Site icon InMarathi

या ७ गाजलेल्या केसेस सीबीआय बद्दल आपल्या मनात विचित्र गुंता तयार करतात!

deshmukh cbi inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नीरज पांडे दिग्दर्शित अक्षय कुमार अनुपम खेर ह्यांचा स्पेशल २६ हा सिनेमा आठवतो का? कशाप्रकारे काही वर्षांपूर्वी नकली सीबीआय टीम घेऊन काही लोकांनी मोठमोठ्या नेत्यांवर, उद्योजकांवर रेड टाकून बराच काळा पैसा चोरला होता.

त्या वेळेस ही केस खूप गाजली होती. त्याप्रमाणेच हा सिनेमा सुद्धा खूप चर्चिला गेला. “हम सीबीआय से आये है” हे एक वाक्य ऐकताच भल्या भल्यांना कसा घाम फुटत असे हे आपण त्यातून पाहिलंच असेल!

मागील वर्षापासून सीबीआय हे नाव पुन्हा चर्चेत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपुतचा रहस्यमय मृत्यू. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ही केस सीबीआयकडे सुपूर्त केली.

ह्या केस मध्ये मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार यांच्यावर वेगवेगळे आरोप लागले आहेत. अपघाती मृत्यू असून देखील त्याला आत्महत्येचं वळण दिलं गेलं आणि आपल्या समोर अशा कित्येक चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्या!

आणि हे सगळं प्रकरण मीडिया ने खासकरून अरणब गोस्वामी ह्याच्या रिपब्लिक टीव्ही ह्या चॅनल ने धरून ठेवलं. देशभर #justiceforsushant #CBIforSSR अशी कॅम्पेन चालवली गेली. 

मात्र आता CBI चं नातं थेट गृहमंत्र्यांशी जोडलंं गेलं आहे. या चक्रव्ह्युहात आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडकले आहेत.

अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप, अधिकारी रश्मी शुक्लांची या प्रकरणातील वादग्रस्त एन्ट्री या प्रकारे सुरु झालेल्या या गदारोळात अखेर CBI कडून देशमुखांच्या चौकशीचे आदेश मिळताच देशमुखांनी स्वच्छेने गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले.

 

 

 

पण हे सीबीआय म्हणजे नेमकं काय हो? आणि ह्या सीबीआय ला इतकं महत्व का दिलं जातं ते आपण जाणून घेऊ. शिवाय आजवर सीबीआय कडे कोणत्या केसेस दिल्या गेल्या आणि त्यात पुढे काय प्रगती झाली हे सुद्धा आपण ह्या लेखातून जाणून घेणार आहोत!

खरंच सीबीआय ही सक्षम आहे का? त्यांच्या कामात सुद्धा काही त्रुटि आहेत का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा आपण प्रयत्न करूया!

सीबीआय म्हणजेच सेंट्रल ब्यूरो ओफ इनवेस्टिगेशन. प्रामुख्याने आर्थिक घोटाळे, स्पेशल क्राईम्स, भ्रष्टाचार आणि तत्सम हाय प्रोफाइल केसेस ची चौकशी करण्याचे काम सीबीआय करते. 

शिवाय खून, अपहरण, आतंकवाद यांच्याशी संबंधित केसेस सोडवण्यात सुद्धा सीबीआयचा हातखंडा आहे. भारताची एक डेकोरेटेड एजन्सी म्हणूनच सीबीआय कडे पाहिलं जातं!

जोवर केंद्र सरकार आदेश देत नाही तोवर सीबीआय कोणत्याही केस मध्ये लक्ष घालत नाही. सीबीआय कडे जेंव्हा एखादी केस सोपवली जाते तेंव्हा सुद्धा त्यांना केंद्र सरकारलाच रिपोर्ट करावे लागते.

कोणतंही राज्य सरकार ह्यांच्या कामात अडथळा आणू शकत नाही किंवा कोणतीही लुडबूड खपवून घेतली जात नाही!

 

 

आपण कित्येक सिनेमांमधून ह्या एजन्सी चं वेगवेगळं चित्र पाहिलं असेल. सीबीआय कशी चौकशी करते, एखाद्या गुंतागुंतीच्या केस मध्ये सुद्धा खूप माहिती काढून ती केस कशी सोडवते हे आपण चित्रपटातून पहिलं आहेच.

आज आपण सीबीआय च्या अशाच काही केसेस बद्दल माहिती घेणार आहोत. ज्या सोडवताना काही केसेस मध्ये त्यांना यश आलं तर काही केसेस मध्ये सीबीआय वरच भ्रष्टाचारासारखे आरोप लागले.

यातून नेमका तोडगा काय निघाला, सीबीआय ने ती केस सोडवली का ते प्रश्न अनुत्तरितच राहिले हे आपण जाणून घेऊया!

 

१. २ जी स्पेक्ट्रम स्कॅम :

 

 

हा देशातला युपीए सरकारच्या करकीर्दीतला सर्वात मोठा घोटाळा होता. आजही लोकं ह्याची आठवण काढतात तेंव्हा त्यांच्या समोर कित्येक प्रश्नचिन्ह उभी राहतात. मनमोहन सिंग ह्यांच्यापासून कित्येक मोठमोठ्या लोकांवर वेगवेगळे आरोप लागले होते.

आणि मग ही केस सीबीआय कडे सुपूर्त करण्यात आली. सीबीआय ने चौकशी करुन वेगवेगळ्या आरोपांच्या अंतर्गत लाखों पानांचा रोपोर्ट आणि चार्जशीट फाइल करून सुद्धा पुढे त्याचं काहीच झालं नाही.

या दरम्यान जितक्या लोकांना अटक केली गेली त्यापैकी बहुतेक सगळ्यांनाच क्लीन चिट देऊन सोडले गेले. त्यांच्यात पूर्व दूरसंचार मंत्री ए. राजा हे प्रतिष्ठित नाव सुद्धा सामील होतं!

हे ही वाचा – देशसुरक्षेसाठी झटणा-या CID आणि CBI या Investigating Agencies मधला फरक तुम्हाला नक्कीच ठाऊक नसेल!

२. सत्यम स्कॅम :

 

 

कॉम्प्युटर सर्व्हिस मधला सर्वात मोठा स्कॅम हा खरंतर सीबीआय मुळे उघडकीस आला. अकाऊंटिंग आणि ऑडिटिंग रिलेटेड हा सर्वात मोठा घोटाळा होता.

सीबीआय ने केलेल्या कामामुळे ह्यातले प्रमुख रामलिंगा राजू आणि त्याच्या दोन भावांना ७ वर्षे करवासाची शिक्षा ठोठावली गेली!

२००९ च्या पब्लिक ऑक्शन मध्ये सत्यम कॉम्प्युटर्स चे ४६ % शेअर्स महिंद्रा ह्या कंपनीने घेऊन सत्यम टेक ओव्हर केली.

 

३. बोफोर्स स्कॅम :

 

 

८० आणि ९० च्या दशकात भारत स्वीडन यांच्यात झालेल्या शस्त्रांच्या कॉन्ट्रॅक्ट मुळे झालेला बोफोर्स घोटाळा कुणीच विसरू शकत नाही. हा घोटाळा तत्कालीन सरकारसाठी खूप घातक ठरला.

व्हि. पी सिंग हे राजीव गांधी यांच्या कॅबिनेट मधून राजीनामा देऊन बाहेर पडले. दोन देशांच्या मध्ये होणाऱ्या शस्त्रांच्या व्यापारातून होणारा भ्रष्टाचार असं सगळंच यातून उघड झालं.

याचा तपास सुद्धा सीबीआय कडूनच केला गेला. त्यावेळच्या सीबीआय टीमवर सुद्धा खूप आरोप लागले. प्राथमिक रिपोर्ट रजिस्टर न करणे, हाय कोर्टाच्या जजमेंट वर पुढे अपील न करणे असे कित्येक आरोप सीबीआय वर लागले.

 

४. प्रियदर्शनी मर्डर केस :

 

 

प्रियदर्शनी मट्टू ह्या स्टुडंट वर तिच्याच घरी झालेल्या रेप आणि मर्डर च्या घटनेने सगळेच हादरून गेले होते. ह्यातील प्रमुख आरोपी संतोष सिंह हा उच्च पदस्थ आयपीएस ऑफिसरचा मुलगा सामील होता!

सीबीआय ने खरच खूप उत्तम मेहनत घेऊन ही केस सोडवली आणि आरोपीला शिक्षा सुनावली गेली. पण नंतर त्याची शिक्षा कमी करून जन्मठेप सुनावली गेली तेंव्हा प्रियदर्शनीच्या वडिलांनी निराशा व्यक्त केली!

पण सीबीआय ला ह्यामध्ये सामील करून घेतल्याने ह्या प्रकरणाचा छडा लागून ते लवकर बंद सुद्धा झाले!

 

 

५. सोहराबुद्दीन केस :

 

 

सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर केस ही गुजरात मधली सर्वात हाय प्रोफाइल केस समजली जाते. सोहराबुद्दीन चे संबंध पाकिस्तानी आतंकवादी संघटनांशी असल्याचे पोलिसांकडून सांगितले गेले होते.

शिवाय बऱ्याच मोठमोठ्या लोकांची नावं यात गोवली गेली. हे एन्काऊंटर फेक असल्याची सुद्धा चर्चा होतीच. सध्याचे गृह मंत्री अमित शहा ह्यांना सुद्धा या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न कॉँग्रेस सरकार कडून करण्यात आला.

आणि ह्यात सीबीआय चा सुद्धा हात असल्याचे आरोप लागले होते. डिसेंबर २०१४ मध्ये कोणताही पुरावा नसल्यामुळे अमित शहा ह्यांना क्लीन चिट दिली गेली! 

ह्या प्रकरणातून सीबीआय बद्दल बऱ्याच उलट सुलट गोष्टी बोलल्या गेल्या आणि त्यांची प्रतिमा आणखीन मलिन झाली!

 

६. अभया मर्डर केस :

 

 

केरळ मधील विहिरीत सापडलेल्या अभया ह्या कॅथलिक सिस्टरच्या मर्डरची केस सुद्धा खूप गाजली होती. ह्या केस म्हणजे सर्वात जास्त काळ चाललेली इनवेस्टिगेशन म्हणून सुद्धा ओळखली जाते!

ही एक सर्वात गुंतगुंतीची केस आहे. स्टेट पोलिस, तसेच सीबीआय टीम यांनी लोकांच्या दबावाखाली बरीच माहिती गोळी केली, आणि २००८ मध्ये २ कॅथलिक पाद्रीना अटक करण्यात आली.

 

७. आरुषी तलवार केस :

 

 

आजवर भारतात सर्वात जास्त गाजलेली डबल मर्डर केस जीने सामान्य माणसांच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण केली. घरातल्या नोकरांच गैरवर्तन आणि त्यातून होणारं दुहेरी हत्याकांड प्रकरण हे आजवर न उलगडलेलं कोडच आहे.

ही केस सुद्धा पहिले लोकल पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट केली. पण पोलिसांच्याच निष्काळजीपणामुळे ही केस नंतर सीबीआय कडे सोपवण्यात आली. पुढे सीबीआयने सुद्धा ह्या केसचा अभ्यास केला.

त्यातही बरेच वाद झाले. २ वेगवेगळ्या सीबीआय टीमची टिप्पणी ऐकून Circumstantial Evidence च्या बेसिस वर आरुषी च्या आई – वडिलांनाच यात दोषी करार देऊन शिक्षा ठोठावली गेली.

मेघना गुलजार हिने ह्या केस वर तलवार नावाचा सिनेमा काढला होता. ह्या केस मुळे सुद्धा सीबीआय ची खूप नाचक्की झाली!

सीबीआयच्या म्हणण्यानुसार त्यांचा Conviction rate हा सरासरी ६५ % आहे. म्हणजे सीबीआय कडे येणाऱ्या केसेस पैकी  ६५ % केसेस मध्ये योग्य निकाल लागून गुन्हेगाराला शिक्षा मिळते.

 

 

पण काही तज्ञांच्या अभ्यासानुसार हा रेट सीबीआयच्या छोट्या मोठ्या केसेस बाबतचा आहे. देशातल्या सर्वात मोठ्या हाय प्रोफाईल केसेसच्या बाबतीत सीबीआय चा Conviction rate हा फक्त ३ % इतकाच आहे. 

ह्या सगळ्या आकडेवारी आणि माहिती वरून सीबीआय हाय प्रोफाइल केसेस मध्ये कमी का पडते हे समजते. शिवाय पोलिटिकल प्रेशर मुळे सुद्धा काही निर्णय सीबीआय इच्छुक असून घेऊ शकत नाही!IN

पण सीबीआय ने हवाला घोटाळा, सत्यम स्कॅम अशा कित्येक केसेस फार शिताफीने सोडवल्या. त्यामुळे काही केसेस च्या अपयशावरून सीबीआय सारख्या प्रतिष्ठित एजन्सीला नावं ठेवणं योग्य नाही!

सीबीआय त्यांच्या मार्गाने सुशांत सिंग राजपूत च्या केस चा छडा लावतीलच. पण आपण त्यांना आणि त्यांच्या कार्यप्रणालीला नावं  ठेवणं उचित दिसत नाही!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version