' पारदर्शक शौचालय, कोण जाईल याच्या आत? जाणून घ्या यामागची भन्नाट “टेक्नॉलॉजी” – InMarathi

पारदर्शक शौचालय, कोण जाईल याच्या आत? जाणून घ्या यामागची भन्नाट “टेक्नॉलॉजी”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

टेक्नॉलॉजी किती बदलत जाईल याचा काही नेम नाही. मागच्या वर्षी पर्यंत कोणी विचार केला होता का, की लहान मुलं शाळेत न जाता सुद्धा शिक्षण घेऊ शकतात, आपण ऑफिसला न जाता सुद्धा ऑफिसचं काम करू शकतो.

 

online learning inmarathi2

 

टेक्नॉलॉजी जर तुमचा वेळ वाचवत असेल आणि तुमचं काम सोपं करत असेल, तर ती लोकांकडून लगेच मान्य केली जाते. जसं की, वेळ वाचवण्यासाठी बुलेट ट्रेनची निर्मिती करण्यात आली.

वेळ कुठल्याही माध्यमातून वाचत असेल तर नेहमीच त्या गोष्टीचं स्वागत होतं. “वेळेचं महत्व ज्याला कळलं त्याची प्रगती झाली” हे बोललं जातं ते अगदी बरोबर आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जपानच्या एका ट्रेन चालकाचा एक किस्सा आहे. त्या ट्रेन चालकाला ट्रेन एका ठराविक स्टेशनला पोचवण्यासाठी दीड मिनिट उशीर झाला होता. या गोष्टीचा त्याला खूप वाईट वाटलं होतं. त्याने या गोष्टीची माध्यमांसमोर येऊन जाहीर माफी मागितली होती.

यावरून जपानी लोक वेळेचा किती आदर करतात हे लक्षात येतं. जपानची प्रगती ही केवळ त्यांच्या शिस्तप्रिय स्वभाव आणि वेळेची कदर करण्याची वृत्ती असल्याने झाली आहे हे आपण सगळे मान्य करतो.

 

japnese office inmarathi

 

लोकांचा वेळ वाचवण्यासाठी त्यांनी अजून एक टेक्नॉलॉजी समोर आणली आहे. ती अशी आहे :

अनेकदा आपण घराबाहेर असताना सार्वजनिक शौचालय वापरण्याची वेळ येते. बऱ्याचदा इथे खूप वेळ वाट पहावी लागते. अस्वच्छता असते.

भारतात तर सार्वजनिक स्वच्छतागृह हा वादाचा मुद्दा आहे. सरकारकडून सार्वजनिक स्वच्छतागृह उभारली जातात, मात्र त्याच्या स्वच्छतेची, व्यवस्थापनाची दखल गेतली जात नाही. अर्थात यामध्ये त्याचा वापर करणा-या नागरिकांचाही दोष आहे हे मान्य करायलाच हवे.

 

toilet inmarathi

 

तेथिल अस्वच्छता, वाहते पाणी, दुर्गंधी यांमुळे अनेकजण शौचालयात जाण्यास नकार देतात.

ही समस्या केवळ भारतात नाही तर अनेक देशांत आहे.

यावर उपाय म्हणून जपानने एक युक्ती शोधून काढली आहे.

सार्वजनिक शौचालयामध्ये त्यांनी टेक्नॉलॉजी वापरली आहे, ज्यामुळे कोणी एक व्यक्ती सार्वजनिक शौचालय वापरत असेल, तर तुम्हाला दुरूनच ते कळेल. हे कसं शक्य आहे ?

आर्किटेक्ट Shigeru Ban यांच्या फर्मने एक संकल्पना समोर आणली आहे, ज्यामुळे टोकियो शहरातील सार्वजनिक शौचालय हे लोकांना क्षणभर चकित आणि मग कौतुक करण्यास भाग पाडत आहे.

सार्वजनिक शौचालयामध्ये जातांना आपण दोन गोष्टींची काळजी करत असतो. एक तर, स्वच्छता आणि दुसरं म्हणजे आतमध्ये कोणी आहे की नाही.

ही नवीन सार्वजनिक शौचालयं अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहेत की, तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं दुरूनच मिळतात. कारण, त्यांनी ही सार्वजनिक शौचालयं ही पारदर्शक केली आहेत. काय? पारदर्श ? होय.

japan transparent toilet inmarathi

 

शौचालय हे पूर्णपणे पारदर्शक काचेने तयार करण्यात आलं आहे.

कोणतीही व्यक्ती जेव्हा शौचालयत जाते आणि दरवाजा लॉक करते. तेव्हा शौचालयाच्या भिंती या पारदर्शक न राहता त्यावर एक डार्क फिल्म तयार होते आणि त्यावरून लक्षात येतं, की शौचालय कोणीतरी वापरत आहे.

दरवाजा जोपर्यंत लॉक होत नाही तोपर्यंत या काचेला पारदर्शक ठेवलं जातं आणि दरवाजा लॉक झाला, की ही काच पारदर्शक राहत नाही. अशी टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे.

 

japan transparent toilet inmarathi2

 

निप्पोन फाउंडेशनची ही निर्मिती आहे. या कंपनीला टोकियो टॉयलेट प्रोजेक्ट हा देण्यात आला आहे. ही कंपनी तुम्ही कधीही पाहिले नसतील असे टॉयलेट्स बनवण्याच्या प्रोजेक्ट वर काम करत आहे.

या प्रोजेक्टनंतर टोकियो मधील रहवासी हा अनुभव घेण्यासाठी खास करून संध्याकाळी गार्डनला भेट देत आहेत. टॉयलेटमुळे कोणत्यातरी गार्डनचं सुशोभीकरण झालं आहे अशी ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

आर्किटेक्ट Ban यांच्या वेबसाईट वर या टॉयलेटला कंदील म्हणून नाव देण्यात आलं आहे. या प्रोजेक्टवर जपानमधील १६ नामवंत आर्किटेक्टस नी एकत्र येऊन काम केलं आहे.

सध्या निप्पोन फाउंडेशन हे शिबुया शहरातील १७ नवीन प्रोजेक्ट वर काम करत आहे. यामध्ये काही सरकारी प्रोजेक्ट आहेत तर काही खासगी.

 

japan transparent toilet inmarathi1

 

जपानच्या या टॉयलेट मध्ये अजून एक सोय आहे ती म्हणजे, कमोडवर एक बटन देण्यात आलं आहे, जे दाबलं की कमोडची सीट ओपन होते आणि थंडीच्या दिवसात सीट गरम राहील याची सुद्धा काळजी घेण्यात आली आहे.

हे सर्व शक्य आहे याचं कारण म्हणजे जपानची स्वच्छता, नवीन डिझाईन आणि लोकांना चांगली सेवा देण्याबद्दल असलेली ओढ हेच म्हणावं लागेल.

टेक्नॉलॉजीसाठी आपण नेहमी दुसऱ्या देशांकडे बघतो आणि मग ते आचरणात आणायचा प्रयत्न करतो. काही वर्षात हे चित्र बदलेल आणि आपण सुद्धा अशा innovative गोष्टींचे जनक असू अशी आशा करूयात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?