आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
२००८ साली वैभव तिडके या बीडच्या तरुणाने सौर वाळवण यंत्र अर्थात Solar Conductor Dryer तयार केले होते. आपल्या शेतीप्रधान देशात शेतीच्या प्रगत तंत्रज्ञानाअभावी दरवर्षी तब्बल ६० लाख दशलक्ष टन फळे-भाजीपाल्याची नासाडी होत असते.
याच समस्येने वैभव तिडके व त्यांच्या सहकारी मित्रांना संशोधन करण्यास प्रवृत्त केले आणि त्यातूनच नाशवंत म्हणून अल्प काळ टिकण्याची क्षमता असलेल्या फळे आणि पालेभाज्यांना किमान वर्षभर सुरक्षित ठेवता येईल या हेतूने त्यांनी सौर वाळवण यंत्र विकसित केले.
वैभव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सायन्स फॉर सोसायटी (S4S) या तंत्रज्ञान संस्थेच्या नावाखाली या यंत्राचा प्रसार केला आणि आज S4S या संस्थेने जगभरात आपले पाय रोवले आहेत.
वैभव हा गावात वाढलेला होता त्यामुळे शेतीमधील संकटांना त्याने जवळून पहिले होते. त्यापैकी एक संकट म्हणजे परिपूर्ण साठवण यंत्रणा नसल्याने ताजा माल खराब होणे!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – एक असा मराठी माणूस जो सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती म्हणून ओळखला जातो!
–
पण आता वैभवच्या वाढणी यंत्रामुळे काढणी पश्चात काही दिवसांत नाशवंत होणारी फळे-पालेभाज्या, त्यांचा रंग, सुगंध, पौष्टिक तत्त्व सुरक्षित ठेवून एक वर्षांपर्यंत साठवून ठेवता येतात.
वैभवचे संशोधन पूर्ण झाल्यावर त्याने ते बाजारात उतरवले. तेव्हा बाजारात विजेवर चालणारी अनेक वाळवण यंत्रे उपलब्ध होती.
पण ती शेतकऱ्यांना परवडत नव्हती. एक किलो भाजी वाळविण्यासाठी ५० ते १०० रुपये खर्च यायचा. त्यामुळे संपूर्ण सौरऊर्जेवरील वैभवचे वाळवण यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरले.
या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ३५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस मिळाले होते. तसेच वैभवची सहकारी शीतल सोमाणी हिला विशेष सादरीकरणास ५० हजारांचे बक्षीस मिळाले होते.
या विजयामुळे वैभवच्या संशोधनाला आणि S4S संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.
याचा शेतकऱ्यांना अजून एक फायदा म्हणजे बाजारात भाव नसताना शेतकरी माल साठवून ठेवून भाव आल्यास त्याची विक्री करू शकतात, जेणेकरून त्यांना नुकसान सहन करावे लागत नाही.
आता हेच यंत्र जवळपास ८ देशांतील १२०० ठिकाणी बसवण्यात आले आहे. ते ८ देश म्हणजे- फ्रान्स, जमैका, नेपाळ, व्हिएतनाम, श्रीलंका, केनिया, बांगलादेश आणि भारत!
–
हे ही वाचा – मराठी भावांची ‘किमया’! आता आंबा, कोकमापासून बनवली जातीये झक्कास बिअर
–
वैभव आणि त्याचे सहकारी एवढ्यावरच थांबले नाहीत तर आता त्यांनी FooDer नावाचे अजून एक यंत्र विकसित केले आहे. हे देखील सौरउर्जेवर चालणारे असून घरगुती वापरासाठी अतिशय योग्य आहे.
हे यंत्र घरगुती फळे आणि भाज्यांमधील आर्द्रता शोषून घेते जेणेकरून पदार्थ जास्त काळ टिकला पाहिजे. हे FooDer यंत्र म्हणजे Solar Conductor Dryer चे संक्षिप्त रूपच आहे.
अश्या काही प्रेरणादायी आणि मान उंचावणाऱ्या गोष्टी जणू हेच सांगतात की, मराठी उद्योगाचे सुवर्णयुग जास्त दूर नाही!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.