' “डिप्रेशन” च्या भरात स्वतःलाच संपवण्याचा कट रचणाऱ्या एका अभिनेत्रीची रंजक कहाणी – InMarathi

“डिप्रेशन” च्या भरात स्वतःलाच संपवण्याचा कट रचणाऱ्या एका अभिनेत्रीची रंजक कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

डिप्रेशन, होय बरोबर वाचलंत डिप्रेशनमध्ये माणूस काय काय करू शकतो हे आपल्याला खरंच सांगता येणं कठीण आहे, कारण त्या वेळेस त्या व्यक्तीच्या डोक्यात चाललेले विचार हे कुणीच जाणून घेऊ शकत नाही.

अगदी त्या व्यक्तीच्या जवळची माणसं देखील त्यांच्या समस्या जाणून घेऊ शकत नाहीत.

सई ताम्हणकरच्या हंटर सिनेमा मध्ये वासूचं कॅरेक्टर पार पाडलेला अभिनेता गुलशन देवय्या याचा मागे अमेझॉन प्राईम वर एक वेब सिरीज आलेली ‘अफसोस’ नावाची.

 

afsos inmarathi

 

त्यामध्ये तो एवढा डिप्रेस असतो की त्याने तब्बल ११ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो.पण काही न काही होऊन त्यात त्याला अपयश येत. शेवटी वैतागून तो काँट्रॅक घेऊन मर्डर करणाऱ्या एका स्त्रीला स्वतःची सुपारी देतो.

ही झाली फिल्मी स्क्रिप्ट, पण खऱ्या आयुष्यात असं काही होऊ शकतं? किंवा असं व्हायची शक्यता आहे का? शक्यता तर नाकारता येत नाही. कारण अस घडलं आहे ते सुद्धा एका जगप्रसिद्ध अभिनेत्री सोबत.

होय. हॉलिवूड चित्रपटांमधली प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलीना जोली सोबत ही घटना घडली आहे.

डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे असं आपण म्हणू शकतो.

तर, ब्रँड पिट सोबतच बहुचर्चित लग्न आणि दत्तक घेतलेल्या मुलांचा विषय बाजारात गरम व्हायच्या आधी अँजेलीना जोलीच्या आयुष्यात तणावपूर्ण परिस्थिती आली होती.

 

mr and mrs smith inmarathu

 

सेलेब्रेटी लोकांची बायोग्राफी बनवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अँड्र्यू मॉटर्न सांगतात, मिस्टर आणि मिसेस स्मिथच्या या स्टारला तिचे बालपण तिला अस्वस्थ करत होते.

लहानपणी तिच्या सोबत घटलेल्या घटनेचा तिच्या मनावर विचित्र परिणाम झालेला होता. परिणामी डिप्रेशनमध्ये जायला तिची ही स्थिती कारणीभूत ठरली.

तिची आई तिला घरात पाचव्या माळ्यावर बंद करून ठेवायची. कारण ती तिच्या आईला सोडून गेलेल्या तिच्या वडिलांची जॉन वॉईटची आठवण करून द्यायची.

(जॉन वॉईट हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत.)

मॉटर्न पुढे म्हणतात, नैराश्येपोटी अँजेलीना ड्रग्ज घ्यायची आणि हातावर वार करून स्वतःलाच जखमी करुन घ्यायची.

तिच्यासाठी ही मोकळेपणाची भावना होती. आपल्यापैकी बहुतेकांसाठी ते विचित्र वाटेल परंतु मानसिक आघात असलेल्या अँजेलिनासारख्या एखाद्या व्यक्तीसाठी हा एक स्ट्रेस रिलीफचा मार्ग असू शकतो.

तिच्या डिप्रेशनला अजून एक कारण म्हणजे तिचे पहिले लग्न.

 

angelina jolie inmarathi

 

शरीरभर टॅटू असलेला आणि अँजेलीना सोबत पाचवे लग्न करणाऱ्या अभिनेता बिली बॉब थॉर्नटनशी अँजेलीनाचा झालेला विवाहाविषयी तसेच तिच्या भावासोबतचे विचित्र नातेसंबंध याबद्दलही अनेक अफवा पसरल्या होत्या.

या अफवांच्या आणि ड्रग्ज घेण्याच्या आरोपाचा परिणाम तिच्या २००१ च्या अ‍ॅक्शन फिल्म टॉम्ब रायडरमध्ये लारा क्रॉफ्टच्या भूमिकेसाठीच्या ऑडिशन वर झाला.

तिचे वडील अभिनेता जॉन वॉईट आणि जेब फोंडा यांनी पॅरामाउंट पिक्चर्सच्या तत्कालीन अध्यक्ष, शेरी लॅन्सिंग यांना जोलीच्या “बॅगेज” बद्दल चेतावणी दिली आणि परिणामी तिला ड्रग्ज टेस्टला सामोरे जावं लागलं.

या सगळ्या गोष्टींमुळे अँजेलीना जोली मध्ये न्यूनगंडाची एवढी तीव्र भावना निर्माण झाली की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 

angelina-jolie-inmarathi

 

पण आत्महत्या केली तर त्यामुळे तिच्या आजूबाजूच्या लोकांना आणि कुटुंबाला याला जबाबदार ठरवले गेले असते आणि त्यांना नाहक त्रास भोगावा लागला असता.

त्यामुळे तिने एका कॉन्ट्रॅक्ट किलरला तिच्या स्वतःच्या हत्येची सुपारी दिली. टॉम्ब रायडरच्या शूटिंग दरम्यानच तिच्यावर हल्ला केला जावा अशी तिचा प्लॅन होता.

हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात तिचा मृत्यु झाला हे ऐकायला आणि पचवायला आत्महत्या केली यापेक्षा बरेच आहे असं अँजेलीना जोलीचं मत होतं.

अँजेलीना सांगते, ज्या व्यक्तीला तिने तिच्या हत्येच कॉन्ट्रॅक्ट दिलेलं तो एकदम गोड आणि मृदू भाषेत बोलायचा. त्याने तिला महिनाभराचा वेळ दिला होता यावर विचार करायला.

 

angelina jolie inmarathi2

 

तिचा विचार बदलणार नसेल तर तो हे काम पूर्णत्वास नेणार होता.

पण, याच महिन्या भराच्या काळात तिच्या भोवतालच्या गोष्टी बदलू लागल्या, ती मनापासून फिल्म्सच्या चित्रिकरणामध्ये भाग घेऊ लागली. तिच्या चुकीच्या सवयी सुटायला लागल्या.

आणि मुख्य म्हणजे तिची नवीन आलेली फिल्म जोरदार हिट राहिली. अन तिने हा खुनाचा निर्णय बदलला. आज ती स्वतः हा निर्णय किती मूर्खपणाचा होता याचा विचार करून स्वतःचं हसते.

पण तिला या मानसिकतेमधून बाहेर येण्यासाठी तिने स्वतः केलेल्या मेहनतीमुळे ती स्वतःची पाठ थोपटण्यास विसरत नाही.

एकूणच काय, तर मानसिक ताण, अपयश याने मानसिक खच्चीकरण होते त्याला दुमत नाही. पण त्याला आत्महत्या हा पर्याय नाही.

आत्महत्या, खून यासारख्या गोष्टींवर विचार करण्यापेक्षा त्या अपयशातून बाहेर कसं पडायचं यावर डोकं चालवा. अँजेलीना जोलीच्या या कथेत कुठे तरी ही गोष्ट हायलाईट होते हे नक्की.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?