' गेल्या आठ वर्षांपासून सीबीआयची “जादू” दाभोलकर केसमध्ये अपयशी? – InMarathi

गेल्या आठ वर्षांपासून सीबीआयची “जादू” दाभोलकर केसमध्ये अपयशी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आठ वर्षांपूर्वी शिक्षणाचं, कलेचं माहेरघर असलेल्या पुण्यात एक अविवेकी घटना घडली होती. २० ऑगस्ट २०१३ चा दिवस उजाडला तोच एका खुनशी प्रवृतीने…

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, मात्र ती हत्या व्यक्तीची होती, विचारांची, विवेकाची की दाभोलकारांच्या मार्गावर चालू पाहणाऱ्या अनेक संयमी पावलांची?

यातून एक प्रश्न निर्माण झाला आणि त्यानंतर अनुत्तरीत प्रश्नांचं वादळ सुरु झालं.

 

dabholkar inmarathi

 

“दाभोलकर गेले पण तरी त्यांचे विचार आजही रुजलेत” या  वाक्याने स्वतःचं समाधान करणाऱ्यांना एकदा तरी ही घटना का घडली, त्यामागची मनोवृत्ती काय असेल? दाभोलकरांना संपवणा-यांना नेमकं काय मिळालं? असे प्रश्न न पडणं हेच मुख्यतः खेदजनक आहे.

मात्र या घटनेपेक्षाही भयावह बाब म्हणजे त्यानंतर सुरु झालेलं तपासचक्र!

पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घटना घडली यावरूनच पुणे पोलिसांवर टिकेची तोफ डागली गेली. त्यानंतरही पोलिसांच्या हाती ठोस पुरावे न लागल्याने अखेरीस  गुन्ह्याचा तपास कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयकडे देण्यात आला.

सीबीआयने या गुन्ह्यांचा कसून तपास केला. त्यानंतर त्यानंतर विरेंद्रसिंह तावडेसह डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार करणारा सचिन अंदुरे, शरद कळसकर, अमित दिगवेकर, अमोल काळे, राजेश बंगेरा यांच्यासह इतरांना अटक केली. या गुन्ह्यातील पिस्तुलदेखील जप्त केले.

 

dabholkar 1

 

मात्र, अद्यापही या गुन्ह्याचा ‘मास्टरमाइंड’ शोधण्यात सीबीआयला यश येत नसल्याने घटनेनंतर आठ वर्षांनंतरही पहिले पाढे पंचावन्न अशीच गत झाली आहे.

ऐरवी दाभोलकरांविषयी तोंडातून ब्र न काढणाऱ्यांची लेखणी मात्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतिदिनाला सोशल मिडीयावर व्यक्त होण्यासाठी मागच्या वर्षी सरसावली होती मात्र यावर्षी त्यांना विसर पडलेला दिसतोय.

 

dabholkar inmarathi 1

 

शरद पवार यांनी मागच्या वर्षी तरी कोपरखळ्या मारत आपले मत मांडले होते, मात्र या वर्षी फक्त त्यांनी फक्त त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.

 

dabholkar 1 inmarathi

 

जयंत पाटील यांनी देखील केवळ पुण्यतिथीबद्दलचे विनम्र अभिवादन करणारे ट्विट टाकत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे, मात्र त्यात तपासाचा कुठेही उल्लेख दिसत नाही.

राजकीय व्यक्तींपासून ते थेट माध्यम क्षेत्रातील अनेक तज्ञांमध्ये मागे शाब्दिक हाणामारी रंगली होती. मात्र यामध्ये मुळे दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा मुद्दा काहीसा बाजूला राहिला असून सीबीआयला लक्ष्य केलं जात होत.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येची जबाबदारी कोर्टाने सीबीआयच्या खांद्यावर सोपवली होती, विरोधकांनी राज्य शासनाला आपल्या टिकांनी जेरीस आणलं होतं. मात्र इतर कोणत्याही केसप्रमाणे सुशांतची आत्महत्या, त्याला जबाबदार कोण? बॉलिवूडचा ड्र्ग्स विळखा, ड्रग माफिया कोण? या विषयांकडे पद्धतशीरपणे डोळेझाक केली गेली. 

‘आता तरी सुशांत सिंग राजपुतला न्याय मिळेल’ असं म्हणत ज्या सीबीआयवर आपण अवलंबून होतो, मात्र त्यातही ते सपशेल अपयशी ठरले, त्याच सीबीआयला “आठ वर्षांनंतरही दाभोलकरांच्या खऱ्या मारेकऱ्याला पकडण्यास यश मिळत नाही की सवड नाही” अशी टिकांनी मागे सोशल मिडीयावर गर्दी केली होती..

काही दिवसांपूर्वी बंगाल निवडूणुकींचा धुराळा उडाला भाजपने जिंकून येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले मात्र त्यांना हवे तितके यश जरी नाही मिळाले तरी ज्या बंगालमध्ये फक्त ममता दीदींच्या पक्षाचे वर्चस्व होते त्याच पक्षाला शह देण्यात भाजप नक्कीच यशस्वी झाले आहेत.

निवडणुका संपल्या नंतर मात्र बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार वाढला होता ज्यात अनेक लोकांचा नाहक बळी गेला तसेच बलात्कार देखील झाले आहेत. हाय कोर्टने निवडणूक आयोगाला जबाबदार ठरवले आहे तसेच त्यांच्यावर ताशेरे देखील ओढले. कोर्टाने तातडीने या केसेस सीबीआयच्या हवाली केल्या आहेत.

दाभोलकरांच्या कन्येने आपला शोक ट्विटमधून करत, सूत्रधार अद्याप मोकाट इतक्याच शब्दात आपली खंत व्यक्त केली आहे.

 

dabholkar inmarathi

 

काही नेते मंडळी, आघाडीचे पत्रकार यांना दाभोलकरांच्या आठव्या स्मृतीदिनाचा बहुदा विसर पडला असेल कारण कोणत्याही प्रकारचे ट्विट त्यांनी केलेले नाही.

डॉ. दाभोलकरांच्या मारेक-याला लवकरात लवकर जेलबंद करण्याची मागणी केली जात असली, तरी आणखी किती वर्ष याच विषयावर चर्चा करावी लागणार हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.

 

pansare dabholkar inmarathi
newindianexpress.com

 

दाभोलकर जादूटोणा अंधश्रद्धा विरोधक होते, त्यासाठी ते आयुष्यभर झटले, मात्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणारी सीबीआयला  सुशांत सिंग राजपुत ,कलबुर्गी, गोविंद पानसरे यांच्या केससमध्ये जादू घडवता आली नाही.

सीबीआयने मागील ८ वर्षांत डॉ दाभोलकरांच्या हत्येचा शोध लावण्याबाबत सीबीआयची जादु मात्र फोल ठरली असाही आरोप केला जात आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?