' १८०० रु. वाल्या काकूंच्या व्हायरल विडिओ मागे असू शकते “हे सत्य”! समजून घ्या… – InMarathi

१८०० रु. वाल्या काकूंच्या व्हायरल विडिओ मागे असू शकते “हे सत्य”! समजून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

राज कपूरच्या श्री ४२० ह्या सिनेमात एक सीन आहे. ज्यात ललित पवार ह्या रस्त्यावर फळांची टोपली घेऊन फळं विकत असतात तिथे राज कपूर येतो आणि त्या सिनेमात तो जरा भोळा दाखवल्याने तो त्यांना केळी कशी दिली असा प्रश्न विचारतो.

त्यावर ललित पवार म्हणतात २ आण्याला ३ केळी. पण राज कपूरला काहीच समजत नसल्याने तो ललिता पवार ह्यांना ३ आण्याला २ केळी द्यायला सांगतो. आणि काही वेळ ते दोघे ह्याच मुद्द्यावरून घासाघिस करतात.

काही वेळाने ललिता पवार ह्यांना तो गोंधळ लक्षात येतो आणि ह्यात त्यांचा फायदा आहे देखील त्यांना समजतं, परंतु राज कपूर ह्यांना काहीच समजत नाही.

 

raj kapoor inmarathi

 

तुम्हाला वाटलं असेल ह्या घटनेचा ह्या लेखाशी काय संबंध. पण आकडेमोड करतानाचा असाच एक गोंधळ कालपासून सोशल मीडिया वर खूप व्हायरल होत आहे. जाणून घेऊया नेमकं काय आहे ते!

सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आपण ह्या लॉकडाऊनच्या काळात बरंच अनुभवलं असेल. शिवाय व्हायरल होणाऱ्या पोस्ट किंवा व्हीडियो मुळे तयार होणारी वेगवेगळी मिम्स सुद्धा आपण भरपूर शेयर केली असतील.

आपण प्रत्येकानेच असे कित्येक फोटोज आपल्या सर्कल मध्ये शेयर केले असतील, त्यावर पोट दुखेपर्यंत हसला असाल. पण काल जो एक व्हीडियो व्हायरल झाला आणि लोकांनी त्यावर इतक्या प्रतिक्रिया दिल्या की त्या विषयाबद्दल सुद्धा चर्चा करणारे दोन गट पडले.

तो व्हीडियो म्हणजे १८०० रुपये वाल्या काकूंचा. एका घरात घरकाम करणाऱ्या काकू त्या घरात राहणाऱ्या तरुण मुलांसोबत १८०० रुपायांवरून वाद घालतानाचा व्हीडियो त्याच घरातल्या तरुण मुलांनी सोशल मीडिया वर टाकला आणि काही क्षणात तो व्हायरल झाला.

 

 

त्या काकूंना त्या मुलांनी ५०० च्या ३ नोटा, १०० ची एक नोट आणि २०० ची एक नोट दिली. पण काकूंना ते काही पटेना. त्यांनी तुम्ही मला १८०० रुपये दिलेच नाही हाच आरोप कायम होता!

खरं बघायला गेलं तर अगदी क्षुल्लक गोष्ट आहे ही. पण सोशल मीडिया वर ती इतकी व्हायरल झाली की लोकांनी त्यावर मिम्स तयार करून त्या काकूंना कॉमन सेन्स हवा इथपर्यंत प्रतिक्रिया दिल्या गेल्या.

काही लोकांची तर त्यांचा आयक्यू आणि शिक्षण काढेपर्यंत मजल गेली. आणि मग अर्थात सोशल मीडिया वर दोन गट पडले. एक गट पडला तो त्या काकूंना ट्रोल करणाऱ्यांचा आणि दूसरा गट होता तो ह्या ट्रोलिंगच्या विरोधात तर्कशुद्ध मांडणी करणाऱ्यांचा!

 

kaku meme inmarathi

 

ह्याच विषयावर फेसबुक वर डॉ. प्रज्ञावंत देवळेकर ह्यांनी एक सुरेख पोस्ट लिहिली आहे.

ज्यात त्यांनी त्या काकूंना ट्रोल करणे कसे चुकीचे आहे आणि अशी गोष्ट कोणाच्याही बाबतीत होऊ शकते यामागचे शास्त्रीय कारण सांगितले आहे.

तर जाणून घेऊया त्या पोस्ट मध्ये असं नेमकं काय लिहिलं आहे!

===

सकाळपासून फिरणारा या काकींचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेलच.

रसभंग नको म्हणून थोडं उशीरा लिहितोय तेव्हा बऱ्यापैकी मनोरंजन झालं असेल तर थोडीशी तांत्रिक बाब सांगतो ती म्हणजे या काकी वेड्या नाहीत त्यांना जस्ट एका प्रकारचा छोटासा मेंदूविकार आहे (मनोविकार नव्हे).

ज्यात आकडेमोडीत जरा गोंधळ होतो जसं पाऊण – सव्वा – दिड अश्या संज्ञा चटकन कळत नाही. घड्याळातला सव्वा – सव्वाशे रुपये – सव्वाशे लीटर – सव्वाशे किलो,आठशे – आठ हजार पाचशे,अठराशे यात गोंधळ उडतो.

थोडक्यात सांगायचं तर हा मेंदूतला एका प्रकारचा केमिकल लोचा आहे याला वैद्यकिय भाषेत ‘डिसकॅल्क्यूलिया’ असं म्हणतात.

 

dyscalculia inmarathi
blog.brainbalancecenters.com

 

बालपणी औपचारिक शिक्षण अक्षर ओळख – अंकगणित हे व्यवस्थित झालं नाही तर हे अत्यंत काॅमन आहे.

योग्य वयात लक्षात आलं तर सरावानं ही समस्या कमीही होऊ शकते आणि तसंही ‘आकडेमोड’ म्हणजे आयुष्य नव्हे त्यामुळं या समस्येसह नाॅर्मल आयुष्य जगताही येतं.

काॅग्निटिव्ह थेरपी – समुपदेशन – सराव असे सरळसाध्या उपायांनी यावर मातही करता येते..

बाकी सांगायचा मुद्दा एवढाच की प्रत्येकात थोड्याफार फरकानं काही तरी मेंदूतले वायरींगचे प्राॅब्लेम असतात. मी चेहरे ओळखू शकतो – व्यवहार चोख करू शकतो पण मला रस्ते-पत्ते लवकर लक्षात रहात नाही हा माझा लोचा आहे.

तुमच्यातही काहीतरी लोचा असेल किंवा अजून लक्षात आला नसेल तेव्हा एखाद्याला त्याच्या परिस्थितीवर हसा पण उद्या आपल्याला कुणी हसलं तर नाराज मात्र होऊ नका.

===

अशा अत्यंत मार्मिक आणि तर्कशुद्ध मांडणीतून आपल्याला समजले असेलच की ही कीती गंभीर गोष्ट आहे. आणि ह्या गोष्टीची अशी खिल्ली उडवणं चुकीचं आहे!

वर ज्या सायंटिफिक टर्म्सचा वापर केला आहे. त्याबद्दल प्रत्येकालाच ठाऊक असेल असं नाही. पण आमिर खानच्या तारे जमीन पर ह्या सिनेमातून असे आजार असतात अशी आपल्याला माहिती आहे.

 

taare zameen par inmarathi
laughingcolors.com

 

आणि ही गोष्ट थोड्या फार फरकाने प्रत्येकात असतेच. त्यामुळे अशा समस्येची खिल्ली उडवण्यापेक्षा ती गोष्ट समजून त्यावर योग्य उपाय काढणं जास्त गरजेचं असतं.

वरील पोस्ट मध्ये डॉक्टरांनी  डिसकॅल्क्यूलिया या मेडिकल टर्म विषयी सांगितले. तर हा प्रकार म्हणजे डीसलेक्सियाचा भाउच. रोजच्या जीवनातली आकडेमोड, हिशोब किंवा संख्यांशी निगडीत कोणतीही गोष्ट करताना जी समस्या उद्भवते त्याला  डिसकॅल्क्यूलिया म्हणतात.

काॅग्निटिव्ह थेरपी किंवा समुपदेशन म्हणजेच एखाद्याशी संवाद साधून त्याच्या मानसिक समस्यांवर तोडगा शोधणे, तसेच त्या व्यक्तीला त्या समस्येवर मात करण्यासाठी मदत करणे, योग्य मार्गदर्शन करणे.

यासाठी तुम्ही कोणत्याही मानसोपचार तज्ञाची मदत घेऊन त्या समस्येवर कायमचे सोल्यूशन काढू शकता!

 

cognitive therapy inmarathi
neurohealthpartners.com

 

हे सगळं मांडायचा अट्टहास याचसाठी की दुसऱ्याकडे बोट दाखवून हसणे सोप्पे असते पण स्वतः मध्ये सुद्धा असलेल्या त्रुटी मान्य करून त्या सुधारणं देखील तितकंच गरजेचं असतं.

कालपासून बऱ्याच लोकांनी त्या काकूंच्या व्हीडीओ चे बरेच मजेशीर मिम्स शेयर केले पण त्यामागचं हे शास्त्रीय कारण जाणून घ्यायची कुणालाच कशी इच्छा झाली नाही? इतके आपण सोशल मीडियाच्या आहारी गेलो आहोत का?

असा प्रश्न आपण स्वतःहून स्वतःला विचारायला हवा तरच आपल्यातली संवेदनशीलता टिकून राहील!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?