Site icon InMarathi

शकुंतलादेवी ह्यांचा देखील रेकॉर्ड तोडणाऱ्या २१ वर्षीय भारतीय ह्युमन कॅलक्युलेटरचा प्रेरणादायी प्रवास!

neelkanth featured inmarathi

thehansindia.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

शकुंतला देवी सिनेमा पहिला का? काही दिवसांपूर्वी हाच प्रश्न सगळे एकमेकांना विचारत होते. सिनेमा आणि शकुंतला देवी यांचं व्यक्तिमत्व असं होतं कि प्रत्येकाला त्यांचा प्रवास जाणून घ्यायची इच्छा होती.

गणित हा विषय जितका लोकांना घाबरवणारा आहे, तितकाच तो काही लोकांच्या आवडीचा सुद्धा आहे. गणित या विषयाची सर्वात चांगली गोष्ट जी शाळेत असताना आपल्याला आवडायची की, त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात.

तुमचं उत्तर जर का बरोबर असेल तर तुमचे मार्क कोणीच कमी करू शकत नाही. इतर विषयांमध्ये उत्तराची मांडणी कशी केली आहे? हे फार बघितलं जायचं.

शकुंतला देवी किती हुशार होत्या हे आपल्याला सिनेमा मुळे समजलं. पण, गणित या विषयावरचं प्रभुत्व हे त्यांच्यासोबतच संपलं असं अजिबात नाहीये.

 

indiatoday.com

 

हैद्राबाद चा २० वर्षीय तरुण नीलकंठ भानु प्रकाश हा नुकताच फास्टेस्ट human calculator म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याच्याबद्दल जाणून घेऊयात.

नीलकंठ भानु प्रकाश हा दिल्लीच्या सेंट स्टिफन कॉलेज मधून ग्रॅज्युएट झाला आहे.

लंडनच्या Mind Sports Olympiad ने आयोजित केलेल्या Mental Calculation World Championship या स्पर्धेत नीलकंठ भानु प्रकाश यांनी सुवर्णपदक पटकावून भारतीयांची मान उंचावली आहे.

ही स्पर्धा जिंकणारा नीलकंठ भानु प्रकाश हा पहिलाच भारतीय आहे. कोरोना च्या सावटामुळे ही स्पर्धा या वर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. या स्पर्धेत १३ देशातील स्पर्धक सहभागी झाले होते.

ज्यामध्ये जर्मनी, इंग्लंड, UAE, फ्रांस, ग्रीस आणि लेबनान हे देश समाविष्ट होते. एकूण ३० स्पर्धक या स्पर्धेत होते. वयोगट १३ ते ५० हा ठरवण्यात आला होता.

नीलकंठ भानु प्रकाश यांनी या स्पर्धेत त्यांच्या प्रतिस्पर्धी लेबनिझ च्या स्पर्धकाला ६५ गुणांनी मात केली. UAE च्या स्पर्धकाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.

 

theweek,in

 

Mind Sports Olympiad ही स्पर्धा सर्वात पहिल्यांदा १९९८ मध्ये घेण्यात आली होती.

नीलकंठ भानु प्रकाश यांनी वयाच्या पाचव्या वर्षी SIP Abacus या कोर्स ला ऍडमिशन घेतली होती. Abacus कोर्सच्या ९ लेवल्स त्यांनी पूर्ण केल्या. नीलकंठ भानु प्रकाश यांनी त्यांच्या गणिताच्या टॅलेंट ने Abacus ग्रँड मास्टर ही सुद्धा परीक्षा क्लिअर केली.

२०११ आणि २०१२ मध्ये नॅशनल Abacus Championship ही स्पर्धा नीलकंठ यांनी जिंकली. ही वेळ होती नीलकंठ भानु प्रकाश यांचं टॅलेंट जगासमोर येण्याची. आणि ते घडलं.

नीलकंठ भानु प्रकाश यांनी २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय Abacus Championship ही स्पर्धा जिंकली.

नीलकंठ भानु प्रकाश यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे की,

“गणित हा विषय एखाद्या खेळासारखा मुलांना शिकवला गेला पाहिजे. कित्येक देशांमध्ये गणित हे एक विज्ञान नसून ही एक कला म्हणून शिकवली जाते. भारतात सुद्धा तसं व्हायला पाहिजे.”

 

ndtv.com

 

हा विचार खूप योग्य आहे. गणिताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर अजून ही असे स्टार भारतात तयार होतील यात शंकाच नाही. लहान मुलांमध्ये गणिताची गोडी कशी वाढवता येईल? या प्रश्नाचं उत्तर देताना नीलकंठ भानु प्रकाश सांगतात की, –

“शाळेत येताना लहान मुलांची पाटी कोरी असते. आपल्या शिक्षण पद्धतीत परीक्षा ही अश्या गोष्टींनी घेतली जाते जी की, प्रत्यक्ष आयुष्यात फार कमी वेळेस उपयोगी पडते. यामुळे लहानपणीच मुलांच्या मनात गणिताबद्दल एक भीती बसते.

संख्या आणि अंकगणित ही खरं तर सर्वात मजेशीर गोष्ट आहे. मला भारताला परत एकदा गणित तज्ञ देश ही ओळख निर्माण करून द्यायची आहे.

भारतात किती तरी हुशार विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. आपण सर्वांनी मिळून नवीन पिढीला गणिताची आवड निर्माण करण्यास मदत केली पाहिजे.”

नीलकंठ भानु प्रकाश यांनी स्वतःची एक स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे. त्या कंपनीचं नाव ‘Exploring Infinities (EI)’ असं आहे. ही कंपनी सध्या तेलंगणा सरकार सोबत काम करत आहे.

 

youtube.com

 

तेलंगणा सरकार सोबत काम करून ही कंपनी लहान मुलांच्या गणित सोडवण्याची पद्धत, अचूकता आणि गती या गोष्टींवर काम करत आहे.

Exploring Infinities या कंपनीने आतापर्यंत इयत्ता सहावी ते दहावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांसाठी ७०० तासांचा अभ्यासक्रम रेकॉर्ड करून ठेवला आहे.

निपुणा आणि विद्या या दोन टीव्ही चॅनल वर EI या कंपनी चे सेशन्स १०.३० ते ४.३० या वेळेत नियमितपणे प्रसारित केले जातात.

नीलकंठ भानु प्रकाश यांनी या स्पर्धेत शकुंतला देवी यांच्या स्पीड ला सुद्धा मागे टाकलं आहे आणि नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

सध्या ‘Fastest Human Calculator in the world’ हा किताब नीलकंठ भानु प्रकाश यांच्या नावावर आहे ही फार अभिमानाची गोष्ट आहे. यासोबतच, नीलकंठ भानु प्रकाश यांच्या नावावर ‘Power Multiplication Record’ हा सुद्धा रेकॉर्ड आहे.

आजचा तरुण त्यांच्या भविष्याबद्दल सिरीयस नाही असे काही विधान आपण काही वरिष्ठांकडे ऐकत असतो.

पण, जेव्हा नीलकंठ भानु प्रकाश सारखे तरुण असे काही पराक्रम करून दाखवतात तेव्हा प्रत्येक तरुणाला “Yes, we can do it” असा संदेश देतात आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा देत असतात.

 

financialexpress.com

 

प्रत्येकाला गणिताची आवड निर्माण होईल असा हा प्रवास आहे. आमच्या पूर्ण टीम कडून नीलकंठ यांचं अभिनंदन.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version