Site icon InMarathi

स्पायडरमॅन बनण्याचे मायकल जॅकसनचे स्वप्न पूर्ण का झाले नाही, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या देशात वेस्टर्न पॉप संगीत आणि सुपरहिरोज ह्यांची प्रचंड क्रेझ आहे. आपल्या आणि तसेच इतर देशातला एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे जो पॉप संगीत आणि हे सुपरहिरो सिनेमे प्रचंड फॉलो करतो.

ह्या पॉप कल्चरचा ज्याला देव म्हणतात त्या मायकल जॅक्सन ची आठवण नुकतीच त्याच्या जन्मतिथीच्या दिवशी त्याच्या फॅन्सनी काढली. मायकल जॅक्सन च्या गाण्यांवर एक पिढी मोठी झाली आहे असं म्हंटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

ज्यांना इंग्रजी शब्द सुद्धा कळत नाहीत अशा लोकांवर सुद्धा मायकलच्या संगीताची मोहिनी होती. त्याचं गाणं, त्याचा आवाज, त्याचं त्या गाण्यावर थिरकण आणि सर्वात लोकप्रिय म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या डान्स स्टेप्स यामुळेच तो जागतिक कीर्तीचा पॉपस्टार बनला.

 

biography.com

 

वेगवेगळ्या समस्यांवर मात करत त्याने हे नाव कमावलं. बऱ्याच चुकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा त्याचं नाव आलं पण त्यातूनही बाहेर पडत त्याने त्याच्या गाण्यातून कित्येक लोकांना पराकोटीचा आनंद दिला आहे हे विसरून चालणार नाही!

पण आज मायकल विषयी आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यावर तुमचा विश्वास बसणं कठीण आहे, पण ती गोष्ट खरी आहे.

ती गोष्ट अशी की मायकल ने ९० च्या दशकात मार्व्हल स्टुडियो विकत घ्यायचं प्लॅनिंग केलेलं, ते का आणि कशासाठी त्यामागे मायकलचा काय उद्देश होता ते आपण जाणून घेऊया!

मार्व्हल कॉमिक्स आणि त्यांचे सुपरहिरोज कोणाला माहीत नसतील अशी व्यक्ती सापडणं जरा कठीणच. कारण आज सुपरहिरो विश्वात मार्व्हल ज्या शिखरावर आहे तिथे पोचायचा कुणी विचार सुद्धा नसेल केला.

आपल्या नेहमीच्या दुनियेपेक्षा स्वतःची वेगळी दुनिया निर्माण करून मार्व्हल नी लोकांवर जी जादू केली आहे ती वेगळीच आहे. नुकताच आलेल्या अव्हेंजर्स एंडगेम ने तर जगभरातले सगळे रेकॉर्ड मोडीत काढून स्वतःचा असा एक बेंचमार्क सेट केला.

आज मार्व्हल म्हंटलं की आपल्यासमोर थॉर, आयर्न मॅन, हल्क, कॅप्टन अमेरिका, डॉक्टर स्ट्रेंज असे वेगवेगळे लार्जर दॅन लाईफ सुपरहिरोज उभे राहतात.

 

mirror.co.uk

 

पण आज मार्व्हल ज्या शिखरावर विराजमान आहे तिथे पोचण्यासाठी त्यांना बरंच नुकसान आणि समस्यांचा सामना करावा लागला आहे हे जगजाहीर आहे.

मधल्या काळात तर मार्व्हल स्टुडियो विकायची सुद्धा वेळ आली होती, पण सुदैवाने तसं झालं नाही आणि अव्हेंजर्स सिरीजने त्यांना यशाच्या एका उच्च शिखरावर नेऊन बसवलं!

ह्याच एमसीयु मधला आणि खासकरुन लहान मुलांचा फेव्हरेट सुपरहिरो म्हणजे स्पायडरमॅन. समजा ह्या स्पायडरमॅन च्या भूमिकेत तुम्हाला मायकल जॅक्सन दिसला असता तर तुमची रिऍक्शन काय असती?

बऱ्याच मिश्र प्रतिक्रिया आल्या असत्या पण आज आम्ही तुम्हाला त्याच घटनेविषयी सांगणार आहोत!

२००९ मध्ये जेंव्हा डीझने आणि मार्व्हल एकत्र झाले तेंव्हाच असं म्हंटल जात होतं की मायकल जॅक्सन ने काही वर्षांपूर्वी मार्व्हल विकत घ्यायचा प्लॅन केला होता!

मायकल हा स्पायडरमॅनचा खुप मोठा फॅन होता, जेंव्हा स्टॅन ली कडे यासाठी मागणी केली तेंव्हा त्यांनी मायकल ला सांगितले की त्याचे राईट्स हे मार्व्हल स्टुडियो कडे आहेत. हे ऐकून त्याने मार्व्हल स्टुडिओ विकत घेण्याचा प्रस्ताव सुद्धा ठेवला होता.

खरंतर तो ९० चा काळ होता आणि मार्व्हल स्टुडियो हा बऱ्याच आर्थिक संकटांना तोंड देत होता. शिवाय ड्रग्स आणि लहान मुलांशी चुकीचा व्यवहार असे गंभीर आरोप लागून सुद्धा मायकल हा यशाच्या शिखरावर विराजमान होता!

जेंव्हा हा प्रस्ताव स्टॅन ली कडे आला तेंव्हा सुरवातीला त्यांनी सुद्धा काहीच सांगितले नाही, कारण तोवर एमसीयू निर्माण झाली नव्हती आणि मार्व्हल चे कुठलेच प्रोजेक्ट हिट होत नव्हते.

मार्व्हल विकत घेण्यामागे मायकल जॅक्सन चा मुख्य हेतू स्पायडरमॅन हा होता. त्याला त्या सिनेमात मुख्य भूमिका करायची इच्छा होती. ऐकायला जरी खूप एक्सयटिंग वाटत असलं तरी प्रत्यक्षात ते तितकं जमून आलं नसत!

 

youtube.com

 

म्हणजे मायकल च्या युनिक डान्स स्टेप्स आणि देहबोलीमुळे एक वेगळाच टच स्पायडरमॅन ला मिळाला असता पण तरीही हे गणित काही केल्या जुळत नव्हतं.

मायकल जॅक्सन ह्याने जरी मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी तो काही हाडाचा ऍक्टर नव्हता. त्यामुळे कदाचित त्याने साकारलेल्या स्पायडरमॅनला काही मर्यादा आल्या असत्या.

स्टॅन ली यांचं सुद्धा हेच मत होतं. पण स्वतः काही निर्णय न देता त्यांनी ही जवाबदारी मार्व्हलच्या सदस्यांवर सोपवली. आणि मायकलचं ते स्वप्न स्वप्नच राहिलं!

मायकल जॅक्सन च्या क्षमतेवर कोणालाच शंका नव्हत्या पण आज २०२० मध्ये तुम्ही असं नक्कीच म्हणू शकता की जर तेंव्हा मायकल ने मार्व्हल विकत घेतल असतं तर एक वेगळाच स्पायडरमॅन आपल्याला बघायला मिळाला असता.

कदाचित आज ज्या मार्व्हल युनिव्हर्स चे करोडो चाहते आहेत त्यांना हे सुपरहिरोज कधी भेटलेच नसते. काही लोकांना मायकल चा स्पायडरमॅन आवडला असता तर काहींनी त्यावर टीका सुद्धा केली असती, पण सुदैवाने तसं झालं नाही.

 

ladbible.com

 

आणि तसं झालं असतं तर फक्त मार्व्हल स्टुडियोचा नव्हे तर संपूर्ण सिनेसृष्टीचा चेहरा मोहरा देखील बदलला असता हे देखील तितकंच खरं आहे!

असो आज मायकल आपल्या सगळ्यांच्या मनात त्याच्या गाण्याचा डान्सच्या रुपात अमर आहे आणि तो तसाच रहावा, कारण तो संगीत आणि नृत्यातला सुपरहिरोच होता, आहे आणि सदैव राहील!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version