हा चेहरा आणि हा साबण – स्वातंत्र्य लढ्यात यांनी कल्पनेपलीकडील कामगिरी बजावली आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोणतीही वस्तू विकत घेताना ‘Made In India’ हे जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला नेमकं काय वाटतं? भारतातच राहत असाल तर ही गोष्ट कदाचित तुम्हाला फार वेगळी वाटत सुद्धा नसेल.
पण, तुमच्यापैकी कोणी जर भारताबाहेर असेल तर तुमच्या लक्षात येईल की Made In India एखादी वस्तू दिसल्यावर किती अभिमान आणि विश्वासार्ह वाटतं.
प्रत्येक भारतीयातच जर का अशी भावना असेल तर भारत हा जगात आर्थिक दृष्ट्या शक्तिशाली देश होऊ शकतो यात अजिबात शंका नाहीये.
१३० करोड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात काय होऊ शकत नाही? नुकत्याच प्रकाशझोतात आलेल्या ‘आत्मनिर्भर’ या शब्दाचा काही लोकांनी योग्य अर्थ घेतला.
पण, काहींनी मात्र त्याची खिल्ली उडवली. कारण एकच, आपल्याला असलेलं विदेशी वस्तूचं आकर्षण. कार घेताना आपल्याला विदेशी असेल तरच चांगली ही एक भावना डोक्यात फिट बसली आहे. का? ते माहीत नाही.
आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तूंबद्दल जर कडवटपणा शिकायचा असेल तर एखाद्या जर्मन किंवा जपान च्या व्यक्तीला भेटा. त्यांच्याकडे तुम्हाला एकही दुसऱ्या देशात तयार झालेली वस्तू सापडणार नाही.
जर्मन व्यक्ती तर अमेरिकेत तयार झालेलं गुगल मॅप सुद्धा वापरत नाहीत. ते त्यांच्या देशाचं waze हेच app वापरतात. ‘स्वदेशीच वापरा’ या आशयाचा हा लेख नाहीये.
हा लेख आहे खगेंद्र चंद्र दास या भारतीय उद्योजकाच्या जीवन प्रवासाबद्दल. ज्यांनी कलकत्ता केमिकल कंपनी ची स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९१६ मध्ये केली.
आणि देशाला ‘margo’ हा पहिला भारतात तयार झालेला आणि कडुनिंबाचे पत्ते असलेलं पूर्णपणे नॅचरल साबण भारतात तयार केला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या मनात असलेल्या देशप्रेमाला एक दिशा दिली.
के.सी.दास यांचा जन्म बंगाल मधील स्वदेशी च्या भावनेने प्रेरित असलेल्या परिवारात झाला होता. त्यांचे वडील राय बहादूर चंद्र दास हे एक जज होते आणि आई मोहिनी देवी या महिला आत्मरक्षा समिती च्या प्रेसिडेंट होत्या.
कोलकत्ता मधून कॉलेजचं शिक्षण पूर्ण करून ते शिबपुर इंजिनियरिंग कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून काम करत होते. १९०५ च्या त्या काळात तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड कुझोन यांनी बंगालचं विभाजन करण्याचं कारस्थान ठरवलं होतं.
या निर्णयामुळे पूर्ण देश ढवळून निघाला होता आणि त्याची परिणीती ‘स्वदेशी कॅम्पेन’ मध्ये झाली होती आणि ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.
के.सी.दास हे या मोहिमेत सामील झाले आणि त्यांचा संबंध सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि बाळ गंगाधर टिळक यांच्याशी येऊ लागला. ब्रिटिश सरकार हे के.सी.दास यांना अटक करणार होती.
या गोष्टीची कल्पना आल्यावर त्यांच्या वडिलांनी के.सी.दास यांना उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवले. वडिलांच्या निर्णयाचा के.सी.दास यांनी मान ठेवला.
पण, इंडियन सोसायटी ऑफ सायंटिफिक ऍडवांसमेंट कडून मिळालेल्या स्कॉलरशिप मुळे त्यांना अमेरिकेत कॅलिफोर्निया इथे पाठवण्यात आलं.
१९१० या वर्षी के.सी.दास आणि त्यांचे मित्र सुरेंद्र मोहन बोस हे दोघेही B.Sc-Chemistry ची पदवी घेणारे पहिले भारतीय होते. घरापासून इतक्या लांब असूनही के.सी.दास हे मनाने स्वदेशी कॅम्पेन सोबत कायम जोडलेले होते.
ते कॅलिफोर्निया च्या इंडियन इंडिपेंडेन्स लीग चे सभासद होते.
भारतात उद्योग सुरू करायचा या ध्येयाने झपाटलेले के.सी.दास आणि त्यांचे मित्र सुरेंद्र बोस हे भारतात परतले आणि साबण तयार करण्याच्या बिजनेस ला शिकण्यासाठी दोघेही जपान ला गेले.
भारतात परतल्यावर आर.एन. सेन आणि बी.एन. मित्रा यांच्यासोबत के.सी. दास यांनी दक्षिण कोलकत्ता येथील तीलजला येथे फॅक्टरी सुरू केली. बोस यांनी छत्री आणि रेनकोट बनवण्याची कंपनी सुरू केली.
के.सी.दास यांची रुची फार्मा मध्ये असल्याने त्यांनी कडुनिंब असलेलं मार्गो साबण आणि Neem Toothpaste हे दोन उत्पादन बाजारात आणले.
कडुनिंब हे नैसर्गिक असल्याने त्याची किंमत ही ब्रिटिश साबणापेक्षा स्वस्त होती. काही दिवसातच के.सी.दास यांनी टॅल्कम पावडर चं उत्पादन सुरू केलं ज्याचं नाव Lavender Dew हे नाव ठेवण्यात आलं.
काही दिवसातच हे तिन्ही प्रॉडक्ट्स लोकांना पसंत पडले होते. काही दिवसातच के.सी.दास यांनी एक्स्पोर्ट करायला सुद्धा सुरुवात केली. वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी दुसरं युनिट तामिळनाडू इथे सुरु केलं.
भारतात तयार होणाऱ्या या उत्पादनामुळे स्वातंत्र्य मोहिमेला खऱ्या अर्थाने एक बळ दिलं. हे बळ फक्त भावनिक नसून आर्थिक सुद्धा होतं. लोकांचा भारतीय उद्योजकांवरचा विश्वास वाढत होता.
पुढील काही वर्ष के.सी.दास हे स्वदेशी मोहिमेसोबत सक्रिय जोडले गेले होते आणि ते तरुणांना नोकरी शोधण्यापेक्षा स्वतः बिजनेस करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन द्यायचे.
स्वतःचा बिजनेस वाढवत असताना त्यांनी स्वदेशी मोहिमेत जोडलेल्या कित्येक तरुणांना ‘परत न घेण्याच्या बोलीवर’ अर्थसहाय्य केलं.
या सर्व सत्कर्म आणि योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयांमुळे आज त्यांनी सुरू केले उत्पादन १०० वर्षांनी सुद्धा अविरत वापरले जात आहेत असं म्हणता येईल.
१९६५ या वर्षी जेव्हा के.सी.दास यांचं निधन झालं त्यावेळी पर्यंत त्यांनी कलकत्ता केमिकल कंपनी आणि त्यांच्या उत्पादनाला या क्षेत्रातील सर्वोच्च कंपन्यांपैकी एक करून ठेवलं होतं.
१९८८ मध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या टॉप ५ साबणांपैकी ‘मार्गो’ हे साबण एक होतं. २००१ मध्ये हा ब्रँड जर्मन कंपनी Henkel ने acquire केला आणि त्याला नव्या पद्धतीने पुन्हा ग्राहकांसमोर आणलं.
आपल्यापैकी प्रत्येकाला अभिमान वाटावा अशीच के.सी.दास यांची ही जीवन कहाणी आहे. हा लेख जास्तीत जास्त नवीन उद्योजकांनी वाचावा अशी आमची इच्छा आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.