' रोजच्या जेवणाची चव वाढवणाऱ्या या पदार्थाचे ८ फायदे आणि ३ तोटे जाणून घ्या! – InMarathi

रोजच्या जेवणाची चव वाढवणाऱ्या या पदार्थाचे ८ फायदे आणि ३ तोटे जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“लोणचं” आपल्या सगळ्यांचाच आवडता एक चटकदार पदार्थ. भारतात, इतक्या नित्य नियमाने दर वर्षी लोणची घातली जातात की ती आता आपल्या इंडियन क्युझिनचा एक अविभाज्य भाग झालियेत.

कैरी, आवळा, करवंद, लिंबू, गाजर, मुळा, कांदा, मिरची बापरे! किती प्रकारची लोणची असतात नांव घेता घेता दम लागतो. लहानपणी लोणचं पोळीचा रोल प्रत्येकाचाच आवडता असतो.

 

pickle inmarathi

 

लोणचं कोणत्याही बोरिंग मिळमिळीत जेवणाला आपल्या चटकदार चवीचा आधार देऊन चविष्ट बनवते. फक्त तोंडी लावायला, जेवणाची चव वाढवायला बनवलेल्या लोणच्याशिवाय नैवेद्य पण पूर्ण होत नाही.

एखादी भाजी आवडत नसेल तर लोणच्याच्या मसाल्यात घालून तिला अजून चविष्ट बनवून आपण मुलांना पण देऊ शकतो. मुळात लोणचं म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट ऋतुत येणाऱ्या भाजीला भरपूर तेल, मीठ – मसाल्यांमध्ये घालून ती भाजी वर्षभरासाठी प्रिझर्व करून ठेवणे.

भारतात कैरी, लिंबू, मिरची, गाजर, आवळा, करवंद, ह्या भाज्या व फळे यांचा लोणचं बनवण्यात जास्त वापर केला जातो.

इतकं हे आवडतं लोणचं आपल्या साठी भरपूर फायदेशीर ठरते. पण अती तिथे माती म्हणतात ना, तसच या लोणच्याचे अती सेवन झाले की आपल्याला त्याचे दुष्परिणामही दिसून येतात.

तर जाणून घेऊया आपल्या या आवडत्या पदार्थाचे फायदे व तोटे –

फायदे – 

१) अँटी ऑक्सीडंट्स –

लोणचं घालताना नेहमीच कच्च्या भाज्या, कच्ची फळं यांचा वापर केला जातो. ह्या भाज्या व फळे न पिकल्यामुळे व न शिजवल्यामुळे अँटी ऑक्सीडंट्स चे मोठे स्त्रोत असतात.

लोणच्यातील हे अँटी ऑक्सीडंट्स आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्सशी काढून आपली एजिंग, अर्थात लवकर वृद्धत्व येण्यापासून बचाव करतात.

 

pickle inmarathi 2

 

अँटी ऑक्सीडंट्स आपल्याला शरीराला सुरक्षा देऊन सेल्युलर मेटाबोलिस्म च्या दुष्परिणामांपासून पण आपला बचाव करतात.

२) पचनक्रिया सुधारणे –

भारतात आवळ्याचे लोणचं लोकप्रिय आहे. काही घरात हे ही बघायला मिळते की जेवणा आधी हे लोणचे अॅपीटायझर म्हणून खाल्ले जाते. त्याचे कारण असे की आपल्या पोटातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया हे उपयुक्त बॅक्टेरिया असतात.

यांच्यामुळे आपल्या पोटात पचनक्रिया व्यवस्थित पार पडत असते. पण अँटी बायोटिक ची मात्रा अधिक झाली, की हे प्रोबायोटिक बॅक्टेरिया सुद्धा मरतात.

आणि कुठल्याही प्रकारे त्यांची संख्या कमी झाली की आपली पचनक्रिया बिघडते.

पण व्हिनेगर रहित, नैसर्गिक मसाले, तेल, मीठ घालून केलेले व नैसर्गिक पद्धतीने फर्मेंटेड हे लोणचे आपल्या पोटातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया वाढवून आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

३) व्हिटॅमिन व मिनरलस् –

लोणच्या मध्ये कच्च्या भाज्या, फळे असल्यामुळे यांची न्यूट्रीएन्ट्स लेव्हल जास्त असते. कधी कधी आपण ताजी लोणची सुद्धा खातो ज्यात कोथिंबीर, गोड लिंबाची पाने, ईत्यादि घालतो.

या घरी केलेल्या ताज्या लोणच्यात व्हिटॅमिन A, C, K आणि Folate असतं व या शिवाय आयर्न, पोटॅशियम, कॅल्शिअम यांसारखे मिनरल सुद्धा असतात.

 

pickle 2 inmarathi

 

त्यामुळे मुलांना भाजी आवडत नसेल तर तिला लोणचे मसाल्यात घालून, किंवा फक्त भाजी बरोबर लोणचं देऊन चविष्ट बनवू शकता.

४) रोगप्रतिकरकशक्ती व अवयव सुधार –

लोणच्यात अँटी ऑक्सीडंट्स, व्हिटॅमिन व मिनरलस् आणि बरेच मायक्रो न्यूट्रीएन्ट्स असल्यामुळे आपल्या शरीराला सुदृढ बनवून हाडांना सशक्त बनवणे, दृष्टी सुधारणे, अनिमिया पासून बचाव करणे, व या व्यतिरिक्त बरेच रोग, आजार, विकार घालवण्यासाठी लोणची उपयुक्त ठरतात.

५) शुगर लेव्हल –

व्हिनेगर युक्त लोणचं रक्तातील अॅसिटीक अॅसिड वाढून, हिमोग्लोबिन वाढवते व ब्लड शुगर लेव्हल कमी करते. हे लोणचं डायबिटीज वर चांगला उपाय आहे.

पण एक गोष्ट अशी लक्षात ठेवावी की यात असलेल्या मिठामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते.

६) लिव्हर साठी उपयुक्त –

लोणच्याच्या मसाल्यांच्या व भाज्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये hepatoprotective असते. हे आपल्या लिव्हर साठी अत्यंत उपयुक्त असते.

७) अल्सर्स पासून बचाव –

अल्सर म्हणजे पेशीच्या बाहेरचे म्युकस चे अवरण अचानक कमकुवत पडून हायपर अॅसिडीटी मुळे सेल व एसिड च्या रिएक्शन मुळे झालेली जखम किंवा गाठ.

तर आवळ्याचे लोणचे, या अल्सर ना दूर ठेवण्यास अत्यंत गुणकारक ठरते. आवळ्यात अॅसिडीटी कमी करण्याचे तत्व असतात त्यामुळे नियमित लोणचे खाल्ल्याने गॅस्ट्रीक अल्सरचा धोका टाळता येतो.

८) प्रेग्नेंसी मध्ये गुणकारी लोणचं –

 

pickle in pregnancy inmarathi

 

प्रेग्नेंसीच्या पहिल्या ट्रायमिस्टर होणाऱ्या मळमळ व नॉशिया यांच्यावर रामबाण उपाय म्हणजे लोणचं. लोणच्याच्या आंबट, चटकदार चवी मुळे हा त्रास कमी होतो व टेस्ट बड्स सुधारतात.

 

तोटे –

१) सर्वाधिक मिठाचा वापर –

लोणच्यात मीठ भरपूर प्रमाणात वापरले जाते. WHO च्या अहवालानुसार आपल्याला ५ ग्राम किंवा १ छोटा चमचा मिठाच्या डेली डोस ची आवश्यकता असते. पण लोणच्यात मिठाचे प्रमाण याहून फार जास्त असते.

त्यामुळे रोज, लोणचे फक्त चवीपुरते न खाता भाजी समजून खाल्ले तर आपल्याला हायपर टेंशन, हायपर एसिडीटी, वाढलेला रक्तदाबाचा त्रास या सारख्या समस्या होऊ शकतात.

घरगुती लोणच्यात साधे मीठ असते, पण बाजारातून आणलेल्या पॅकिंगच्या लोणच्यात अनेक केमिकल्स, जसे की Sodium benzoate प्रिसर्वेटीव म्हणून वापरले असतात.

 

Green chilli pickle InMarathi

 

ज्यामुळे विविध प्रकारचे अल्सर व कॅन्सर जसे इसोफेगल कॅन्सर, गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते.

२) विस्कळीत पचनक्रिया –

जिथे लोणच्याचा लिमिटेड वापर, पचनक्रिया सुदृढ बनवतो, तिथे हेच लोणचे प्रमाणापेक्षा अधिक सेवन केल्याने पचनक्रिया बिघडवू पण शकते.

लोणच्यात भरभरून तेल, मीठ, मसाले असतात. ज्यामुळे इतके मधिक मसाल्यांच्या असंतुलित सेवनामुळे जळती लागते शिवाय तुमच्या शरीरातले पणी सेल मध्येच साठलेले राहते व पोट फुगणे, गॅस होणे, असे त्रास उद्भवतात.

३) तेलाचा अती वापर –

लोणच्यात भरपूर तेल घालावे लागते जेणेकरून बुरशी लागणार नाही. पण याच तेलाचे अती सेवन केल्यास कॉलेस्ट्रॉलचा त्रास उद्भवतो व तुम्हाला वेगवेगळे हृदय विकार होण्याच शक्यता असते.

 

cholesterol inmarathi

 

याशिवाय लोणच्याचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्याने डायरिया, ब्लड प्रेशर मध्ये सारखे बदल झाल्याने अचानक चक्कर येणे, घाम येणे, यांसारखे भरपूर दुष्परिणाम होतात.

त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अती वापर झाला की आपल्यासाठी ती गोष्ट फायद्याची उरत नसून हानिकारक बनते. यामुळे लोणच्याला चवीपुरतेच असूद्या व खाण्याची लज्जत कायम ठेवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?