आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
‘२०२० हे वर्ष डिलीट करून टाकावं’ हे वाक्य कोरोनामुळे आपण वारंवार ऐकतच आहोत. पण, असं थोडीच होत असतं. कालचक्र हे आपल्या गतीने सुरूच असतं. ते आपल्याला वेगवेगळे दिवस दाखवत असतं.
ते मान्य करायचे की त्याचा विरोध करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
येणारा नवीन दिवस चांगला असेल या आशेने आपण रोज नव्याने जगत असतो. पण, इतिहासात एक असं वर्ष होऊन गेलं आहे जेव्हा एका वर्षातले ११ दिवस अचानक गायब करण्यात आले होते.
हे वर्ष होतं १७५२ आणि महिना होता सप्टेंबर. हे खरंच घडलं आहे.
ब्रिटन, अमेरिका आणि इतर इंग्रजी देशातील लोक हे २ सप्टेंबर १७५२ रोजी झोपले आणि सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा तारीख होती १४ सप्टेंबर १७५२. त्या काळात लोकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. प्रत्येक गावात दंगली झाल्या होत्या.
त्या काळात आजच्या सारखा सोशल मीडिया तर नव्हता; नाही तर ही घटना किती तरी दिवस ट्रोल होत राहिली असती. यंदाच्या वर्षात अनेक महिन्यांच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे कदाचित आपल्याला हा ११ दिवस म्हणजे छोटा काळ वाटू शकतो.
==
हे ही वाचा : आपल्या रोजच्या वापरातील कॅलेंडर कधी, कसं जन्मलं? भारतीय कॅलेंडरची सुुरुवात कधी झाली याचा रोचक इतिहास वाचा
==
पण, त्या काळात झालेला लोकांचा विरोध हा यासाठी होता की, त्या काळात जन्म झालेले, मृत्युमुखी पडलेले आणि लोकांनी त्या दरम्यान ठरवलेले लग्न यांची कुठेच नोंद होणार नव्हती.
कॅलेंडर मधून गायब झालेल्या या ११ दिवसांचा काळ हे खूप confusing होतं. त्यासोबतच, ब्रिटन सरकारने अजून एक बदल जाहीर केला होता. १७५२ च्या आधी नवीन वर्ष हे २५ मार्चपासून सुरू व्हायचं.
ते बदलून नवीन वर्ष आतापासून १ जानेवारी ला सुरू होईल आणि ३१ डिसेंबरला संपेल हा बदल सुद्धा त्याच वेळी जाहीर करण्यात आला होता. हे दोन्ही बदल एकाच वेळी लोकांना पचवायचे होते जे की सोपं नव्हतं.
नवीन कॅलेंडर नुसार एखाद्या व्यक्तीचं जर २६ एप्रिलला लग्न झालं असेल तर ती तारीख आता कोणती असेल? किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर २ फेब्रुवारी १७१० रोजी झाला असेल तर ती तारीख आता कोणती असेल?
असे असंख्य प्रश्न लोकांना पडले होते.
अर्थात, कमी करण्यात आलेल्या या ११ दिवसांनी एक उत्तम रिवाज निर्माण केला आहे. भरपगारी रजा, म्हणजेच ‘पेड लिव्ह’ ही संकल्पना या सप्टेंबर महिन्यात अस्तित्वात आली आहे.
कारण १७५२मधील सप्टेंबर महिना केवळ १९ दिवसांचा होता आणि याकाळात कर्मचारी वर्गाला पूर्ण महिन्याचा म्हणजे ३० दिवसांचा पगार देण्यात आला.
म्हणजेच ११ दिवस काम न करता ‘पगारी सुट्टी’चा अनुभवच जणू काही या मंडळींनी घेतला…
हा सगळा घोळ काय आहे?
पारंपारिक पद्धतीने ज्युलियन कॅलेंडर वापरलं जायचं. ज्युलियन कॅलेंडर हे ज्युलियस सीझर यांच्याद्वारे ४६ B.C.मध्ये आमलात आणलं गेलं होतं. हे कॅलेंडर पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या प्रदक्षिणेनुसार तयार करण्यात आलं होतं.
ज्यामध्ये ३६५ दिवस कॅलेंडर आणि दर चार वर्षांनी येणारं लीप इयर हे मान्य करण्यात आलं होतं. या पद्धतीनुसार नवीन वर्ष हे २५ मार्च पासून सुरू होत असे.
==
हे ही वाचा : महिन्यात दिवस कधी ३० तर कधी ३१, फेब्रुवारीत तर त्याहून कमी… असं का? जाणून घ्या
==
कालांतराने असं लक्षात आलं की, ज्युलियन सिस्टीम मुळे सोलार वर्ष हे दर १३१ वर्षांनी १ दिवसाचा उशीर होत असे. हा फरक ४०० वर्षात ३ दिवसांचा पडत होता.
325 A.D. ते 1582 A.D. मध्ये हा फरक दहा दिवसांचा झाला होता.
जगातील सर्व प्रमुख देशांनी एकत्र येऊन हे मान्य केलं की, ज्युलियन सिस्टीम ही लीप इयरची मोजणी बरोबर करत नाही. दिवस मोजायची अजून एक पद्धत होती जी की पोप Gregory यांनी १५८२ मध्ये सुरू केली होती.
ही पद्धत इंग्लंड ला मान्य नव्हती. जो बदल जगातील इतर देशांनी ५ ऑक्टोबर १५८२ रोजी मान्य केला तो बदल इंग्लंड ला १७५२ च्या सप्टेंबर मध्ये मान्य करावाच लागला कारण दिवसांचं अंतर वाढून ११ दिवसांपर्यत वाढलं होतं.
चर्च ऑफ रोम ला असलेल्या विरोधामुळे हा बदल इंग्लंड ने आधी मान्य केला नव्हता. इंग्लंड सोडून इतर ब्रिटिश देशांनी हा बदल १०० वर्षा आधीच मान्य केला होता.
१५८२ ते १७५२ या काळात जॉर्जियन आणि ज्युलियन या दोन्ही प्रकारचे कॅलेंडर फॉलो केले जायचे. ज्यामुळे प्रचंड घोळ व्हायचे.
वंशावळ तयार करणाऱ्या व्यक्तींना इंग्लिश देशातील व्यक्तीची वंशपत्रिक तयार करताना १५८२ ते १७५२ या काळातील व्यक्तींची माहिती परत परत चेक करून घ्यावी लागायची.
तारीख लिहिताना त्या काळात O.S. (old style) आणि N.S. (New Style) या दोन पद्धती वापरल्या जायच्या. १७५१ च्या कॅलेंडर मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत काही तारखा या रिपीट झाल्या होत्या.
१५८२ मध्ये बदल मान्य करणाऱ्या देशांमध्ये फ्रांस, इटली, पोलंड, पोर्तुगाल आणि स्पेन हे अग्रस्थानी होते. हा बदल सर्वात शेवटी मान्य करणारा ‘टर्की’ हा देश होता. त्यांनी हा बदल १९२७ मध्ये मान्य केला होता.
इंग्लंड मध्ये हा बदल घडवून आणण्यासाठी कॅलेंडर act पास करण्यात आला होता. या act ला The Calendar (New Style) Act 1750 हे नाव देण्यात आलं होतं.
या बदलामुळे १७५१ हे वर्ष फक्त २८२ दिवसांचं मान्य करण्यात आलं होतं. पण, हा बदल मान्य करणं गरजेचं होतं म्हणून २ सप्टेंबर १७५२ ला हा निर्णय घेण्यात आला होता.
विलियम होगार्थ यांनी त्यांच्या एका चित्राद्वारे “Give us 11 days” हा निषेध व्यक्त केला होता. १७५५ मध्ये काढलेलं हे पेंटिंग खूप गाजलं होतं. पण, या सर्व विरोधासमोर तत्कालीन ब्रिटन सरकार झुकलं नाही.
==
हे ही वाचा : सर्वांसाठी सुरु आहे वर्ष २०२१, पण या देशात अजूनही आहे २०१४, असे का, वाचा!
==
भारतात सद्य परिस्थतीत होणारे काही बदल हे आपल्याला मान्य नसतात. त्यावर शांत मार्गाने विरोध सुद्धा दर्शवला जातो. काही बदल या विरोधामुळे काही प्रमाणात शिथिल केले जातात. पण, काही प्रश्न हे सुटतच नाहीत.
तसं न करता, सरकारचं लॉजिक समजावून घेऊन चांगले बदल मान्य करण्याची सवय लावल्यास आपल्याकडे दर दिवशी होणारे मोर्चे आणि त्यातून होणारं आर्थिक नुकसान हे आपण नक्कीच भरून काढू शकतो.
या साठी थोडा अभ्यास आणि आपण निवडून दिलेल्या सरकारवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.