शाहरुख ज्या शैक्षणिक संस्थेचा चेहेरा होता, त्या संस्थेवर एकेकाळी गंभीर आरोप लागले होते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूडच्या सुपरस्टार शाहरुख खानवर सगळ्याच स्तरातून टीका व्हायला सुरू झाली, शाहरुखच्या endorsement वरसुद्धा याचा मोठा परिणाम झाला.
Byju’s या मोठ्या online education प्लॅटफॉर्मचा ब्रॅंड अम्बॅसडर शाहरुख आहे, आणि आर्यनच्या अटकेनंतर लोकांचा दबाव इतका वाढला की त्या ब्रॅंडला शाहरुखवर चित्रित झालेल्या जाहिराती मागे घ्याव्या लागल्या.
सध्या शाहरुख ज्या ब्रॅंडच्या माध्यमातून लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत आहे, तशाच एका मोठ्या ब्रॅंडलासुद्धा शाहरुखने खूप सपोर्ट केला आणि कालांतराने त्या ब्रॅंडचं पितळ उघडं पडलं!
छडी लागे छम छम असं म्हणत आपल्या देशातल्या कित्येक पिढ्या शिकून मोठ्या झाल्या. पण सध्या छडी वगैरे काही नाही. एकंदरच शिक्षण पद्धती बदलली असून शिक्षणाचा बाजार झालेला आपण सगळ्यांनीच पाहिला आहे.
शाळा, कोचिंग क्लासेस, एक्स्ट्रा भाषेचे क्लासेस इत्यादि गोष्टींमध्ये मुलं भरडली जात आहेत. सध्याचे पालक सुद्धा आपल्या मुलाला ह्या रेस मध्ये कसा पुढे ठेवता येईल याकडेच जास्त लक्ष देताना दिसत आहेत, त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास हा खुंटला आहे.
एक काळ असा होता जेंव्हा डॉक्टरकीचं आणि इंजिनियरिंगचं पेव फुटलं होतं, त्यांनंतर काही वर्षांनी मास्टर्स आणि एमबीएचा ट्रेंड चालू झाला, सध्या आर्ट कल्चरकडे झुकण्याचा ट्रेंड आहे.
हे ट्रेंड सारखे बदलतच असतात. Change is the only constant thing हे वाक्य देखील तितकंच खरं आहे!
पण या ट्रेंडमध्ये भरडले जातात ते म्हणजे पालक आणि विद्यार्थी. स्वेच्छेने ट्रेंड फॉलो करणाऱ्या मुलांचा काहीच प्रॉब्लेम नसतो. जी मुलं इतर मुलं फॉलो करतायत म्हणून सुद्धा ते तोच करियर ऑप्शन निवडतात तिथं ती मुलं फसतात आणि नंतर आयुष्याला दोष देत बसतात!
सध्या आपल्या शैक्षणिक धोरणात सरकारने जे बदल केले आहेत ते लवकरात लवकर राबवले गेले पाहिजेत. कारण त्यात बदल होऊन देशातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य चांगलं व्हावं ही अत्यावश्यक गोष्ट आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका बड्या असामी बद्दल सांगणार आहोत जो स्वतः शिक्षण क्षेत्रातला मैलाचा दगड आहे. कित्येक लोकं त्यांना मॅनेजमेंट गुरु वगैरे मानतात. बऱ्याच मोठमोठ्या वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही ह्यांच्या भल्या मोठ्या जाहिराती पाहिल्या असतील.
त्यांचं नाव म्हणजे अरिंदम चौधरी. हे नाव जरी जास्त परिचित नसलं तरी हा चेहरा बऱ्याच लोकांनी पेपर मधल्या जाहिरातींमध्ये किंवा सोशल मीडिया वर पाहिला असेल!
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट (IIPM) चे डायरेक्टर, एक लेखक, आणि फिल्म प्रोड्यूसर अशी ह्यांची ओळख आहे!
त्यांचे वडील मलय चौधरी ह्यांनीच १९७३ मध्ये दिल्ली येथे आयआयपीएम ची स्थापना केली! देशातल्या मोठमोठ्या शहरात ह्या संस्थेच्या एकूण १८ शाखा कार्यरत होत्या.
आपल्या वाडिलांनीच स्थापन केलेल्या IIPM मधूनच अरिंदम ह्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आणि नंतर त्यांनीच तिथे डिन म्हणून काम करायला सुरुवात केली.
केवळ शिक्षण आणि साहित्यच नव्हे तर सिनेमा क्षेत्रात सुद्धा त्यांनी योगदान दिलं असून त्यांच्या काही सिनेमांना राष्ट्रीय पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलं आहे. फक्त हिंदीच नव्हे तर बंगाली भाषेत सुद्धा काही सिनेमे प्रोड्यूस केले आहे.
पण अरिंदम ह्यांची ही इमेज जितकी प्रभावशाली आहे त्याप्रमाणेच कित्येक वादाच्या भोवऱ्यात सुद्धा ते फसले आहेत!
–
- अखेर फटका बसलाच… शाहरुख खानच्या ‘त्या’ जाहिराती आता थांबणार!
- भारतीयांना ऑनलाइन शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या “बायजू’ज्” या ब्रॅंडचा भन्नाट प्रवास!
–
काल २३ ऑगस्ट रोजी टॅक्स इनव्हेजन (टॅक्स वाचवणे) च्या गुन्ह्याखाली अरिंदम ह्यांना अटक करण्यात आली असून. २३ करोड रुपयांचा टॅक्सचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे!
चुकीच्या मार्गाने CENVAT Credit आणि Service tax credit avail केल्याचे आरोप त्यांच्यावर लागले असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे!
दिल्ली आणि इतर शहरात तसेच परदेशात असलेल्या त्यांच्या प्रॉपर्टी वर सुद्धा बरेच प्रश्न उभे रहात आहेत!
याआधी सुद्धा अरिंदम ह्यांच्यावर असे आर्थिक घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत. १४ मार्च २०२० या दिवशी खोटं मिडीकल सर्टिफिकेट सबमीट करण्याच्या आरोपाखाली सुद्धा त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं!
२०१५ मध्ये IIPM ही संस्था बंद झाली. ही संस्था एमबीए ची डिग्री आणि शिक्षण द्यायची. ह्या संस्थेवर बरेच आरोप लागले होते जसे की विद्यार्थ्यांना योग्य सल्ले न देता त्यांची दिशाभूल करणे!
याबाबतीत यूनिवर्सिटी ग्रँट कमिशन (UGC) ने दिल्ली पोलिसांकडे अरिंदम चौधरी आणि आयआयपीएम यांच्याविरुद्ध एक तक्रार दाखल केली होती.
मार्च २०१३ च्या एकॉनॉमिक टाइम्स च्या एका रिपोर्ट च्या अनुसार IIPM ने २०२ करोड रुपयांचा बिझनेस केला होता ज्यातले १२० करोड त्यांनी फक्त जाहिरातींवर आणि प्रमोशन वर खर्च केले होते!
युजीसी च्या तक्रारी नंतर ह्या आयआयपीएम संस्थेवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. आता तिथं कोणत्याही प्रकारचं शिक्षण किंवा पदवीचं शिक्षण दिलं जात नाही. आता ती इन्स्टिट्यूट फक्त ट्रेनिंग आणि रिसर्च साठीच ओळखली जाते!
गुगल वर आयआयपीएम ह्या संस्थेचे फोटो बघाल तर तिथला ताम झाम बघून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल. चुकीच्या बेसिस वर इथं एमबीए ची डिग्री दिली जात असल्याचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी सुद्धा दाखवून दिले आहे!
एकंदरच शिक्षण संस्थेचा अशा प्रकारे बाजार मांडला जाणं हे आपल्यासाठी काही नवीन नाही. पण टॅक्सचा घोटाळा म्हणजे ह्या देशाचा आणि ह्या देशातील इमानदार टॅक्स पेयर्स चा विश्वासघातच आहे!
हे असले प्रकार लवकरात लवकर बंद व्हायला हवेत, आणि तुमच्यापैकी कुणीच ह्या अशा दीखाव्याला बळी पडू नये यासाठी हे सगळं इथे मांडायचा प्रपंच.
यापुढे या अशा जाहिराती पाहून अशा संस्थेत प्रवेश घेताना १० नाही १००० वेळा विचार करा आणि मगच पाऊल पुढे टाका कारण प्रश्न शेवटी तुमच्या भवितव्याचा आहे!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.