शब्दशः “दुसऱ्याच्या खांद्यावर” ठेवून वापरली जाणारी सगळ्यात मोठी शॉट गन!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
“दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून गोळी मारणे” ही म्हण आपल्याला माहीत आहे. काही लोक तसं वागतात सुद्धा. पण, अशी खरी बंदुक तुम्ही कदाचित बघितली नसेल. Punt Gun असं या बंदुकीचं नाव होतं.
अमेरिकेतील बदकांची संख्या या पंट गन मुळे खूप कमी झाली होती. मोठं शस्त्र किंवा लांब बंदुक म्हणजे ती अपेक्षित काम करेलच अशी एक धारणा असते. प्रत्येक वेळी ती योग्य होईलच असे नाही.
पंट गन च्या बाबतीत मात्र ते खरं ठरत होतं. पंट गन चा समोरचा भाग खूप लांब होता आणि त्यामुळे ती योग्य निशाणा लावण्यास नेहमीच उपयुक्त ठरायची. ती इतकी accurate होती की, प्राणी संरक्षणार्थ पंट गन वर बंदी आणावी लागली होती.
गरज काय होती?
१८ व्या शतकाच्या सुरुवातीला बदकांची शिकार ही कायद्याने मान्य होती. मांसाहार करणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. त्या सोबतच अमेरिकेत स्त्रियांच्या टोपी मध्ये लावण्यासाठी बदकांच्या पिसाची मागणी असायची.
बदकांची शिकार करणं हे इतर प्राण्यांसारखं सोपं नव्हतं. एक कारण की ते पाण्यात असतात आणि सतत हलत असतात.
या प्रश्नावर तोडगा म्हणून आणि एकावेळी जास्तीत जास्त बदक मारता यावेत यासाठी शिकारी लोकांनी पंट गन चा शोध लावला होता.
रचना कशी होती?
पंट गन चा समोरचा भाग हा आठ फुट लांब होता आणि त्याचे गन पॉईंट्स हे दोन इंच इतका परीघ असलेले होते. बंदुकी मध्ये एक अशी सोय होती की, ट्रिगर केल्यावर गोळी ही प्रचंड वेगाने आणि एका विशिष्ट झटक्याने समोर जायची.
शिकारी लोकांसाठी ही पंट गन स्वस्त सुद्धा होती. कारण, एक पाउंड किमतीच्या गोळी मध्ये जवळपास ५० बदक मारले जायचे आणि बदक हे पाण्यावरच तरंगायचे. शिकारीला बदकांना शोधत बसायची सुद्धा गरज नसायची.
पंट गन ही सामान्य बंदुकीपेक्षा प्रचंड मोठी दिसायची आणि तिला सरळ हातात धरून शिकार करणे हे सुद्धा शक्य नसायचं.
त्यासाठी शिकारी एक तर छोट्या होडीत पंट गन ला ठेवून शिकार करायचे किंवा दोन जण असतील बंदुकीच्या समोरच्या आठ फुट लांब भागाला सपोर्ट म्हणून दुसऱ्या व्यक्तीचा खांदा वापरायचे.
पंट गन मध्ये एक आणि दोन असे बॅरल असायचे. एक बॅरल असलेल्या बंदुकीचा जास्त वापर केला जायचा. कारण, एक बॅरल असलेल्या बंदुकीचा स्पीड दोन बॅरल असलेल्या बंदुकीपेक्षा जास्त होता.
बंदुक ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या होडीमुळे या बंदुकीला पंट गन असं नाव पडलं. ह्या होड्या लांब होत्या आणि त्यामध्ये बंदुक ठेवायला आणि एक माणूस बसून शिकार करू शकेल इतकी जागा होती.
पंट गन ही इतकी शक्तिशाली होती की, एक गोळी मारली की ती होडी मागच्या दिशेला सरकायची. शिकारी लोकांनी काही दिवसातच एक अशी पद्धत तयार केली ज्याने त्यांचा नफा वाढला.
शिकारी हे ८ ते १० होडींचा एक ग्रुप करू लागले आणि जिथे बदकांची संख्या जास्त आहे तिथे ते जमायचे. त्या सर्वांमध्ये खूप जबरदस्त co-ordination होतं. ते एकाच वेळी, सगळे जण हिट करायचे. एका वेळी त्यांना ५०० बडकं त्यांना मिळायचे.
पंट गन चं डिझाईन फार काळ अस्तित्वात राहिलं नाही. त्याला तयार करणाऱ्या कंपनी ला देखील एक बंदुक तयार करायला लागणारी मेहनत ही परवडण्यासारखी नव्हती. शिवाय, तयार झाल्यावर एका ठिकाणी स्टोअर करायला जागा सुद्धा खूप लागायची.
सर्वात महत्वाचं, बदक आणि इतर जलचर प्राणी हे नामशेष होत चालले होते.
अमेरिकन सरकारने याची दखल घेतली आणि त्यांनी एक असा कायदा पास केला ज्याने बदकांची सामूहिक शिकार आणि या पंट गन ची वाहतूक या दोन्ही गोष्टी अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आल्या.
१९०० ते १९१८ या काळात असे बरेच नियम लावण्यात आले ज्याने पंट गन आणि त्याला लागणारी होडी या दोन्ही गोष्टींवर बंदी घालण्यात आली. पंट गन चा वापर बंद केल्यानंतर सुद्धा प्राण्यांमध्ये त्याची भीती होती असं बोललं जातं.
कारण, बदकांची प्रजातीची लोकसंख्या अचानक खूप कमी झाली होती. सरकार आणि प्राणीमित्र यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील होते.
पंट गन ही आज फक्त एक शोभेची वस्तू आहे. संपूर्ण जगात सध्या १०० पंट गन जतन करून ठेवल्या आहेत. अमेरिकेत ज्या लोकांना बंदुक जमा करण्याची हौस आहे त्यांनी त्यांच्या शो केस मध्ये आजही पंट गन ला जागा दिली आहे.
इंग्लंड मध्ये पंट गन ला आजही भरपूर डिमांड आहे. इंग्लंड मध्ये जवळपास ५० पंट गन सध्या वापरात आहेत. शिकारी पेक्षा त्यांचा वापर जास्त करून शोभेसाठी होतो.
संपूर्ण देशात पंट गन च्या वापरावर बंदी कायम आहे. पंट गन चा वापर हा जास्त करून राजेशाही समारोहात केवळ प्रदर्शनासाठी केला जतो.
१८९७ मध्ये व्हिक्टोरिया क्वीन च्या ७५ व्या जन्मदिवसाच्या समारोहात त्यांच्या विनंतीवरून पंट गन च्या आवाजाची सलामी देण्यात आली होती. त्या नंतर प्रत्येक राज्याभिषेक आणि वाढदिवसाच्या प्रसंगी पंट गन च्या सलामी ची प्रथा ब्रिटन सरकार ने सुरू ठेवली आहे.
२०१२ मध्ये एलिझाबेथ २ च्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी २१ गोळ्या हवेत मारून पंट गन ची सलामी देण्यात आली होती.
कोणत्याही खेळासाठी किंवा शिकारीसाठी असे उपकरण तयार करणे हे प्राण्यांचा विचार केला तर चुकीचंच आहे. तुमचे शस्त्र हे तुमच्या संरक्षणासाठी असावेत केवळ दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी नाही.
अश्या गोष्टी काही काळ लोकांना आवडतात. पण, त्यांचा समाजातील उपयोग बघितल्यावर कोणतंही सरकार अश्या शस्त्राला हद्दपार करेल हे नक्की.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.