Site icon InMarathi

केमिकलयुक्त क्रीम नव्हे, हाताचं “टॅनिंग” काढण्यासाठी हे घरगुती उपाय आहेत १००% उपयोगी!!

anushka sharma inmarathi

charmboard.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपलं कामा निमित्त, सामान खरेदी करण्यासाठी बाहेर फार फिरणं होतं. बाहेरची धूळ, ऊन या सगळ्यामुळे आपल्या त्वचेचे मात्र फार नुकसान होते. हल्ली तर आपल्याला आपल्या त्वचेकडे पुरेसा वेळही देता येत नाही.

ऊन जितके आपल्या शरीरासाठी चांगले आहे, तितकेच त्यातली UV किरणे आपल्या त्वचेसाठी अत्यंत घातक असतात.

उन्हाळ्यात ही उष्णता इतकी वाढते, की शरीराला डीहायड्रेट करण्याव्यतिरिक्त ही उष्णता, आपल्या त्वचेच्या खोलात शिरते. तिथे असलेल्या “मेलेनोसाईट्स” नामक सेल्सना अॅक्टिव करते व त्यामुळे “मेलेनिन” नामक पिगमेंट तयार होतो. या पिगमेंट मुळे त्वचा टॅन होते.

हे टॅनिंग काहीही केल्या निघत नाही. या पासून बचाव करण्यासाठी आपण कित्येक केमिकल्स युक्त क्रीम, सनस्क्रीन वापरतो, पण त्यानेही आपल्या त्वचेला फार काही उपयोग होत नाही.

 

skincancer.org

 

ते काढण्यासाठी आपण, त्वचेसाठी सगळ्यात घातक असलेलं ब्लिचिंग सुद्धा करतो. बाहेरील केमिकल युक्त क्रीम मुळे स्किन एलर्जी होण्याची शक्यता असते.

काही घरगुती टिप्स तुमच्या ह्या समस्येचा नाश करू शकतात हे तुम्हाला माहितेय का? तर या टिप्स जाणून घेऊया…

१) लिंबाचा रस –

 

postsod.com

 

कोमट लिंबाच्या रसात आपले हात बुडवून ठेवल्याने त्यांचे टॅन कमी होते.

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे सायट्रिक अॅसिड युक्त असते. हा रस २० मिनिटे काळवंडलेल्या हातांवर लावा व वळू द्या. त्या नंतर गार पाण्याने हात धुवून घ्या.

लिंबाचा रस लावल्याने त्वचा कोरडी होऊ शकते, त्या मुळे नंतर मॉइश्चरायझ करायला विसरू नका.

 

२) दही व हळद –

 

stepin2mygreenworld.com

 

एक वाटी आंबट दह्यात १ छोटा चमचा हळद घेऊन ते मिश्रण नीट मिक्स करून घ्या. ही पेस्ट आपल्या हातांवर लावा व २० मिनिटे वाळू द्या. त्या नंतर गार पाण्याने नीट धुवून घ्या.

दह्यात प्रोबायोटिक्स असतात, ज्याने त्वचा उजळते व हळद स्किन टोन समान करण्यास मदत करते. याच शिवाय हळद ही औषधी असल्याने त्वचेला होणाऱ्या इन्फेक्शन पासून सुद्धा आपला बचाव करते.

 

३) अॅलोव्हेरा/कोरफड –

 

ayurvedvichar.com

 

कोरफडीचा गर हा त्वचेसाठी एकदम उपयुक्त व औषधी असतो. कोरड्या त्वचेची ओल वाढवण्यासाठी, पोषण मिळवण्यासाठी कोरफड अत्यंत उपयुक्त ठरते.

त्यामुळे कोरफडीचा गर हातांवर लाऊन रात्रभर राहू द्यावा व सकाळी गार पाण्याने धुवून घ्यावा.

कोरफड हे अँटी ऑक्सीडंट्स युक्त असते. जी आपल्या त्वचेला पोषण देते व काळवटपणा घालवते.

 

४) काकडीची पेस्ट –

 

food.ndtv.com

 

एक वाटी काकडीचा रस काढून घ्या व त्यात काही थेंब लिंबाचा रस व एक चमचा हळद घालून याची पेस्ट करून घ्या.

ही पेस्ट हातांवर लाऊन अर्धा तास वळू द्या व गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. काकडीच्या रसाची ही पेस्ट तुमच्या त्वचेला रिफ्रेश करते. हळद व लिंबा मुळे त्वचा उजळते.

 

५) बदामाची पेस्ट –

 

indiamart.com

 

आदल्या रात्री ४-५ बदाम भिजत घाला. सकाळी भिजलेले बदाम वाटून त्याची पेस्ट करा, त्यात साय घाला. हे मिश्रण आपल्या हातांवर रात्रभर लावून ठेवा व सकाळी धुवून घ्या.

बदामात भरपूर व्हिटॅमिन असतात व साय त्वचा मऊ करण्यास उपयुक्त ठरते.

 

६) चंदन व हळदीचे मिश्रण –

२-३ चमचे चंदन पावडर घेऊन, त्यात १ चमचा हळद मिक्स करून घ्या. या मिश्रणाला पेस्ट स्वरूपात आणण्यासाठी हवे तितके गुलाबपाणी घालून पेस्ट बनवून घ्या.

ही पेस्ट ३० मिनिटे आपल्या त्वचेवर लाऊन ठेवा व नंतर स्वच्छ धुवून घ्या.

चंदन व गुलाबपाणी थंड असते व हळद औषधी. यामुळे याने त्वचा टवटवीत राहते व उजळते.

 

७) लिंबाचा रस व पिठी साखर –

 

fitlife.tv

 

अर्ध्या लिंबाचा रस घेऊन त्यात १ चमचा रवाळ अशी पिठी साखर मिक्स करा. हे मिश्रण आपल्या हाताना लावा व हळुवार चोळा.

२० मिनिटे ठेवा व गार पाण्याने धुवून घ्या. फार दाब लावून घासू नका याने त्वचेला भेगा पडू शकतात. पिठी साखरेच्या रवाळ दाण्यांमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात व त्वचा उजळते.

ह्या मिश्रणामुळे, त्वचेवर जर लालसर पणा जाणवला, तरी घाबरण्याचे काही कारण नाही. काही वेळाने तो कमी होते. हे मिश्रण लावल्यावर मॉइश्चायझर न वापरता खोबऱ्याचे तेल वापरावे.

 

८) दही व मध –

 

frontier.com

 

१ वाटी दह्यात १-२ चमचे मध घालून हे मिश्रण आपल्या हाताना लावा. २० मिनिटे ठेऊन धुवून घ्या. दह्यातील प्रोबायोटिक्स मुळे त्वचा उजळते व मधामुळे मऊ होते.

 

९) संत्र्याच्या सलींची पावडर –

 

exportersindia.com

 

संत्र्याच्या सालीच्या पावडरमध्ये मध, गुलाब जल, दूध, हळद, चंदन या पैकी काही ही मिक्स करून ती पेस्ट हाताना लावा.

संत्र्याच्या सलींमध्ये व्हिटॅमिन सी व भरपूर अँटीऑक्सीडंट्स असतात. ज्यामुळे टॅन निघून त्वचा ताजी तवानी, टवटवीत राहते.

घ्यावयाची काळजी –

संत्री येतात त्या वेळेस त्यांची साल टाकून न देता, ती नीट धुवून घ्या. कडक उन्हात नीट वाळवून घ्या. ह्या वाळलेल्या सालींची पावडर करून ती कोरड्या बरणीत नीट भरून ठेवा.

त्यानंतर ही पावडर मध्ये मध्ये उन्हात ठेवावी.

 

१०) कॉफी पावडर व मध –

 

healthline.com

 

२ चमचे कॉफी पावडर घेऊन त्यात १ चमचा मध घाला. हे मिश्रण आपल्या हाताना लावा. १५-२० मिनिटे ठेऊन गार पाण्याने धुवून घ्या. कॉफी पावडर टॅन काढण्यासाठी फार उपयुक्त ठरते.

या व्यतिरिक्त तुम्ही टॅन घालवण्यासाठी काय उपाय करता ते ही आम्हाला नक्की कळवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version