Site icon InMarathi

सावधान : लेन्स वापरताय? या गोष्टी समजून घेतल्या नाहीत, तर एक चूक तुम्हाला महागात पडू शकते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कित्येक लोक छान दिसावं म्हणून चष्म्या ऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. कुठे विसरायची भानगड नाही, की चष्म्याच्या काचेवर फॉग येण्याची चिंता नाही.

कॉन्टॅक्ट लेन्सचा पर्याय जरी सोयीस्कर असला, तरी त्या लेन्स हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण आपण एक अनैसर्गिक वस्तू आपल्या डोळ्यात घालणार असतो.

 

eyelux.com

 

डोळ्यासारखा नाजूक अवयव ज्याला हृदय, मेंदू यांसारखे सुरक्षा कवच नाही, त्याची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार “कॉन्टॅक्ट लेन्सेस कित्येक इन्फेक्शनचे मूळ कारण ठरतात. जरी कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे सोयीचे व सोपे असले, तरी त्यांच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्यास किंवा त्यांचा वापर कशाप्रकारे करावा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास, आपल्या डोळ्याला मोठी ईजा होऊ शकते.

शेवटी जंतू तर सगळी कडे असतातच. पण डोळ्यासारख्या नाजूक अवयवाला असे इन्फेक्शन फार महागात पडू शकते. त्यामुळे या कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना काय काळजी घ्यावी हे पाहूया.

 

१) तज्ञांकडून सल्ला –

लेन्स वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. त्या आपल्या डोळ्याला सूट होतात का, कोणत्या प्रकारच्या लेन्सेस वापराव्या हे जाणून घ्या.

२) लेन्स घालून झोपणे टाळा –

 

depositphotos.com

 

रात्री झोपताना आठवणीने आपल्या डोळ्यातील लेन्स योग्य त्या केस मध्ये काढून ठेवा.

लेन्स लाऊन झोपल्याने डोळ्यातील ऑक्सिजन पुरवठा कमी होतो व लेन्सवर जे जंतू, बॅक्टरिया असतील ते सरळ आपल्या डोळ्यात शिरतात.

३) लेन्स केस –

 

macleodoptometry.ca

 

आपल्या लेन्स सुरक्षित व जंतू विरहित ठेवण्याकरता लेन्स केसच वापरा. ती केस वेळचे वेळी स्वच्छ करून घ्या.

आपल्या टूथब्रश प्रमाणे ती केस सुद्धा अस्वच्छ होत असते. त्यामुळे केस क्लिनरने ती क्लीन करून घ्या आणि मगच त्यात लेन्स ठेवा. दर २-३ महिन्यात ती केस बदलत राहणे अत्यावश्यक आहे.

४) लेन्स लाऊन पाण्यात जाणे –

डोळ्यात लेन्स असताना अंघोळ करणे, चेहरा धुणे, पोहायला जाणे, पावसात भिजणे टाळा.

पाण्यात acanthamoeba नावाचे बॅक्टेरिया असतातच. लेन्सला हे bacteria चिकटून राहू शकता व त्यांच्या संपर्कात आल्याने आपल्या डोळ्यांत फार घातक असे इन्फेक्शन होऊ शकते.

५) कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशनचा पुनर्वापर –

 

perfectlens.ca

 

स्वच्छ करण्यासाठी एकदा वापरलेले सोल्युशन टाकून द्या. पुन्हा वापर करणे टाळा.  थोडे पैसे वाचवण्याचा नादात, २-३ वेळा त्याच सॉल्युशनचा उपयोग करणे टाळा.

६) लेन्स वापरण्याचा कालावधी –

लेन्स ओरिजिनल पॅकिंग मधून काढल्यानंतर जास्तीत जास्त किती दिवस वापरू शकता हे आधी विचारून घ्या. वेळ संपली की त्या लेन्स टाकून द्या आणि नवीन लावा.

७) मेकअप –

 

keranews.org

 

लेन्स लावल्या असताना मेकप करत असाल, तर मेकप सेटिंग स्प्रे वापरणे टाळा, किंवा वापरताना डोळे नीट बंद करून घ्या.

८) पापण्यांची हालचाल –

लेन्स लावल्यावर आपल्या पापण्यांच्या नैसर्गिक हालचालींवर बंधन घालू नका. त्याने तुमच्या डोळ्यांना अजिबात ईजा होणार नाही.

९) लेन्स केस सोबत बाळगणे –

लेन्स वापरताना प्रवास होत असेल, तर लेन्स केस सगळी कडे सोबत बाळगणे अत्यावश्यक आहे. काढून ठेवते वेळी आपल्या लेन्स त्याच केस मध्ये ठेवा.

१०) हात धुणे –

 

nationalgeographic.com

 

प्रत्येक वेळी लेन्सना स्पर्श करताना आपले हात साबणाने स्वच्छ धऊन, नीट पुसून वळवून घ्या. हातचे पाणी लेन्सला, किंवा त्या सोल्युशन मध्ये मिसळता कामा नये.

११) लेन्स खाली पडल्यास –

लेन्स जर खाली पडली, तर भरपूर क्लीनिंग सोल्युशनने नीट स्वच्छ करून मगच वापरा.

१२) लेन्सचा त्रास होत असल्यास –

 

insiderenvy.com

 

लेन्स लावल्या नंतर जर डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यांची आग होणे, लालसर होणे, दुखणे, खाज येणे यां पैकी एकही समस्या उद्भवल्यास त्या लेन्स त्वरित डोळ्यातून काढून टाका.

सतत ह्याच समस्या होत असतील, तर आपल्या डॉक्टरांना दाखवा व सल्ला घ्या.

१३) लेन्स लाऊन उष्ण ठिकाणे जाणे –

लेन्स लावले असताना गॅस जवळ, विस्तवा जवळ, डायरेक्ट उन्हात वगेरे जाणे टाळावे. उष्णतेमुळे लेन्स व डोळ्यांना ईजा होते.

१४) लेन्स कोणी वापरू नये –

 

1800contacts.com

 

.ज्यांना डोळ्यांचे इन्फेक्शन लगेच होते.
. ज्यांना “ड्राय आय” ची समस्या आहे.
. ज्यांना डोळे लाल होण्याची समस्या आहे.
. डॉक्टरांनी ज्यांना न वापरण्याचा सल्ला दिला त्यांनी
. वेळेच्या अभावी लेन्स हाताळण्याचे, स्वच्छ तेचे नियम पाळू न शकणाऱ्या व्यक्तींनी
. निष्काळजी व्यक्तींनी लेन्स वापरणे पूर्णपणे टाळावे.

वरील दिलेल्या बाबींची काळजी तंतोतंत घेतल्यास लेन्स सारखा सोयीस्कर पर्याय दुसरा नाही. त्यामुळे ज्यांना चष्मा विसरण्याची सवय असते, किंवा डोके जड होण्याचा त्रास असतो, त्यांनी वरील नियम पळून लेन्सचा योग्य वापर करावा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version