Site icon InMarathi

पबजी बॅन करून भारताचा डिजिटल सर्जिकल स्ट्राईक, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

pubg featured 2 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

साधारण २ महिन्यांपूर्वी भारताने ६९ चायनीज अॅप्लिकेशन बॅन केल्याचं आठवत असेलच. चायना मधून साऱ्या जगात पसरलेला कोरोना व्हायरस आणि लडाख मध्ये निर्माण झालेला तणाव अशा कित्येक समस्यांना कंटाळून अखेर भारत सरकारने तो ऐतिहासिक निर्णय घेतला.

टिकटॉक, शेयर इट, कॅमस्कॅनर अशी कित्येक लोकप्रिय अॅप्लिकेशन त्यात समाविष्ट होती. पण तरीही ह्यात एक नाव प्रामुख्याने नव्हते ते म्हणजे पबजी बॅटलग्राउंड ह्या गेमचं!

पण आज आणखीन एक डिजिटल सर्जिकल स्ट्राइक भारताने चायनावर केला असून आता पबजी सकट ११८ चायनीज अॅप्लिकेशनवर बंदी घातल्याची बातमी बाहेर आली आणि लाखो करोडो पबजी फॅन्स हे निराश झाले!

 

talkesport.com

 

खरतर जेंव्हा पहिल्यांदा काही चायनीज अॅप्लिकेशन बॅन केली तेंव्हापासूनच पबजी बॅन ह्या चर्चेला उधाण आलं होतं.

परंतु पबजी हा मूळ कोरियन गेम आहे, आणि संपूर्ण जगात टया गेम शी रिलेटेड जे मार्केटिंग केलं जायचं ती कंपनी Tencent ही चायनीज कंपनी होती. पण मूळ गेम चायनीज नसल्याने तो बॅन होणार नाही अशा देखील वावड्या उठत होत्या.

शिवाय भारत सरकार चायनीज अॅप्लिकेशन बॅन करण्या मागचं मुख्य कारण म्हणजे प्रायव्हसी पॉलिसी. ह्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्या मोबाइल मधला पर्सनल डेटा धोक्यात असायचा म्हणून यावर सरकारने बंदी आणली.

काही दिवसांपूर्वी पबजी ह्या गेमने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसी बदलल्या देखील. पण तरीही आज भारताने पबजी वर बॅन घालून खूप मोठं पाऊल उचललं आहे.

खरंतर एका अर्थाने पहिले टिकटॉक आणि आता पबजी अशी दोन्ही लोकप्रिय अॅप्लिकेशन बॅन करून सरकारने कित्येक फॅन्सचा रोष ओढवून घेतला आहे असं म्हंटल तरी ती अतिशयोक्ति होणार नाही.

पण ह्या गेममुळे तरुण तसेच लहान मुलं मोबाइलच्या आहारी गेली, घरात कलह व्हायला सुरुवात झाली अशा कित्येक गोष्टी सुद्धा तितक्याच खऱ्या आहेत.

 

digit.in

 

चिकन डिनर च्या नादात कित्येक मुलं स्वतःची तहान भूक विसरून त्या गेममध्ये डोकं खुपसून असायचे. एका अर्थी त्यांच्या घरच्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आजचा दिवस म्हणजे जणू दिवाळी दसराच!

ही बातमी जशी बाहेर आली तसं सोशल मीडिया वर वेगवेगळ्या मिम्स ना उधाण आलं. फेसबुक ट्विटर सगळीकडेच #pubg ट्रेंडिंग दिसायला लागलं. लोकं अतिशय भन्नाट मिम्स शेयर करू लागले.

काहीनी पबजी खेळणाऱ्यांना टिकटॉकच्या पंगतीत नेऊन बसवलं आणि सोशल मीडिया वर मिम्सचा पाऊस पाडायला लागला. त्यापैकीच काही मजेशीर मिम्स इथे शेयर करत आहोत. जरूर बघा आणि आनंद लुटा! 

 

 

सध्या जेइइ आणि नीट चे विद्यार्थी पबजी प्लेअर्स सोबत मिळून असाच काही प्लॅन करत असणार.

 

 

ज्यांनी आयुष्यात कधीच हा गेम खेळला नाही किंवा डाउनलोड सुद्धा केली नाही ते लोकं आज असंच ओरडून ओरडून म्हणतील!

 

 

खुद्द अरणब गोस्वामी जो रिया आणि सुशांत प्रकरणाची रोज चिरफाड करत आहे त्याला सुद्धा त्याच्या खास शैलीत ट्विट करावंस वाटलं म्हणजे बघा!

 

 

सगळ्या पबजी प्लेअर्सची सध्या अशीच अवस्था असणार हे मात्र नक्की.

 

 

ह्या फोटोत तुम्हाला पबजी प्लेअर्स आणि त्यांच्या समस्त पालक वर्गाची प्रतिक्रिया बघायला मिळेल!

 

 

निराश पबजी फॅन्स आता कुठे त्यांच्या भावना व्यक्त करणार?

 

 

ज्यांनी ज्यांनी मन की बात चा व्हीडियो डिसलाइक केला आहे ती लोकं आता पश्चात्ताप करत असणार!

 

 

टिकटॉक युजर पबजी फॅन्सचं सांत्वन करताना!

 

 

पबजी फॅन्सनी निराश व्हायचं कारण नाही. टिकटॉक प्रमाणे पबजी सुद्धा विकत घेऊ शकणारी एकमेव व्यक्ति फक्त आपल्याकडे आहे!

तर हे असं एकंदरच लोकांनी पबजी संदर्भात खूप मजेशीर मिम्स शेयर केले. काही लोकं खुश आहेत काही दुखी आहेत, काही लोकं सरकारच्या ह्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभं करत आहेत.

पण आपण सगळ्यांनीच ह्या धोरणाचं स्वागत केलं पाहिजे. हे सगळं करून कीती फायदा होईल ते सांगणं कठीण आहे पण या अशा गोष्टींमुळे आपलं चायना वर अवलंबून राहणं कमी होईल हे मात्र नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version