रोज वापरल्या जाणाऱ्या इयरफोन्सची ही खासियत नेमकी आहे तरी काय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
इयरफोन्सवर गाण ऐकायला आवडत नाही अशा व्यक्ती अगदीच कमी असतील.
सुरवातीला केवळ पाश्चात्य देशांमध्ये रुजलेला हेडफोन कधी भारतात आला आणि सर्वांचा आवडता झाला हे कळलं नाही.
हल्ली लहान मुलंही कानात हेडफोन्स घालून कार्टुन्स पाहताना दिसतात, आणि त्याचवेळी त्यांचे आजीआजोबाही हेडफोन्स लावून भजनाचा आनंद घेतात.
प्रवास असो वा काम, प्रत्येक बाबतीत हेडफोन्सचा वापर केला जातो. पण रोज ज्या हेडफोन्सवर अवलंबून असतो, त्याच्याबाबतीतली सर्वात महत्वाची, रंजक गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का?
ही गोष्ट किती लोकांच्या लक्षात आली आहे ते ठावूक नाही, पण तुम्ही इयरफोनकडे बारकाईने लक्ष दिले तर तुमच्या लक्षात येईल की इयरफोनच्या डाव्या बाजूला L आणि उजव्या बाजूला R लिहिलेलं असतं.
जर तुम्ही चायना इयरफोन वापरत असाल तर कदाचित तुम्हाला ही गोष्ट आढळणार नाही.
कारण प्रत्येक चायना इयरफोनवर असे लिहिलेले नसते. पण एखादा ओरिजिनल इयरफोन पाहिलात तर तुम्हाला Left/Right लिहिलेलं नक्की आढळेल.
आज जाणून घेऊया या मागचं लॉजिक!
मुख्य गोष्ट म्हणजे हे L आणि R असं दर्शवतं की, तुम्हाला इयरफोनची कोणती बाजू कोणत्या कानात घालायचा आहे.
म्हणजे ज्या भागावर L लिहिलेलं असतं तो भाग तुम्ही डाव्या कानात घालणं अपेक्षित असतं आणि ज्या भागावर R लिहिलेलं असतं तो भाग उजव्या कानात घालणं अपेक्षित असतं.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
पण आपण कुठे एवढं लक्ष देतो.
जो भाग ज्या हातात येईल तो भाग सरळ त्या त्या कानात घालून मोकळे होतो.
आता तुम्ही म्हणालं की, दोन्ही बाजूंनी उत्तम तर आवाज येतो आणि उलट सुटल घातलं तर त्रास देखील काही होत नाही, मग Left/Right ची चिन्ह देण्याचा काय फायदा?
खरतरं प्रश्न एकदम साधा आहे, पण त्यामागचं उत्तर मात्र गहन आहे! Sound Engineering पासून Recording पर्यंत प्रत्येक गोष्ट डोळ्यासमोर ठेवून ही चिन्ह देण्यात येतात.
Stereo Recording च्या वेळेस एखादा ध्वनी डाव्या बाजूने येत असेल तर तर तुमच्या इयरफोनच्या Left बाजूकडून तो ध्वनी मोठ्या आवाजात ऐकू येईल आणि जर तुम्ही हा ध्वनी Right बाजूकडून ऐकायला गेलात तर तुम्हाला कमी आवाजात ऐकू येईल.
हे झालं एक कारण..!
–
- इयरफोन्स वापरण्याचे हे “धोके” जाणून घेतलेत तर इयरफोन्स वापरणे बंद कराल!
- हे वाचल्यानंतर दुसऱ्याचे इयरफोन्स वापरण्याचा धोका आपण कधीही पत्करणार नाही
–
इयरफोनवर Left/Right लिहिण्यामागे अजून एक कारण असं आहे की, यामुळे दोन आवाजांना वेगवेगळ करून ऐकणं सोप्प होतं.
त्या दोन आवाजांमधला फरक जाणून घेणं देखील सोप होतं.
अशी अनेक गाणी असतात ज्यामध्ये Loud Musical Instruments उदा. ढोल किंवा Soft Musical instrument उदा. बासरी, यांसारखी दोन टोकांची वाद्ये एकत्र वाजवली जातात.
अश्यावेळेस एका वाद्याच्या आवाजामागे दुसरा आवाज लपू नये म्हणून दोन्ही आवाजांना एकत्र वेगवेगळ्या चॅनेलमध्ये (Left किंवा Right) ऐकलं जातं.
तसेच चित्रपटाच्या अचूक Sound Recording साठी Left आणि Right चॅनेल असणं गरजेच आहे.
तुम्ही कधीतरी एखादा चित्रपट लॅपटॉपवर किंवा फोनवर आपल्या एयरफोनच्या माध्यमातून ऐकला असेल, तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की स्क्रीनच्या डाव्या बाजूकडून येणारा एखाद्या गाडीचा आवाज पहिल्यांदा इयरफोनच्या डाव्या बाजूकडूनच ऐकू येतो.
आणि त्यानंतर हळूहळू इयरफोनच्या उजव्या बाजूकडून ऐकायला येतो.
हे यासाठी केलं जातं जेणेकरून चित्रपट पाहणाऱ्याला त्या प्रसंगात तो तेथे असल्याचा फील यावा!
अश्यावेळेस जर तुम्ही इयरफोनची डावी बाजू उजव्या कानात आणि उजवी बाजू डाव्या कानात घातली असेल तर तुम्ही तो अनुभव घेऊ शकणार नाही.
असं आहे हे गुपित इयरफोनच्या दोन्ही बाजूंना Left/Right लिहिण्यामागचं!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.