' “प्यासा” बायोपिक गुरुदत्त ह्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडू शकेल, वाचा! – InMarathi

“प्यासा” बायोपिक गुरुदत्त ह्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडू शकेल, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हिंदी चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजेच उभरत्या काळात जे नवे चेहरे प्रेक्षकांसमोर येत होते त्यापैकी काही मोजकेच लिजंडरी ठरले. मग ते कलावंत असो, संगीतकार – गीतकार वा दिग्दर्शक असो.

काहींची कारकिर्द प्रचंड गाजली अगदी ४ ते ५ दशके. तर काहींची कारकिर्द अगदीच एका दशकापुरती मर्यादीत राहिली मात्र तरीही त्यांनी रसिकमनावर केलेले गारुड आज एकविसाव्या शतकातही कायम आहे.

असाच एक तारा उदयाला आला १९५० – ६०  च्या दशकात आणि लवकरच त्याचा ध्रुवतारा झाला.

प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आणि आजही ज्यांच्या चित्रपटांची जादू कायम आहे, असे प्रतिथयश दिग्दर्शक आणि कलावंत म्हणजेच गुरुदत्त साहेब.

 

gurudutt inmarathi
hindustantimes.com

 

१९५७ साली त्यांचा प्यासा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जो इतिहास घडला तो सर्वश्रुत आहेच. २०२० साली त्यांची आठवण होण्याचे कारण म्हणजे दिग्दर्शिका भावना तलवार यांनी जुलै महिन्यात त्यांच्या ट्विटर हँडलवरुन सर्व फॅन फॉलोवर्स साठी एक आनंदाची बातमी दिली.

ती म्हणजे लिजंडरी अँक्टर गुरुदत्त यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाची लवकरच निर्मीती केली जात असून, भावना याचे दिग्दर्शन करणार आहेत.

‘प्यासा’ हेच नाव या बायोपिकला दिलेले असून, गेल्या सात वर्षांचे अथक परिश्रम आणि यासाठी केलेले खोलवरचे संशोधन याला आता कथारुपात बांधण्यात आले असून, लवकरच मूर्त रुप देण्याची वेळ आली असल्याचे तलवार यांनी ट्विट करताना म्हटलंय.

या बातमी नंतर गुरुदत्त आणि सर्वच हिंदी चित्रपटसृष्टीच्या फॅन फॉलोअर्स मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यानिमित्ताने पुन्हा एकदा गुरुदत्त यांच्या मिस्ट्रीयस लाईफ आणि त्यांनी अकस्मात केलेल्या आत्महत्येच्या बातमीने बसलेला शॉक यांविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय.

विसाव्या शतकाच्या नव्या पीढिलाही गुरुदत्त यांच्याबद्दल आकर्षण आहे.

 

biopic inmarathi
timesofindia.indiatimes.com

 

या बायोपिकमध्ये त्यांच्या जीवनचरित्रासोबत नेमका फोकस काय असेल याविषयी उत्सुकता आहे. कारण अगदी सोपं आहे मंडळी. कलाकार जितका मोठा तितकच त्याचं आयुष्यही अनेक गुढ घटनांनी भरलेले असते.

अशा अनेक मोठ्या कलाकारांची उदाहरणे आपल्या चित्रपटसृष्टीत आहेतच. परवीन बाबी, रेखा, श्रीदेवी, दिव्या भारती, अगदी सध्याचे ताजे उदाहरण म्हणजे सुशांत सिंग राजपूतचे मृत्यू प्रकरण.

या सगळ्यांच्या विषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये आजही उत्सुकता दिसते. कलाकाराच्या जीवनात डोकावून पहायची उत्सुकता सगळ्यांनाच असते, तो ह्युमन टेंडंसिचा एक भाग आहे. त्याचसाठी बायोपिक निर्माण केल्या जातात.

गुरुदत्त यांच्यावरील बायोपिक लवकरच पडद्यावर येतेय ही आनंदाची बाब आहे, मात्र त्यातून त्यांच्या आयुष्यातील काही रहस्यांचा उलगडा होणार का हे मात्र पहावं लागेल. काय आहेत ही रहस्ये?

१ – गुरुदत्त यांचा अकल्पित मृत्यू :

१० ऑक्टोबर १९६४ या दिवशी सकाळी मुंबईतील पेडर रोडवरील आपल्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला होता.

प्राथमिक अहवालानुसार आदल्या रात्री त्यांनी दारुचे अतिसेवन केल्याचे तसेच खुप साऱ्या झोपेच्या गोळ्या एका वेळी सेवन केल्या असल्याचे म्हटले जाते. मात्र यात किती तथ्य आहे याबद्दल अनेकांना तेव्हा शंका वाटत होती.

 

grudutt death inmarathi
thebridalbox.com

 

तसेच काही सांगोवांगी कथांनुसार त्यांनी त्याआधी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र दोन्ही वेळा तो सफल झाला नाही.

२ – अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्यासोबत प्रेमात आकंठ बुडालेले गुरुदत्त अशा रचित कहाण्या :

गुरुदत्त हे लेखक – दिग्दर्शक आणि कलावंत या तिन्ही भूमिका लिलया पार पाडत असत. दिग्दर्शक म्हणून अनेक नवे कलावंत चित्रपटसृष्टीत आणून त्यांना नाव मिळवून दिल्याचा मान नेहमीच त्यांना दिला जातो.

त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे वहिदा रेहमान. गाईड चित्रपटातून रात्रीत स्टार झालेल्या या नटीच्या प्रेमात गुरुदत्त साहेब आकंठ बुडालेले होते अशा अनेक वावड्या त्यावेळी उठल्या होत्या.

पुढे पुढे तर लोक त्यांच्या प्रेमाविषयी उघडपणे बोलू लागले होते. मात्र या कहाण्यांना त्या दोघांनी स्विकारले अथवा नाही याविषयी काही ठोस माहिती आजही उपलब्ध नाही.

मात्र गुरुदत्त यांच्या आत्महत्येमागे ही प्रेमकथा आहे असाही एक समज आहे.

३ – कारकिर्दीच्या ऐन शिखरावर असताना झालेला प्रचंड आर्थिक तोटा आणि मानसिक हानी :

एकिकडे वहिदा यांच्यासोबतच्या प्रेमकहाण्यांना रंग चढत असतानाच एक बातमी आली. २६ मे १९५३ रोजी गुरुदत्त यांनी गिता रॉय यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. गीता ह्या त्याकाळातील अतिशय प्रतिथयश गायिका होत्या.

 

guru dutt marriage inmarathi
bollywoodshaadis.com

 

पुढे त्याच गीता दत्त नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. बाजी या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान गुरुदत्त यांची गीता रॉय यांच्याशी ओळख झाली होती.

लग्नानंतरही त्यांची कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून घोडदौड सुरुच होती. १९५७ साली त्यांची प्यासा फिल्म आली आणि तुफान हिट ठरली. जी आजही ब्लॉकबस्टर ऑफ इंडियन क्लासिक सिनेमा म्हणून ओळखली जाते.

तशातच त्यांच्या कुटूंबाला आर्थिक अडचणींचा मोठा सामना करावा लागला. पैशांची इतकी चणचण भासू लागली की गुरुदत्त यांनी त्यांचा राहता बंगला विकून एका छोट्या फ्लॅटमध्ये राहू लागले.

दरम्यान बायको गीता दत्त आपल्या तीन मुलांसह माहेरी जाऊन राहात होत्या.

४ – दारुच्या नशेने केला घात :

आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही त्यांच्या चित्रपटांचे काम सुरुच होते. प्रेम, कुटूंब आणि आर्थिक अडचणी या दुष्चक्रात सापडल्याने नकळतच ते केव्हा दारुच्या आहारी गेले त्यांना कळले नसावे.

मात्र सतत दारू पिण्याचा शेवटी कुटूंबावर आणि स्वत:च्या जीवनावर वाईट परिणाम होतोच. पुढे तर याचे वाईट परिणाम थोडे बहुत त्यांच्या कामावरही दिसू लागले होते. १९६४ सालचा सुहागन हा त्यांचा शेवटचा चित्रपट.

१० ऑक्टोबर १९६४ ला त्यांचा अकस्मात झालेला मृत्यू अनेकांना व्यथित करुन गेला. एक अष्टपैलू कलाकार खुपच लवकर आपल्यातून निघून गेला हे दुख त्यांचे चाहते आजही व्यक्त करतात.

 

dutt drinking inmarathhi
elusivelucidity.blogspot.com

 

गुरुदत्त यांच्याविषयी थोडेसे..

गुरुदत्त यांचे मूळ नाव वसन्तकुमार शिवशंकर पादुकोण. त्यांचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी बेंगलोर येथे झाला होता. वयाच्या बाविसाव्या वर्षी हम एक है.. या चित्रपटातून कारकिर्द सुरू करत, १९५० – ६०  चे दशक त्यांनी अक्षरश: गाजवलं.

बाजी, जाल, मिस्टर अँड मिसेस ५५, प्यासा, कागज के फुल, काला बाजार, चौदहवी का चाँद, साहेब बीबी और गुलाम, भरोसा आणि सुहागन हे त्यांचे गाजलेले चित्रपट.

अवघी १७ – १८  वर्षांची बहारदार कारकिर्द लाभलेला हा हरहुन्नरी कलाकार. मात्र कर्तृत्त्वाच्या ऐन शिखरावर असतानाच त्यांना अकस्मात मृत्यूने गाठणं आजही अनेकांच्या मनाला पटत नाही.

म्हणूनच प्यासा या बायोपिकमधून त्यांच्या गूढ मृत्यूमागचं रहस्य लोकसमोर येतील अशी अपेक्षा कित्येक सिनेरासिकांकडून होत आहे.

त्यांच्या ह्या अपेक्षा दिग्दर्शिका भावना तलवार यांच्याकडून पूर्ण होतात का हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?