IT कंपनीत मन रमत नाही म्हणून चहा विकणारा, ‘इंजिनियर चायवाला’! वाचा, प्रेरणा घ्या.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
इंजिनियर हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. ‘इंजिनियर्स काहीही करू शकतात’ असं म्हणणाऱ्या इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी पावलोपावली ट्रोल होण्यापर्यंत सगळीकडे त्यांचं अस्तित्व असतं.
‘घरातील मिक्सर, फ्रिज इत्यादी गोष्टी दुरुस्त करत नाही, तोवर तुम्हाला घरातले इंजिनियर मानत नाहीत’ असाही विनोदी सूर पाहायला मिळतो. घरातला मिक्सर दुरुस्त करायला कधीही कामी न येणारे अनेक इंजिनियर्स त्यांच्या कंपनीसाठी खूप मोठी ठेव ठरत असतात.
बरं इंजिनीयर्स काहीही करू शकतात ही गोष्ट अगदीच काही चुकीची ठरत नाही. त्यांची आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे क्षेत्र ते सांभाळताना दिसतातच; मात्र अगदी बँकिंग, एमबीए या क्षेत्रांमध्ये नाव कमावणारे इंजिनीयर्स सुद्धा पाहायला मिळतात.
एवढंच कशाला, तर आपला लाडका कवी संदीप खरे, किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेदेखील इंजिनियरच आहेत. बॉलीवूडमधील कलाकार आर. माधवन किंवा सध्या मदतकार्यासाठी चर्चेत असलेला सोनू सूद हे सुद्धा इंजिनियरच आहेत.
थोडक्यात काय, तर अनेक क्षेत्रांमध्ये जाऊन आपली छाप पाडण्याची कला इंजिनियर्सकडे असते. चार वर्षांत केलेली मेहनत आणि खडतर आयुष्य यामुळे हे शक्य होतं, अशी फुशारकी मारणारे अनेक इंजिनियर्स भेटतात.
या चार वर्षांच्या काळात एकदातरी चहाची टपरी किंवा झेरॉक्सचं दुकान टाकण्याचा विचार केला होता, असं सांगणारे अनेकजण असतात.
खरोखरच एका इंजिनियरने चहाची टपरी टाकली आहे, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही..
पण, अशी एक हातगाडी नुकतीच चर्चेत आली आहे. नामवंत सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एका इंजिनियरने, ‘कामात समाधान मिळत नाही म्हणून’ चहाची टपरी टाकली. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी या ‘इंजिनियर चायवाला’चा फोटो त्यांच्या अकाउंटवरून ट्विट केला आहे.
त्याच्या हातगाडीवरील ‘इंजिनियर चायवाला’ ही पाटी जशी लक्ष वेधून घेते, तशीच आणखी एक पाटी नजरेत भरते.
‘मी खरंतर एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. विप्रो, बिझनेस इंटेलिजन्स, ट्रस्ट सॉफ्टवेअर अशा नामवंत कंपन्यांमध्ये मी काम केलं आहे. पैसे तर भरपूर मिळत असत पण समाधान मिळत नव्हतं. माझी नेहमीच स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. चहा मला खूपच आवडतो. झकास चहा नेहमीच प्यायला मिळाला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा असते. म्हणूनच, या चहापासूनच माझ्या व्यवसायाची सुरुवात मी करतो आहे.आज म्हणूनच मी झालोय इंजिनियर चहावाला…’
असं त्याने त्याच्या गाडीवर नमूद केलेलं दिसतंय.
शरण यांनी या फोटोला कॅप्शन सुद्धा उत्तम दिलंय. ‘हल्लीच्या काळात असा प्रामाणिकपणा कुठे पाहायला मिळतो. याने सगळं काही स्पष्ट केलंय. ‘इंजिनियर चायवाला’ होऊन त्याला कामाचं समाधान मिळत आहे.’
अवनीश शरण यांनी हा फोटो ट्विट केल्यावर, वेगवेगळ्या पद्धतीने यावर प्रतिक्रिया आलेल्या दिसत आहेत.
त्याचा या निर्णयाचं कौतुक करणारा कुणी इंजिनियर असो, किंवा काय सांगावं पुढे हा देशाचा पंतप्रधानही होईल, असं म्हणणारी एखादी व्यक्ती.. एकाने तर त्याने लावलेल्या पाटीचं रहस्य काय असावं याचाही अंदाज बांधलाय. हा इंजिनियर चायवाला लोकांना आवडलाय हे मात्र नक्की..
नेमकी कशा पद्धतीने ही मंडळी व्यक्त झाली आहेत त्यावर जरा नजर टाकुयात.
‘इंजिनियर्स स्वतःच स्वतःला असं काही सरप्राईज देतात की इतरांना आश्चर्याचा धक्काच बसतो. इंजिनियर म्हणजे काय चीज असते ते समजून घ्यायचं असेल, तर ती डिग्री आणि हॉस्टेल लाईफचा अनुभव घ्यायलाच हवा.’
असं म्हणणाऱ्या या ट्विटमधून त्याला मिळणारा सपोर्ट पाहायला मिळतोय असं म्हणता येईल.
भारताचे सध्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे त्यांच्या लहानपणी चहा विकण्याचं काम करत असत, हे आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. हाच मुद्दा हाताशी घेऊन, ‘याची पुढे पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा असावी’ असं ही मंडळी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणत आहेत.
‘इंजिनियर असूनही चहाची टपरी का टाकलीस?’ असं विचारून त्याला सगळेजण त्रास देत असावेत असं बहुदा याला वाटलं असावं. म्हणून ही पाटी लावण्याचं कारण काय असेल, याचं उत्तर ट्विटमधून ‘लगभग इंजिनियर’ने दिलं असावं बहुतेक…
एकूणच, समाधान मिळवण्यासाठी या पठ्ठ्याने उचलेलं पाऊल फारच झकास आहे.
आयुष्यात जगण्यासाठी पैसे महत्त्वाचे असतातच, पण आयुष्य आनंदी होण्यासाठी समाधान मिळणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.