Site icon InMarathi

“परफेक्शनिस्ट” व्हायचंय? थांबा! याचे गंभीर दुष्परिणाम देखील जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज नेहाने ऑफिस मध्ये केलेल्या कामाचं भरभरून कौतुक होत होतं. प्रत्येकजण ती किती मेहनती, परफेक्शनिस्ट आहे हे सांगत होता. तिलाही ते खूप आवडतं होतं.

परफेक्शनिस्ट होणं कोणाला आवडत नाही!! परफेक्शनिस्ट हा शब्द जास्त प्रचलित झाला तो आमिर खानमुळे. त्याला बॉलीवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हटलं जातं.

परफेक्शनिस्ट व्यक्तींची उदाहरणे ही दिली जातात. अशी परफेक्शनिस्ट व्यक्ती यशस्वी होते हे देखील बिंबवलं जातं. त्यामुळेच अनेक जण परफेक्शनिस्ट होण्यासाठी प्रयत्न करत असतात.

काही लोक अगदी परफेक्शनिस्ट असतातही. म्हणजे बघा हां आपला धोनी ही परफेक्शनिस्ट कॅप्टन म्हणून ओळखला जायचा.

 

quora.com

 

अशा परफेक्शनिस्ट लोकांचा सगळ्यांनाच हेवा वाटतो. हे लोक कसे स्वतःला शिस्तीत बसवून परफेक्ट बनतात हेदेखील आपण पाहतो.

तुमच्यापैकीही अनेक जण परफेक्शनिस्ट होण्यासाठी प्रयत्न करीत असतील किंवा अनेक जण परफेक्शनिस्ट असतीलही, पण थोडं थांबा!

जर तुम्ही परफेक्शनिस्ट असाल तर सावधान! कारण तुम्हालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

परफेक्शनिस्ट म्हणजे काय? तर परिपूर्णता. म्हणजे परिपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणं वेगळं, पण माझ्या मनाप्रमाणे परिपूर्णताच झाली पाहिजे असा हट्ट करणं वेगळं. त्याचा त्रास माणसाला जास्त होऊ शकतो.

थोडक्यात सांगायचं, तर एखादं काम करताना ते कशाप्रकारे परिपूर्ण होईल हे पाहणे, तसा प्रयत्न करणे, त्यातले बारकावे शोधणे, इतरांचेही सहकार्य घेणे आणि ते काम तडीस नेणे, त्या कामाचं लोकांनी कौतुक करणे याला आपण म्हणू शकतो की हे परिपूर्ण काम झाले.

हेच काम केवळ माझ्या मनाप्रमाणेच तंतोतंत परिपूर्ण झालं पाहिजे हे म्हणणं आणि तसं न झाल्यास चिडचिड करणे, आदळआपट करणे, अपयश पचवता न येणे, निराशा येणे. या दोन्ही गोष्टीत फरक नक्कीच आहे.

परफेक्शनिस्ट लोकांना कोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो पाहूयात.

१. निराशा येणे

 

shafahome.org

 

परफेक्शनिस्ट माणसाला एखादं काम हाती घेतल्यानंतर, ते जर ठरलेल्या वेळेला पूर्ण नाही झालं तर निराशा येते.

उदाहरणच द्यायचं झालं, तर परफेक्शनिस्ट माणूस एखादं पुस्तक किंवा कथा लिहायची ठरवतो. अर्थातच ही खूप चांगली गोष्ट आहे. कदाचित दोन किंवा तीन वर्षांमध्ये त्याचं ते पुस्तक लिहून पूर्णही होईल.

पण जर तो ते पुस्तक मी वर्षाच्या आतच लिहिन असं म्हणायला लागला तर? झालं त्याच्याकडून वर्षाच्या आत ते पूर्ण तर चांगली गोष्ट आहे, पण नाहीच झालं तर काय होईल? तर त्याला निराशा येईल.

यात तो माणूस स्वतःलाच दोषी धरायला लागेल. स्वतःच स्वतःचा तिरस्कार करायला लागेल. त्यामुळे आणखीनच त्या माणसाच्या चुका वाढत जातील.

 

२. असमाधानी राहणी 

 

americanoptometric association.com

 

प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या नादात परफेक्शनिस्ट माणूस अधिक चिंता करायला लागतो. जे काही काम करायचा आहे, ते करताना त्याला केलेल्या कामाचं समाधान वाटत नाही.

३. धाडसी स्वभाव राहत नाही

माणसाला प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायची असते आणि जेव्हा त्याला जाणवतं, की कदाचित आपल्या हातून इतकी परफेक्ट गोष्ट होणार नाही. मग त्या अपयशाच्या भयापोटी माणूस ती गोष्ट करतच नाही.

नवीन काही करण्याचे त्याचे धाडस कमी होतं. त्याला अपयशाची सतत भीती वाटत राहते.

४. सर्जनशीलता कमी होते

 

smarthustle.com

 

प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करताना माणूस अधिक चिंता करायला लागतो आणि त्यामुळेच माणसाची क्रिएटिव्हिटी कमी होते.

नवीन कोणतीही गोष्ट त्याच्याकडून होत नाही. कारण नवीन कोणतीही गोष्ट करताना तुमच्याकडे नाविन्य, कल्पकता, सकारात्मकता असणे गरजेचे असते. त्याचाच अभाव मग परफेक्शनिस्ट माणसात निर्माण होतो.

 

५. प्रत्येकाला खुश करू शकत नाही

 

 

ही गोष्ट सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे, की आपण प्रत्येकालाच खुश नाही करू शकत. परंतु परफेक्शनिस्ट माणसाला सतत असं वाटत राहतं, की माझ्या कामामुळे प्रत्येक जण खुश झाला पाहिजे.

जेव्हा लोक परफेक्शनिस्ट लोकांच्या कामांना चांगलं म्हणतात त्यावेळेस तो खुश होतो. पण लोकांनी त्याच्यावर टीका केली की त्याला वाईट वाटतं.

त्याला टीका सहन होत नाही आणि याचा राग इतर कोणावर तरी निघतो. ज्याचा परिणाम त्या माणसाच्या कामावर होतो.

 

६. अचूक कामाचा आग्रह धरणं महागात पडतं

 

 

जी लोक परफेक्शनिस्ट असतात, ते स्वतःचं परीक्षण करत असतात. तसे ते इतरांचेही निरीक्षण करत असतात आणि त्यांच्या चुका काढत असतात.

काय केलं पाहिजे, काय नाही हे सांगत बसतात. यामुळेच ते इतर लोकांनाही दुखावतात आणि ते त्यांच्या ध्यानातही येत नाही.

असे लोक जर एखाद्या टीम मध्ये असतील तर तिकडे काम करणे अवघड होते.  संघ भावनेने काम करणे शक्य होत नाही.

 

७. कोणालाही अधिकार देणे शक्य होत नाही

 

bangloremirror.com

 

परफेक्शनिस्ट लोकांचा हा एक समज असतो, की माझ्यासारखं काम इतर कुणीच करू शकणार नाही. त्यामुळेच हे लोक इतर कोणालाही अधिकार देऊ शकत नाहीत किंवा एखाद्या कामाची जबाबदारी सोपवू शकत नाहीत.

त्यांचा कोणावरही विश्वास नसतो. त्यांना सतत वाटत राहतं, की हे काम मीच चांगलं करेन. ते इतरांकडून हे अशाच कामाची अपेक्षा करतात आणि ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तर यांना राग येतो.

मग ते काम स्वतःच पूर्ण करायचा त्यांचा अट्टाहास असतो. पण यामुळे कामाचा सगळा तणाव अशाच लोकांवरती येतो.

 

८. स्वतःला महत्त्व देण्याचा प्रयत्न होतो 

 

time.com

 

परफेक्शनिस्ट लोक ही प्रत्येक गोष्ट वैयक्तिक रित्या करतात आणि त्यामुळेच जो काही निकाल येईल तोही सकारात्मक येईल असेच वाटत राहते.

तसेच इतर लोक आपल्या कामाचं कौतुक करतील अशीही अपेक्षा या लोकांची असते, पण कुणी टीका केली तर ती मात्र त्यांना सहन होत नाही.

खरंतर इतरांनी केलेल्या टीकेमुळे आपल्यात काही सुधारणा होत असेल तर ती चांगली गोष्ट असते, परंतु परफेक्शनिस्ट ते मानत नाहीत. त्यामुळे त्यांना अपयश येण्याचा धोकाही जास्त असतो.

 

९. विश्रांती आणि सुट्टी कधीच मिळत नाही

 

 

परफेक्शनिस्ट लोक हे नेहमी म्हणत राहतात, की “हे काम झालं की मी आता सुट्टी घेईन”. पण कोणतंही काम कधीच परिपूर्ण राहत नाही. त्यात काहीतरी छोट्याशा चुका, त्रुटी राहतातच आणि मग त्या सुधारण्यासाठी परत हे परफेक्शनिस्ट काम करतात.

त्यामुळे हे लोक कधीही सुट्टीचा आनंद घेऊ शकत नाहीत. त्यांच्या मनात सतत कामाचे विचार राहतात. त्यामुळे त्यांना अजून जास्ती काम करण्याचा सोस निर्माण होतो आणि त्यातून चुका घडण्याची शक्यता वाढते.

अशा लोकांमध्ये तणाव, भीती, आरोग्याच्या समस्या वाढत राहतात.

परफेक्शनिझम हा गुणधर्म अनुवंशिक आहे. परिपूर्णता झालीच पाहिजे अशी मागणी आई-वडिलांकडून मुलांकडे होत असते. तेच गुणधर्म मुलांमध्येही येतात.

दुसऱ्या एखाद्या मुलांना जर जास्त मार्क्स मिळाले, तर त्याची तुलना आपल्या मुलाशी केली जाते आणि आपल्या मुलाने केलेली मेहनत दुर्लक्षिली जाते.

पण मुलगा जर खरोखरच परफेक्शनिस्ट असेल, तर त्याला या गोष्टी सहज सोप्या वाटतील. पण पुढच्या आयुष्यात एखाद्या छोट्याशा अपयशाने देखील तो खचून जाईल.

 

म्हणून मग परफेक्शनिस्ट होऊच नये का?

 

somoytvnews.tv

 

असं काही नाही. फक्त परफेक्शनिस्ट होताना प्रत्येक गोष्टीला स्वतःला जबाबदार धरू नये. आपल्याकडून होणाऱ्या चुकांना आपणच माफ केलं पाहिजे. पुन्हा अशा चुका होणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे.

आलेलं अपयश पचवण्याची क्षमता हवी, त्यापासून सुधारणा करता येईल असा विश्वास हवा.

स्वतःतील सुधारणा बघताना आपल्या आजूबाजूच्या सहवासातील लोकांच्याही काही चांगल्या गोष्टी असतील, तर त्या पाहून त्याचंही कौतुक करावं. चांगल्या गोष्टी आत्मसात करायची सवय लावली पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version