आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
गेले काही दिवस सोशल मीडिया वर एक विषय फार चर्चिला जातोय तो म्हणजे नीट आणि जेईई च्या परीक्षांवरून चाललेला वाद! कोविडच्या भीषण परिस्थितीमुळे हे वाद बरेच टोकाला गेल्याचं चित्र आपण सध्या सोशल मीडियावर पाहू शकतो.
सबंध देशभरात सगळेच विद्यार्थी पेटून उठले असून, ते थेट सरकारला टार्गेट करत आहेत. नरेंद्र मोदिंपासून कित्येक मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांकडे हे विद्यार्थी आपले गाऱ्हाणे घेऊन जात आहेत. पण त्यांच्या तक्रारीवर तोडगा कुणीच काढताना दिसत नाहीये.
धुळे येथे अभाविपी (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) च्या एका कार्यकर्त्याला महाराष्ट्र पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला. सरकारने विद्यार्थ्यांची फी माफ करावी असे त्याचे म्हणणे होते!
हे ही वाचा –
===
ह्या घटनेनंतर वेगवेगळ्या समाज माध्यमातून यावर टीका झाली, आणि विद्यार्थ्यांच हे आंदोलन आणखीनच चिघळल्याचं चित्र आता दिसत आहे!
राज्य सरकार तसेच केंद्र सरकार सुद्धा ह्या समस्येवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचं दिसत आहे.
विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्यांच्या रक्ताचं पाणी करून अशा मोठ्या परीक्षांची तयारी करतात.
पालक तर जमवलेली सगळी जमापुंजी त्यांच्या पाल्याच्या भविष्यावर खर्च करतात आणि अशा वेळेस सरकारी यंत्रणा त्यांची समस्या जाणून न घेता त्यांचाच आवाज दाबत असतील तर कसं चालायच?
महाराष्ट्र, झारखंड, गुजरात आणि अशा एकूण ६ राज्यांनी नीट आणि जेईई परीक्षा पोस्टपोन करण्याबाबत केलेली याचिका केंद्र सरकारने फेटाळून लावल्याने सगळेच विद्यार्थी आणि त्यांचे पालक वेगळ्याच चिंतेत आहेत!
याच पार्श्वभूमीवर ट्विटर वर एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. ह्या व्हिडिओ मध्ये तो विद्यार्थी रडकुंडीला आला असून सरकारने परीक्षा पोस्टपोन कराव्यात अशी मागणी करताना दिसत आहे!
शिवाय कोरोना काळात एकंदरच पसरलेली भीती, आर्थिक समस्या आणि त्यातून निर्माण होणारे वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे तो या व्हिडिओ मधून लोकांना सांगत आहे. तो नेमकं काय म्हणत आहे ते बघूया ह्या व्हिडिओ मध्ये!
Loans, no ration, exam center hours away, can’t afford private car charges, father sole earner, COVID risk – Student demands postponement of JEE, NEET exams. pic.twitter.com/N1Xli1fieb
— Nidhi Taneja (India TV) (@nidhiindiatv) August 27, 2020
हा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसं यावर रीअॅक्ट होणार पहिला सेलिब्रिटी दूसरा तिसरा कुणी नसून सोनू सुद हा होता!
त्याने हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंट वरून शेयर करत आसाम बिहार गुजरात इथल्या विद्यार्थ्यांना सांगितले की “तुमच्या घरापासून परीक्षा सेंटर पर्यंत जाण्यात काही अडचण असेल तर मला संपर्क करा, तुमच्यासाठी काही सोय करता येईल का ते मी सांगू शकेन!”
बास ह्या ट्विट वरून सोनू पुन्हा चर्चेत आला. मध्ये लॉकडाऊन काळात बऱ्याच मजुरांना त्यांच्या घरी परत पोचवण्याची जवाबदारी सोनू ने घेतली होती आणि आता तो देशातल्या ह्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे!
सामाजिक भान असलेला हा बॉलिवूड मधला एक वेगळाच अभिनेता. कुठलाही दिखावा नाही की चॅरिटी शो नाही. अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता सोनू जे काम करतोय ते खरच वाखाणण्याजोगच आहे!
हे ही वाचा –
ह्या ट्विट नंतर त्याला पुन्हा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येऊ लागले आणि सोनू ने या विषयी अगदी स्पष्ट आणि निर्भीड भूमिका घ्यायचं ठरवलं!
देशातल्या वेगवेगळ्या राज्यात पूर परिस्थिति असल्याने तिथल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं शक्य नाही. आणि ही परिस्थिति आणि सरकारची उदासीनता बघता सोनू ह्याने स्वतः ट्विटर वरून परीक्षा पोस्टपोन कराव्यात अशी विनंती सरकारकडे केली आहे!
शिवाय जरी सरकारने परीक्षा घेतल्या तरी मी तुमच्याबरोबर उभा आहे असं ट्विट करत बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याने दिलासा दिला आहे!
सोनूची ही कृती खरच खूप कौतुकास्पद आहे. हिंदी तसेच साऊथ कडचा इतका मोठा स्टार असून देखील कसलीही भीड न बाळगता तो जो स्टँड घेतो आहे तो स्टँड घ्यायला मोठमोठे सेलिब्रिटीज घाबरतात.
आपली इमेज, आपला पोलिटिकल अजेंडा ह्याला तडा जायच्या भीतीमुळे कित्येक सेलिब्रिटीज अशा मुद्यांवर भाष्य करायचं सुद्धा टाळतात. पण सोनू सुद हे काहीतरी वेगळंच समीकरण आहे!
देशवासीयांसाठी, स्वतःच्या तसेच इतर राज्यातल्या लोकांसाठी इतक्या आत्मियतेने व्यक्त होणारा, आणि अगदी जेवढी होईल तेवढी मदत करणारा सोनू विरळाच!
आज प्रत्येक सेलिब्रिटी हा सोशल मीडिया वर एक्टिव्ह असतो. पण स्वतःची ऐशोआरामी लाईफस्टाइल लोकांना दाखवण्यातून काही लोकांना वेळच मिळत नसतो. फार कमी लोकांना ह्या अशा सोशल मुद्यांवर भाष्य करायला आवडते.
काही सेलिब्रिटीज स्वतःच्या सोयीनुसार स्टँड घेतात आणि जेंव्हा खरच गरज असते तेंव्हा ते मूग गिळून गप्प बसतात.
पण सोनू सारखा सच्चा, दिलदार कलाकार फक्त योग्य स्टँडच घेत नाही तर स्वतःकडून लोकांना जेवढी होईल तेवढी मदत सुद्धा करतो. इथंच या बॉलिवूड सेलिब्रिटी मधल्या माणुसकीचं दर्शन घडतं!
आणि म्हणूनच सोनू सुद इतर सेलिब्रिटीज पेक्षा वेगळा वाटतो. फक्त बॉलिवूडच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातल्या सेलिब्रिटीजनी उघडपणे त्यांना जो योग्य वाटतो तो स्टँड घेणं गरजेचं आहे!
कारण आपल्या समाजातला एक मोठा वर्ग ह्या अशा कित्येक सेलिब्रिटींना फॉलो करतो. प्रत्येक वेळेस स्वतःला सेफ ठेवून काही न बोलणं हे योग्य नाही!
कधीतरी स्वतःची पॉलिटिकल आयडियोलॉजी बाजूला ठेवून केवळ इतर लोकांच्या कल्याणासाठी ह्या सेलिब्रिटीजनी एक स्टँड घेणं गरजेचं असतं. कदाचित काहीतरी फरक पडू शकतो.
रील लाईफमधला व्हिलन पण रियल लाईफ मधला खरा हीरो असा सोनू सुदच्या ह्या स्तुत्य उपक्रमा बद्दल त्याला खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून आभार!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.