आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
काही जागा या तुमच्याशी बोलत असतात. हे वाचायला थोडं मजेशीर वाटेल. पण, असं होत असतं. जसं की, तुम्ही एखाद्या मंदिरात जातात आणि बाहेर आल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटतं. तुम्ही समजा नवीन घर बघत असाल तर, एखाद्या फ्लॅट मध्ये गेलं की तुम्हाला एकदम शांत वाटतं.
आपल्या requirements सांगितल्यावर थोड्या फार फरकाने ब्रोकर आपल्याला चांगलेच फ्लॅट दाखवत असतो. पण, त्या एका फ्लॅट मध्ये गेल्यावर तुम्ही त्याला विकत किंवा भाड्याने घ्यायचं ठरवतात.
आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही आहोत पण, अजून एक उदाहरण सांगता येईल की, आपण काही जणांकडून ऐकतो की, जेव्हा मला खूप प्रश्न पडलेले असतात तेव्हा मी एकटा राहतो किंवा एखाद्या ट्रेकिंग किंवा वैष्णोदेवी च्या दर्शनाला जातो.
अश्या ठिकाणी जाताना बरेच लोक त्यांच्या status ला हे वाक्य ठेवत असतात : ‘In search of many answers…’
तुमची श्रद्धा असलेली जागा ही काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन बसलेली नसते. ही तुमची धारणा असते की, तिथे जाऊन आलो की, मला सुचलेले निर्णय योग्यच असतील.
एक अजून बदल होतो तो म्हणजे तुम्ही तुमच्या प्रश्नांपासून थोडं लांब जाता आणि लांबून बघितल्यावर कोणतीही गोष्ट छोटीच दिसत असते. प्रश्न सुटतात. ‘रुकी रुकी सी जिंदगी… फट से चल पडती है..’
कोरिया मधील लोकांना सुद्धा असंच होतं. माउंट paektu हे एक उंच डोंगर आहे जे की, जवळपास हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीतून उत्पन्न झालं आहे.
DPRK (Democratic People’s Republic of Korea) म्हणजेच नॉर्थ कोरिया जे की किम जोंग यांच्यामुळे नेहमीच चर्चेत असतं. या DPRK आणि चीन ला जोडणारी माउंट paektu ही एक पर्वतरांग आहे.
ही पर्वतरांग कोरियन लोक पवित्र मानतात. कारण, या ९००० फूट उंचीच्या ठिकाणावर कोरियाचा शोध लावणाऱ्या व्यक्तीचा जन्म झाला होता.
माउंट paektu ला त्यामुळे प्रचंड महत्व आहे आणि या जागेला कोरियाचं धार्मिक उगमस्थान म्हणून संबोधलं जातं.
स्वतः किम जोंग उन हे कोणतेही मोठे निर्णय घ्यायच्या आधी या ठिकाणी जातात आणि त्यांचा निर्णय जाहीर करतात. ते माउंट paektu ला एकटेच जातात. घोड्यावरून इतक्या उंचीवर जातात आणि येताना निर्णय सोबत घेऊन येतात जे कोरिया मध्ये प्रसिद्ध आहे.
मध्यंतरी अमेरिकेचा काही प्रश्नांसाठी कोरिया वरील दबाव वाढत होता, कोरियन लोक अमेरिकेवर रागावले होते. त्यावेळी काय निर्णय घ्यावा हा विचार करण्यासाठी किम जोंग हे माउंट paektu वर गेले होते.
किम जोंग 2 म्हणजे किम जोंग उन (विद्यमान राजा) चे वडील इथे जन्मले होते. किम हा पूर्ण परिवार या माउंट paektu ची साक्ष देऊन कोरिया वर राज्य करत आला आहे.
या पर्वतरांगांना ते “माउंट baekedu ब्लडलाईन” हे नाव सुद्धा देत असतात. माउंट paektu चा उल्लेख साऊथ कोरिया च्या राष्ट्रगीतात सुद्धा करण्यात आला आहे.
किम जोंग उन हे या ठिकाणी वारंवार येत असतात. २०१७ मध्ये जेव्हा कोरिया ला आशियातील सर्वात मोठी मिसाईल Intercontinental Ballistic Missile (ICBM) ही लाँच करायची होती त्या आधी किम जोंग उन हे माउंट paektu वर गेले होते.
कारण, त्यावेळी ही लॉंग रेंज मिसाईल टेस्ट करू नये असा दबाव अमेरिकेने कोरियावर टाकला होता. या सर्व पार्श्वभूमीवर किम जोंग उन यांना एकांत आणि पोषक वातावरण हवं होतं.
ते त्यांना माउंट paektu वर मिळालं आणि ते योग्य निर्णय घेऊ शकले असं बोललं जातं.
साऊथ कोरिया चे प्रेसिडेंट Moon Jae-In हे २०१८ मध्ये तीन नॉर्थ कोरिया च्या तीन दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी किम जोंग आणि मुन जे इन हे दोघेही माउंट paektu वर राजकीय बैठक म्हणून गेले होते.
या शांत ठिकाणी गेल्यावर किम जोंग उन हे शांततेचा मार्ग अवलंबायला तयार झाले होते. त्यांनी या बैठकीनंतर हे जाहीर केलं होतं की,
“आमच्या काही मागण्या जर का अमेरिकेने मान्य केल्या तर आम्ही सुद्धा लॉंग रेंज च्या मिसाईल टेस्टिंग ची प्रक्रिया बंद करू.”
निसर्गाच्या समोर आपण सगळे खूप छोटे असतो. जेव्हा आपण कोणत्याही उंच ठिकाणी किंवा विशाल समुद्रासमोर जातो तेव्हा आपल्याला आपण किती छोटे आहोत हे लक्षात येतं.
कदाचित हीच भावना किम जोंग उन यांची सुद्धा असेल म्हणून तर ते माउंट paektu ला शरण येतात आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं मागतात.
जर का माउंट paektu वर येऊन किम जोंग उन यांचे विचार आणि वृत्ती शांत होत असेल तर फक्त कोरियाच नाही पूर्ण जग या गोष्टीचं स्वागतच करेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.