५ वर्षाची चिमुकली झाली आई! कसं शक्यय? वाचा ही चमत्कारिक गोष्ट!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
‘ऐकावं ते नवलच’ असं आपण काही घटना ऐकून म्हणत असतो. तशाच एका घटनेबद्दल हा लेख आहे. १९३९ मध्ये घडलेली ही घटना आहे.
ही गोष्ट आहे दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशात टिकरापो या गावात राहणाऱ्या लीना मेडीना या पाच वर्षाच्या मुलीची. पेरू देशाच्या एका छोट्या खेड्यात लीना मेडीना यांचा परिवार राहत असे.
१९३९ च्या मार्च महिन्यात लीना मेडीना हिची तब्येत अचानक बिघडली. काही दिवसांपासून तिचं पोट दुखत होतं आणि सूज आल्यासारखी वाटत होती.

तिला नेहमीपेक्षा घाम सुद्धा जास्त येत होता. लीना मेडीनाच्या आई वडिलांनी तिला लिमा या गावातील दवाखान्यात नेलं.
डॉक्टरांनी लीनाला चेक केलं आणि त्यांनी तिच्या आई वडिलांना सांगितलं की, “तुमची मुलगी लीना ही गरोदर आहे. सातवा महिना सुरू आहे.”
साहजिकच आई वडील दोघांनाही हे ऐकणं फार शॉकिंग होतं, पण त्यांनी धीर सोडला नाही. डॉक्टरांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं, “दहा हजार मुलींपैकी एखाद्या मुलींना हा Precocious Puberty हा आजार असतो.
या आजारात मुलींची शारीरिक वाढ आणि लैंगिक क्षमता ही त्यांच्या वयापेक्षा जास्त वाढत असते. या आजारात मुलींची मासिक पाळी ही त्यांच्या वयाच्या आधीच येत असते.
लीना मेडीना या मुलीला वयाच्या तिसऱ्या वर्षीपासूनच नियमित मासिक पाळी सुरू झाली होती. शिवाय, तिच्या स्तनांचा आकार सुद्धा तिसऱ्या वर्षीपासूनच वाढायला सुरू झाली होती.
तिच्या हाडांची वाढ सुध्दा एखाद्या १८ वर्षाच्या मुली इतकी झाली होती. तिच्या पाचव्या वाढदिवसाच्या वेळी लीना मेडीना ही गरोदर असल्याची बातमी तिच्या आई वडिलांना ऐकवण्यात आली होती.
“अगदी कमी वयात जर का लैंगिक संबंध आले, तर असं होऊ शकतं” ही शक्यता सुद्धा डॉक्टरांनी तिच्या आई वडिलांना ऐकवली होती.
तरीही, लीना मेडीनाच्या आई वडिलांनी त्यांचा संयम ढळू दिला नव्हता आणि त्यांनी लीनाची पूर्ण काळजी घेतली आणि सहा आठवड्यांनी म्हणजे मे १९३९ मध्ये लीना मेडीना एका निरोगी आणि गुटगुटीत मुलाला जन्म दिला.

लीना मेडीना हिच्या मुलाचे वडील कोण आहेत हे काही शेवटपर्यंत कळू शकलं नाही. कारण, कोणत्याही प्रश्नांना लीना ही व्यवस्थित उत्तर देऊ शकत नव्हती. ती घाबरलेली होती.
Tiburelo मेडीना म्हणजे लीना मेडीनाच्या वडिलांना मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यासाठी अटक करण्यात आली.
वडील सतत या गोष्टीचा विरोध करत होते आणि तेच खरं होतं. त्यांच्यावरील सर्व आरोप हे खोटे आहेत हे DNA टेस्ट द्वारे सिद्ध झालं होतं.
लीना मेडीना हिच्या न बोलता येण्यामुळे पोलिसांचे, डॉक्टरांचे आणि सामान्य माणसांचे प्रश्न वाढत चालले होते. त्यात भर म्हणजे मीडियाची. जगभरातील मीडियाने ही बातमी कव्हर करण्यासाठी मेडिना कुटुंबियांना हैराण केलं होतं.
वृत्तपत्र समूहाने मेडिना यांना त्यांच्या मुलीसोबत एक इंटरव्यूह घेण्यासाठी तिच्या वडिलांना हजारो डॉलर्स त्यांना ऑफर केले होते. पण, लीनाच्या वडिलांनी त्या सर्व ऑफर ‘मुलीला त्रास होईल’ या विचाराने नाकारल्या होत्या.
अमेरिकेतील काही वृत्तपत्र समूहाने तर मेडीना फॅमिलीला त्यांच्या शो मध्ये सहभागी होण्यासाठी आणि या घटनेची माहिती देण्यासाठी मोठी रक्कम सुद्धा देऊ केली होती, पण लीनाच्या वडिलांनी या सर्व ऑफर नाकारल्या.

आज ८० वर्षानंतर सुद्धा कोणालाही या घटनेबद्दल यापेक्षा जास्त माहिती नाहीये. लीना किंवा परिवारातील कोणीही कधीही याबद्दल कधीच कुठेच वाच्यता केली नाही आणि त्यांच्या एकीचं दर्शन करवून दिलं.
ज्या डॉक्टरांनी लीनाची डिलिव्हरी केली त्यांनी सुद्धा लीनाची तब्येत व्यवस्थित होती असंच सांगितलं. फक्त तिला प्रसूती वेदना होऊ नयेत म्हणून सीझर पद्धतीने डिलिव्हरी करण्यात आली होती.
त्यानंतर लीनाने नेहमीच मीडियाला टाळलं आणि एक अलिप्त जगणं त्यांनी पसंत केलं.
लीना मेडीनाच्या मुलाचं नाव Gerado ठेवण्यात आलं होतं. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या बालरोग तज्ञांनी लीना आणि तिच्या बाळाची तब्येत चेक केली आणि दोघेही व्यवस्थित आहेत हे मीडियाला सांगितलं.
लीनाचा मुलगा हा तिच्या भावाप्रमाणे कुटुंबाने मान्य केला होता. गेराडो हा सुद्धा लीनाला आपली मोठी बहीणच समजायचा. दोघांनाही फार नंतर सत्य सांगण्यात आलं होतं.
लीना मेडीना ही ज्या डॉक्टरांनी तिची डिलिव्हरी केली, त्यांच्याकडेच असिस्टंट म्हणून काम करत होती आणि तिने स्वतः गेराडो च्या शिक्षणाचा खर्च उचलला होता.

१९७० मध्ये लीनाचं लग्न Raul Jurado सोबत झालं आणि त्या दोघांना १९७२ मध्ये एक मुलगा झाला. २००२ च्या वृत्तानुसार लिमा या गावात ते दोघेही सुखाने नांदत होते.
गेराडोचा मात्र एका हाडाच्या आजारामुळे त्याच्या वयाच्या ४० व्या वर्षी मृत्यू झाला.
आयुष्यभर लोकांच्या आणि मीडियाच्या विचित्र प्रश्नांना तोंड देऊनही लीना मेडीना हिने स्वतःला खंबीर ठेवत सगळ्या आव्हानांना तोंड दिलं. आज ती वयाच्या ८० मध्ये एक खाजगी आणि शांत आयुष्य जगत आहे.

या पूर्ण स्टोरी मध्ये एक नायक शोधणं कठीण आहे. लीना च्या वडिलांची सर्वात जास्त कमाल आहे असं म्हणता येईल, ज्यांनी स्वतःच्या मुलीला कधीही दुखावलं नाही आणि नेहमी तिच्या पाठीशी उभे राहिले.
लीना स्वतः इतक्या कमी वयात शरीरावर होणाऱ्या इतक्या आघातांना सहन करत राहिली म्हणून ती पण एक हिरो म्हणावी लागेल.
ज्या समाजात हे पूर्ण कुटुंब राहत होतं, त्यांना सुद्धा श्रेय दिलं पाहिजे, की त्यांनी या लोकांना बहिष्कृत वगैरे काहीच केलं नाही. नाहीतर, कुमारी मातेला घरातील विरोधापासून किती तरी गोष्टी सहन कराव्या लागतात हे आपण प्रीती झिंटा च्या ‘क्या कहेना’ या सिनेमा मध्ये बघितलंच आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.