम उत्तम राहील.

 

७. केस आणि त्वचेसाठी गुणकारी

डँड्रफ आणि केस पांढरे होणे या समस्या तुम्हाला असतील, तर नियमितपणे आवळ्याचे सेवन करा. डँड्रफ होणे आणि केस पांढरे होण्याचा वेग या दोन्ही गोष्टी त्यामुळे नियंत्रणात राहतील. याशिवाय केसांची मुळे अधिक मजबूत होतील. आवळ्याचा वापर नैसर्गिक हेअर कंडिशनर म्हणूनही उत्तम काम करू शकतो.

 

youtube.com

 

आवळ्याचे तेल किंवा हेअरपॅक याचा वापर यासाठी करता येईल.

तुम्हाला तरुण दिसायचं असेल आणि त्वचेवरील ग्लो कायम राखायचा असेल, तर आवळा हा उत्तम पर्याय ठरेल. आवळ्याच्या सेवनामुळे त्वचेचे योग्यप्रकारे हायड्रेशन होते. त्वचेची निगा राखायची असेल, तर आवळा उत्तम!

८. सर्दी आणि कफ

सर्दी किंवा कफ झाला असेल, तर दोन चमचे आवळा पावडर आणि दोन चमचे मधाचं मिश्रण दिवसातून ३ ते ४ वेळा घ्या. यामुळे लगेच आराम मिळेल. सर्दी आणि कफही छूमंतर व्हायला मदत होईल.

 

patrika

 

दररोजच या मिश्रणाचे दिवसातून एकदा सेवन केल्यास, सर्दी आणि कफाच्या त्रासापासून दूर राहता येईल.

याशिवाय आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस अशा आवश्यक घटकांचा पुरवठा आवळ्यामुळे होतो.

दिवसभरातून एकदातरी आवळ्याचे ग्लासभर सरबत घेणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. आवळा सुपारी, मोरावळा किंवा आवळ्याचे लोणचे हे सुद्धा आवळ्याच्या नियमित सेवनासाठी उत्तम पर्याय ठरतात.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version