Site icon InMarathi

चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय…थांबा हे गंभीर परिणाम आधी वाचाच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मुसळधार पाऊस बरसू लागला की पहिली आठवण येते ती चहाची! वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन पाऊस अनुभवायची मजा काही वेगळीचं आहे.

सकाळी उठल्या उठल्या चहा हा लागतोच. चहाची तलफ असलेले बरेच सापडतील आपल्याला. अस्सल चहाबाज चहासाठी कायम टपरी वरच्या चहाला पसंती देतात.

कटिंग चायने आज मुंबई सारख्या कित्येक शहरांची दिवसाची सुरुवात होते आणि हेच टपरीवर चहा विकणारे आयटी हब समोर स्टॉल टाकून आज दिवसाला हजारोंचा व्यवसाय करत आहेत ती वेगळी गोष्ट.

 

theculturetrip.com

 

पण एक सामान्य माणूस नाही म्हटलं तरी दिवसाला २ कप चहा घेतोच. चहाचे फायदे काय ते वेगळं सांगायला नको. नुकसान देखील तेवढेच आहे.

पण सगळ्यात जास्त नुकसान होत ते पुन्हा पुन्हा गरम केलेल्या चहाने, आणि याकडेचं सर्वात जास्त दुर्लक्ष केलं जातं.

आयटी हब च्या समोर चहाच्या ठेल्याबद्दल आपण पाहिले.

एका थर्मास मध्ये काढून ठेवलेला चहा सर्रास दिला जातो. हा चहा घेण्यापेक्षा तो न घेतलेला बरा. पहिली गोष्ट अशी की तो चहा कधीचा आहे त्यावर प्रश्नचिन्ह आणि दुसरं म्हणजे तो किती वेळा उकळला गेला असेल.

घरात देखील एकदा केलेला चहा परत उकळून हा घेतलाच जातो. पुन्हा पुन्हा उकळलेला चहा घेणे हे विष घेण्यासारखंचं आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही.

आपल्याकडे चहा पुन्हा गरम करण्याची सवय ही जुनीच आहे. तथापि, असे केल्याने बऱ्याचदा चहाची चव, पौष्टिक गुणधर्म आणि सुगंध निघून जातात.

जर आपण आपला चहा चार तासापेक्षा जास्त वेळ सोडून दिला असेल तर चहा पुन्हा गरम करण्याचा विचार केला जात नाही. कारण यामुळे चहाचा नैसर्गिक तरतरीपणा आणण्याचा गुणधर्म तर निघून गेलेला असतो शिवाय बॅक्टेरियात वाढ होऊ शकते.

 

pixelproduction.in

 

जर आपण दूध आणि साखरेसह बनवलेला चहा पुन्हा गरम करण्याचा विचार करीत असाल तर हे जाणून घ्या की यामुळे केवळ अतिरिक्त वेगाने बॅक्टेरिया आणि इतर दूषित पदार्थ तयार होतात.

हर्बल, फळभाज्या आणि दुधाचा चहा सतत गरम केल्यामुळे त्याचे अनेक फायदेकारक गुणधर्म दूर होतात. काही अस्थिर संयुगे जसे की आवश्यक तेल आणि काही आरोग्यदायी घटक असतात ते जास्त गरम झाल्यास ते निघून जातात.

४ ते ८ तासांपेक्षा जास्त जुना चहा असेल तर परत गरम करू नका. जास्तीत जास्त १० ते १५ मिनिटे तयार केलेला चहा हा योग्य असतो.

अन्न विषबाधेसाठी जबाबदार जीवाणू तयार केलेल्या चहामध्ये वाढतात जे ४१ ते १४० डिग्री फॅरेनहाइट दरम्यान उष्णतेच्या संपर्कात असतात आणि त्या तापमानात त्यांची वाढ होत असते.

दुधाच्या चहाच्या बाबतीत हे प्रकरण आणखी वाईट आहे, जो गरम झाल्यावर थोडा बेचव आणि दाणेदार पोत निर्माण करतो.

दुधाची उपस्थिती परिणामी बॅक्टेरियांचा जलद वाढीसाठी त्याचा उपयोग होतो आणि केवळ चहा गरम केल्याने त्यांचा नाश होणार नाही.

 

taxguru.in

 

जर हेच बॅक्टेरिया आपल्या चहामध्ये वाढले तर समस्या धोकादायक होऊ शकतात. त्या कदाचित डोळ्यास दिसत नसतील पण परिणाम मोठा होण्याची शक्यता असते.

गरम झाल्यावरही असा चहा पिण्यामुळे पोटात अस्वस्थता, अतिसार, पेटके, मळमळ, जळजळ आणि इतर अनेक पाचक समस्या उद्भवू शकतात.

चहाचे पौष्टिक गुणधर्म गमावून दूषित होण्याऐवजी चहा गरम केल्यास त्याचा स्वादही नकारात्मक होतो.

चहाच्या रंग आणि चवीसाठी टॅनिन्स पॉलिफेनॉल हे रासायनिक द्रव्य जबाबदार असतात. जेव्हा तयार केलेला चहा आपण पुन्हा गरम करतो तेव्हा चहा पावडर जास्तीत जास्त टॅनिन सोडतात आणि चहाची चव कडवट होते.

 

lastea.com

 

जे लोक कडकडीत चहा पसंत करतात त्यांना या चहाची चव अजिबात आवडणार नाही.

दुसऱ्या एखाद्या भांड्यात पाणी उकळवा आणि मग उकळत्या पाण्यात चहा ठेवलेलं भांड ३ ते ४ मिनिटे ठेवा. त्याला ‘डबल बॉयलर’ पद्धत म्हणतात.

कडकडीत चहा घ्यायची सवय असेल तर हा चहा तुमच्या साठी नाही. कोमट असताना त्याचे सेवन करा. आपल्या पाचक आरोग्यासाठी, चार तासापेक्षा जास्त काळ ठेवलेला चहा पुन्हा गरम करू नका.

दूध न घातलेल्या उरलेल्या काळ्या चहाचे काय करावे हे आपल्याला माहित नसल्यास,त्याचा वापर कसा करावा यासाठी काही ऑप्शन पुढे दिलेले आहेत. चहामध्ये पोषक घटक असतात. त्याचा वापर आपण आपल्या घरातल्या झाडांसाठी करू शकतो.

आपण आपला चेहरा देखील धुवू शकता कारण हा एक जंतुनाशक आणि ग्रीस काढून टाकणारा एजंट म्हणून ओळखला जातो.

तव्याच्या आणि कुकरच्या तळाला चिटकलेले अन्नकण काढण्यासाठी चहा पावडरचा वापर केला जाऊ शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version