गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हेगारांचीच मदत घेणाऱ्या ह्या राज्याच्या पोलिसांचा पॅटर्नच निराळा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
न्यू साऊथ वेल्स (NSW) हे ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील एक राज्य आहे. सिडनी शहर हे त्या राज्याची राजधानी आहे. ऑस्ट्रेलियाचं सर्वात जास्त लोकसंख्या (८ मिलियन) असणारं हे राज्य आहे.
१७८८ मध्ये न्यू साऊथ वेल्स (NSW) ची स्थापना झाली. या स्थापनेला एक इतिहास आहे. १७७० मध्ये जेम्स कुक हे सर्वात पहिले युरोपियन होते ज्यांनी न्यू साऊथ वेल्स (NSW) ला भेट दिली होती.
आर्थर फिलिप हे या राज्याचे पहिले राज्यपाल होते. जानेवारी १७८८ मध्ये ११ जहाज, काही ब्रिटिश मिल्ट्री सैनिक आणि काही चोर हे पोर्ट जॅक्सन या बेटावर पोहोचले होते. ब्रिटिश साम्राज्याला वाढवण्याचा हा एक प्रयत्न होता.
या सर्वांनी मिळून एक न्यू साऊथ वेल्स कॉलनी ची स्थापना केली होती.
जेम्स कुक आणि सहकाऱ्यांनी We Are What We Steal हा एक नवीन प्रोजेक्ट हाती घेतला होता. या प्रोजेक्ट वर कंट्रोल मिळवण्यासाठी एका पोलीस यंत्रणेला उभं केलं होतं. NSW पोलीस फोर्स हे त्या पोलीस यंत्रणेचं नाव आहे.
ही आज जगातील सर्वात मोठ्या पोलीस यंत्रणेपैकी एक आहे. या पोलीस यंत्रणेला ‘नाईट वॉच’ असं सुद्धा नाव आहे. जॉन स्मिथ हे न्यू साऊथ वेल्स (NSW) पोलीस फोर्स चं नेतृत्व करत होते.
या पोलीस फोर्स चं हे वैशिष्ट्य होतं की, त्यात ज्या बारा लोकांची निवड करण्यात आली होती ते सगळे पोलीस हे मूळचे पोलीस नसून त्यातील १२ जण हे असे गुन्हेगार होते ज्यांनी की, त्यांच्या शिक्षेच्या काळात त्यांनी चांगलं वर्तन केलं होतं आणि कारागृह प्रशासनाला सर्वात कमी त्रास दिला होता.
राज्यपाल आर्थर फिलीप यांचा हे पोलीस फोर्स तयार करण्यात चोरांची मानसिकता समजून घेणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे हा उद्देश होता.
गुन्हेगारांना पकडण्यासाठी गुन्हेगाराची मदत घेण्याची ही इतिहासातली ही पहिलीच वेळ होती.
१७९६ मध्ये या १२ कॉन्स्टेबल्सचं तत्कालीन राज्यपाल जॉन हंटर यांनी दोन भागात विभाजन केलं. १८१० मध्ये तत्कालीन राज्यपाल लचलॅन यांनी या पोलीस फोर्स च्या बांधणी वर पुन्हा एकदा काम केलं.
नवीन रचनेमध्ये काही समस्या होत्या. गुन्हेगार हेच पोलीस ही रचना सर्वमान्य होत नव्हती. ही समस्या सुधरवण्यासाठी १८३३ मध्ये सिडनी पोलीस act आमलात आणला गेला.
शहरातील पोलीस आणि पोर्ट ऑफ सिडनी यांच्या मदतीने गुन्हेगारी रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. शहरातील गुन्हेगारी ही सतत वाढतच होती आणि चोरीचे प्रकरण सुद्धा वाढत होते.
Row Boat Guard आणि Border Police, the Mounted Police आणि the Gold Escort हे वेगवेगळ्या प्रकारच्या पोलिसांमुळे प्रशासनाला सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणं अवघड होत चाललं होतं.
या समस्येवर तोडगा म्हणून Police Regulation Act 1862 (NSW) हा आमलात आणला गेला.
या कायद्यामुळे सर्व पोलिसांना एकत्र आणण्यात आलं आणि न्यू साऊथ वेल्स पोलीस फोर्स म्हणून एकच संस्था कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जवाबदार म्हणून नियुक्त करण्यात आली.
नवीन पोलीस फोर्स ने पोलीस gazette ही पद्धत १८५४ मध्ये सुरू केली.
या गॅझेट मध्ये किती गुन्हे घडले, कोणता गुन्ह्याच्या शोधाची जवाबदारी कोणाला देण्यात आली आहे, चोरी झालेल्या ऐवजाचा तपशील, संशयित लोकांची माहिती हे सर्व एकत्रित करण्यात आली आणि सादर करण्यात आली. हे गॅझेट दर आठवड्यात प्रकाशित होऊ लागलं.
We are what we steal
नवीन पद्धतीत पोलीस फोर्स ने We are what we steal ही थीम अवलंबली होती. या पद्धतीनुसार पोलिसांनी लोक, जागा आणि वस्तू या सर्वांचा डेटा ठेवण्यास सुरुवात केली गेली. या पद्धतीला data visualisation असं नाव देण्यात आलं.
या पद्धतीत पोलीस गॅझेट मधून माहिती गोळा करेल ती व्यक्ती एक स्टोरीटेलर म्हणून काम करत असते. या कामासाठी क्राईम या विषयावर लिहिणारे लेखक सुद्धा अपॉइंट करण्यात आले होते.
पोलीस ऑफिसर ज्यांना शॉर्टहॅन्ड टायपिंग येते त्यांना प्राधान्य देऊन त्यांना एकमेकांना क्राईम स्टोरीज सांगायचं काम सुरू करण्यात आलं. पोलीस गॅझेट प्रकाशन करण्यासाठी वेगळी प्रकाशन पद्धत तयार करण्यात आली.
सोसायटीला सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करण्यात आलं. पोलीस गॅझेट च्या कक्षा रुंदवण्यात आल्या आणि त्यामध्ये फॅशन ट्रेंड्स, न्यू टेक्नॉलॉजी, ट्रान्सपोर्टची नविन पद्धत हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धत सुरू केली.
या पद्धतीमुळे गुन्हेगारी घडू शकणाऱ्या प्रत्येक बाबींवर लक्ष ठेवण्यास मदत होऊ लागली. एक कॉलनी जी की फक्त चोरांची होती तिथे चोरल्या गेलेल्या ज्वेलरी, सायकल इतक्या बारीक गोष्टींची सुद्धा माहिती रेकॉर्ड होऊ लागली आणि प्रत्येक चोर पकडला जाऊ लागला.
आपला समाज हा पोलीस सुरक्षित ठेवतात. पण, हे फक्त त्यांचं काम नाहीये. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गुन्ह्यांबद्दल पोलिसांना माहिती देणं हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे.
आर्थर फिलिप यांनी केलेला हा प्रयोग कौतुकास्पद आहे. कारण, या पद्धतीने फक्त गुन्हेगार संपले नाहीत तर गुन्हेगारी संपली जे की सर्वात जास्त आवश्यक आहे.
आपल्या शाळेत सर्वात जास्त बेशिस्त मुलाला मॉनिटर करून त्याच्या द्वारे पूर्ण वर्गाला शिस्तीचे धडे दिले जायचे त्यासारखीच ही गोष्ट वाटू शकते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.