Site icon InMarathi

‘नेकी की दुकान’- इथे कुठलीही वस्तू फक्त १० रुपयाला मिळते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखाचं शीर्षक थोडं अविश्वसनीय वाटलं असेल ना? कारण एवढ्या महागाईत एवढी स्वस्ताई येणं तसं मुश्कीलच!

पण खरंच असं एक दुकान आपल्या भारतात आहे जेथे कोणतीही वस्तू केवळ १० रुपयाला दिली जाते.

हे कोणतंही स्वप्न नाही, किंवा ग्राहकांची फसवणूकही नाही, तर प्रामाणिकपणे सुरु केलेला हा एक प्रयोग आहे.

 

 

अर्थात ही सवलत काही खास माणसांसाठीच आहे.

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे कोणाही माणसाला अशीच १० रुपयामध्ये वस्तू दिली जात नाही, ज्या माणसाला खरंच गरज आहे, किंवा जो गरीब आहे आणि ज्याच्याकडे वस्तू खरेदी करायला पैसे अपुरे आहेत अश्या व्यक्तींनाच दैनंदिन वापरातील गरजेच्या वस्तू १० रुपयाला दिल्या जातात.

लुधियाना इंडस्ट्रीयल एरिया मध्ये एक नूर सेवा केंद्र या सामाजिक संस्थेने हे दुकान उघडलं आहे.

कपडे, भांडी, खाद्यपदार्थ आणि इतर गरजेच्या वस्तू या दुकानात उपलब्ध आहेत. असा स्तुप्त उपक्रम चालवणाऱ्या या दुकानाचं नाव देखील अगदी साजेस आहे- नेकी की दुकान!

 

स्रोत

लुधियाना इंडस्ट्रीयल एरिया मध्ये काम करणारे गरीब कामगार या दुकानामधून रोजच्या गरजेच्या वस्तू घेऊन जातात.

आता तुम्ही विचार करत असलं की एवढ्या कमी पैश्यांमध्ये जर वस्तू विकायला काढल्या तर फायदा काहीच नाही, मग नव्या वस्तू भरणार तरी कश्या?

तर ज्या नूर सेवा केंद्र या सामाजिक संस्थेमार्फत हे दुकान चालवलं जातं, त्यांना अनेक देणग्या मिळतात, तसेच आपल्या सारखे मध्यमवर्गीय लोक देखील वापरत नसलेल्या वस्तू दान करतात.

त्यामुळे दुकानातील माल संपला असं कधीच होत नाही.

सुरवातीला प्रायोगिक तत्वावर सुरु केलेला हा व्यवसाय इतका यशस्वी होईल असा कुणी विचारही केला नसेल. 

 

स्रोत

तुम्हाला इराण देशात मशहद शहरामध्ये असणारी मधील ‘नेकी की दिवार’ (दीवार-ए-मेहरबानी) अर्थात मराठीत म्हणायचं झाल्यास माणुसकीची भिंत माहिती आहे का?

 

 

या शहरामध्ये एक भिंत आहे. या भिंतीवर शहरातील नागरिक त्यांच्या वापरात नसलेल्या वस्तू गरजू आणि गरीब लोकांसाठी अडकवून ठेवायचे.

म्हणजे ज्याला कोणाला गरज आहे तो त्याला हवी ती वस्तू घेऊन जाऊ शकतो. याच संकल्पनेवर आधारलेलं आहे लुधियाना मधील ‘नेकी की दुकान’ अर्थात माणुसकीचं दुकान!

 

स्रोत

 

या दुकानाचा एकमेव उद्देश आहे तो म्हणजे गरिबांची निस्वार्थ मनाने सेवा करणं.

त्यामुळे दिवसात कोणीही गरजू जाऊन या दुकानातील वस्तू १० रुपयाला खरेदी करू शकतो. हे दुकान जेथे उघडण्यात आले आहे त्या दुकानाचे भाडे देखील जागेचा मालक घेत नाही.

त्यांनी स्वत:च्या इच्छेने हे दुकान नूर सेवा केंद्र या सामाजिक संस्थेला दान केले आहे.

===

मागील काही वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. पहिल्यांदा केवळ गरजुंची सेवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता.

मात्र गेल्यावर्षापासून या दुकानाने आपली सामाजिक बांधिलकी अधिक बळकट केली आहे. 

 

youtube

 

नेकी की दुकान या मध्ये विक्री होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे, त्यातच संपुर्ण पंजाबच नव्हे तर इतरही राज्यांकडून त्यांना मदत केली जाते.

त्यामुळे संस्थेकडे पुरेसा आर्थिक निधी उपलब्ध होत असल्याने त्या पैशांचा सकारात्मक वापर करत संस्थेने नवा उपक्रम हाती घेतला आहे.

यामध्ये दुकानाला मिळणा-या उत्पन्नातून गरजु व्यक्तींच्या वैद्यकीय उपचारांचा खर्चही केला जातो. 

जर तुम्हाला देखील या समाजसेवी चळवळीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही 085660 60000 या क्रमांकावर संपर्क साधून काही वस्तू दान देऊ शकता अथवा तुम्हाला जमेल तशी मदत करू शकता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version